Mumbai News Live Updates : आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येत आहे. १ मे १९६० रोजी स्वतंत्र्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्यानिमित्त १ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही सभा मुंबईत पार पडणार आहे. त्यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Maharashtra News Update Today : देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन, क्राइम यासह विविध घडामोडी जाणून घ्या…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत 'महाराष्ट्र दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत. भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे. त्यांच्यासह महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अधिकारीही उपस्थित होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ६३ व्या 'महाराष्ट्र दिना'निमित्त ट्वीट कर शुभेच्छा दिल्या आहेत. “सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र ही महापुरूषांची भूमी आहे. ज्यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. राज्यातील सर्व जनतेचा 'महाराष्ट्र दिना'च्या हार्दिक शुभेच्छा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
सांस्कृतिक विरासत से समृद्ध, महाराष्ट्र अद्भुत लोगों की भूमि है, जिन्होंने राष्ट्र निर्माण में महत्वपूर्ण योगदान दिया है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2023
महाराष्ट्र दिवस पर सभी प्रदेशवासियों को बधाई। pic.twitter.com/PltaTuYih1
भिवंडीच्या वळपाडा परिसरात शनिवारी ( २९ एप्रिलला ) तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या तीन मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यातच आज ( १ मे ) दोन जणांचा मृतदेह सापडला आहे. दिनेश तिवारी ( ३७ ) आणि अशोक मिश्रा ( २९ ) अशी दोघांची नावं आहे. एनडीआरफच्या पथकाकडून श्वानपथकाच्या माध्यमातूने बचावकार्य सुरू आहे.
“महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून देशातील अग्रणी आणि पुरोगामी राज्य म्हणून कार्य करत आहे. सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. त्या वारशाचं जतन करत, विकसित महाराष्ट्र घडावायचा आमचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत,” असं देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात म्हटलं आहे.
आर्थिक गुन्हेगारीचे देशात सुमारे पावणेदोन लाखांवर प्रकरणे नोंदवली गेली असून आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर राजस्थान तर दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणा राज्य आहे. आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीत सर्वाधिक पांढरपेशे अडकल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विटरवर खास पोस्ट केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांना कसा महाराष्ट्र अपेक्षित आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला सांगितले आहे.
आज ( १ मे ) ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. १ मे १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शिवाय या दिवशी कामगार दिनही साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांना अजित पवारांनी अभिवादन केलं आहे.
आज राज्यात ६३ वा 'महाराष्ट्र दिन' साजरा करण्यात येत. त्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजारोहण केलं आहे.