Mumbai News Live Updates : आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येत आहे. १ मे १९६० रोजी स्वतंत्र्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्यानिमित्त १ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही सभा मुंबईत पार पडणार आहे. त्यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Maharashtra News Update Today : देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन, क्राइम यासह विविध घडामोडी जाणून घ्या…
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार महिन्यांपासून संचालक मंडळाच्या बैठका होत नसल्याने बाजार समितीचे धोरणात्मक निर्णय पूर्णपणे ठप्प आहेत. कोणतेही निर्णय होत नसल्याने यंदा एपीएमसीतील मान्सूनपूर्व कमांचा पुरता बोजवारा उडाला आहे.
कल्याण: इमारत बांधकामाच्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागात चारजणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला करून शनिवारी गंभीर जखमी केले.
ठाणे : शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशाच ठाणे महापालिकेतील ११ गुणवंत सफाई कामगारांचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी सत्कार केला.
कल्याण – छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जत लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा लोकलमध्ये मृत्यू झाला होता. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याचा मृतदेह उतरुन पालिका रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या मृत प्रवाशाच्या शर्टावर असलेल्या शिंप्याच्या नामपट्टीवरून ओळख पटवून तो मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.
ठाणे : स्वारस्य अभिव्यक्ती देकार तत्वावर अपंगांना सक्षम करण्याच्या उद्देशातून ठाणे महापालिकेकडून चहाच्या स्टाॅलसाठी जागा देण्यात येत आहे. हे काम देण्यात आलेल्या संस्थेने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत गरजू अपंगांना बाजुला सारून मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्या अपंगांचाच समावेश करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ खान यांनी केला आहे.
चंद्रपूर: एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा तापतो. मात्र, विदर्भात गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. जणू काही पावसाळा सुरू झाला असेच वातावरण आहे. याचा परिणाम उधळीनेदेखील उडून दूर घर करणे सुरू केले आहे.
कल्याण : मुंब्रा बाह्यवळण रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी बंद असल्याने या रस्त्याने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांचा भार कल्याण-शिळफाटा रस्त्यावर आला आहे. दिवसा या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असताना नवी मुंबई हद्दीतील वाहतूक पोलीस अवजड वाहन चालकांकडून चिरीमिरी घेऊन वाहने तळोजा भागातून कल्याण शिळफाटा रस्त्यावर सोडतात. हा गैरप्रकार तातडीने थांबविण्यात यावा, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे.
“अजित पवार अजून बरेच दिवस राजकारणाच्या मध्यस्थानी राहतील, अशी परिस्थिती आहे. देशात अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना घाबरतात. पण, अजित पवारांनी एकदा नाही दोनदा नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना उल्लू बनवलं ,” असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
ठाणे : शहरातील नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी चालढकलपणा करू नका, असे स्पष्ट करत या तक्रारी १२ तासांच्या आत निकाली काढण्याचे आदेश देऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिका आधिकाऱ्यांचे कान टोचले.
मुंबई: घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मधील प्रवाशांना आता आपल्या मेट्रो १ सेवेबाबतच्या कोणत्याही तक्रारी व्हाट्सऍपवर नोंदविता येणार आहेत. ९९३०३१०९०० या व्हाट्सऍप क्रमांकावर प्रवाशांना आपली तक्रार नोंदविता येणार आहे.
“आपल्या कामगार सेनेचा आणि पक्षाचा अभिमान आहे. कधीकधी ५० टक्के तर कधी काहीच काम होत नाहीत. पण, लवकरच आपण सत्तेत असू. त्यामुळे १०० टक्के काम होतील,” असं विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
“नितेश राणे हे काँग्रेसमधून आले आहेत. नितेश राणेंनी काँग्रेसची चाकरी केली आहे. नितेश राणे नाही ओरडले तर त्यांना भाजपातून काढून टाकतील. त्यांना एवढंच काम आहे. त्यामुळे नितेश राणेंना चांगल्या डॉक्टरकडे नेण्याची गरज आहे,” अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांनी केली आहे.
कल्याण – मागील २५ वर्षे कल्याण डोंबिवली पालिकेत साखळी पद्धतीने (सिंडीकेट) नालेसफाईची कामे करून गुणवत्ताधारक ठेकेदारांना पालिकेत येण्यास मज्जाव करणाऱ्या ठेकेदारांची मक्तेदारी मोडून काढण्याचा धाडसी निर्णय यावेळी प्रशासनाने घेतला.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने औषध खरेदीचे पैसे वितरकांऐवजी थेट उत्पादक कंपनीच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली होती. मात्र हा निर्णय जीएसटीच्या नियमांचे आणि निविदा प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करून वितरकांनी औषधांचा पुरवठा थांबवला होता.
ठाणे : महापालिका क्षेत्रातील महामार्गांसह अंतर्गत भागात अनेक ठिकाणी मास्टीक पद्धतीने तयार करण्यात येणारे रस्ते गुळगुळीत होऊन अपघात होऊ नयेत, यासाठी अशा रस्त्यांवर बारीक खडी टाकली जात आहे. परंतु या रस्त्यावरील खडी रस्त्यावर इतरत्र पसरून अनेक ठिकाणी बारीक खडी जमा झाल्याचे थर दिसून येत आहे. या खडीवरून दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत असून याठिकाणी मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.
गोंदिया : राज्यात महाविकास आघाडी असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही केल्या जुळत नाही. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी तयारच असतात. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आली.
पिंपरी: पत्नीने सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी १५ जणांच्या टोळक्याने पतीला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली.
“कोण नितेश राणे? त्याला अक्कल आहे का? काहीही बडबड करतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दल एकेरी बोलतो. हे भाजपाला कसं आवडतं. तो काही कामाचा नाही. काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे वडील सोनिया गांधींचे पाय दाबत होते. नंतर सोनिया गांधींना शिव्या दिल्या,” असं शिवसेना ( ठाकरे गट ) नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
वर्धा : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. दोन दिवसांपूर्वी दोन अपघात झाले. त्यात तिघांचा बळी गेला होता. आज एक वाजता टोल नाक्याजवळ ट्रक रस्त्याखाली उतरला.
नागपूर : भारतीय ज्ञान परंपरेत शिक्षण देण्याची विशिष्ट शैली होती. कथा, कविता तसेच खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात होते. भारतीय ज्ञान इतके सशक्त होते की युरोप, ग्रीस, पर्शिया, चीन या देशांतदेखील भारतीय ज्ञानाचा प्रचार झाला. भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी सर्वत्र साक्षरता होती. मुघलांपेक्षा भारतीय ज्ञानपरंपरेचा सर्वाधिक नाश हा ब्रिटिशांनी केला, असा दावा लेखिका साहना सिंह यांनी केला.
“एकनाथ शिंदे यांनी बापाचं नाव चोरलं. पक्षांचं नाव चोरलं. यांचं काय खरं आहे. कोणत्या निवडणुका एकनाथ शिंदेंनी जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी सरकारी तिजोरीवर गंडा घालून लोकांना पैसे वाटण्याचं काम केलं,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली आहे.
चंद्रपूर : बाजार समिती निवडणूक निकालानंतर काँग्रेस पक्षात घमासान सुरू झाले आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याचे आवाहन देत, अन्यथा मी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढतो व जिंकून दाखवतो, असे म्हटले आहे. तर माजी मंत्री वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्यासमोर लहान नेते आहोत, असे म्हटले आहे.
नागपूर: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर प्रेयसीला हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. नंतर तिचा बळजबरीने गर्भपात करून लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
गडचिरोली : अहेरी-भामरागड तालुक्याच्या सीमेवरील केडमारा जंगल परिसरात रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. यात ठार झालेला पेरमिली दलम कमांडर बीटलू मडावी महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे आली आहे.
वाशीम : जिल्ह्यातील सहाही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच वंचित बहुजन आघाडीने प्रवेश घेतला आहे. महाविकास आघाडीने मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, कारंजा, वाशीम या चार बाजार समित्यांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपाला केवळ रिसोड बाजार समितीवर निसटता विजय मिळविण्यात यश आले आहे.
नागपूर : तालुकापातळीवरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीतील जय-पराजयावरून आजी-माजी आमदारांच्या राजकीय ताकदीचे मुल्यमापान होत नसले तरी राजकीय वारे कोणत्या दिशने वाहत आहेत यांचा अंदाज मात्र निश्चित येतो.
अमरावती: अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील पॅनलला चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्चस्व राखण्यात यश मिळाले असले, तरी अचलपुरात मात्र हादरा बसला आहे.
मुंबईत महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा पार पडत आहे. यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. “जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते. एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते. अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होते आहे. ही वज्रमूठ? मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे! शिवाजी पार्क सोडले, बिकेसीतील मोठी मैदाने घेणे आता टाळले… उबाठाचा प्रवास “ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे” असल्याने भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असे वाटतेय!,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.
कल्याण: एक्सप्रेस, लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठी, लोखंडी सळईचा फटका मारायचा. फटक्याने प्रवाशाच्या हातामधील पैशाची पिशवी, मोबाईल रेल्वे मार्गात पडला की ती वस्तू उचलून पळून जायचे.
'महाराष्ट्र दिना'निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात शहीद वीरांना अभिवादन केलं आहे. त्यांच्याबरोबर मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अमित ठाकरे उपस्थित होते.