आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास आपण पुस्तकांमध्ये वाचला असेल. ६४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हाच अभिमानाचा दिवस आज आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत आहोत. मात्र हा दिवस साजरा करताना काही आठवणींना उजाळाही द्यायला पाहिजे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी झटलेल्या अनेक क्रांतिकारक, समाजसुधारकांचे किस्से आपण ऐकले असतील. असाच एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा किस्सा आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करताना एक किस्सा घडला होता. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी घेतलेली भूमिका प्रत्येकाला अभिमान वाटेल अशीच आहे. चला तर, हा किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात.