जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. येवला तालुक्यातील जऊळके येथील ग्रामपंचायतीच्या मतदानाची राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पाहणी करीत मतदार व मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी नाशिक विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, येवल्याचे तहसीलदार शरद मंडलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळी पावणेनऊ वाजता जऊळके गावातील तीन मतदान केंद्रांना सहारिया यांनी भेट दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांशी संवाद साधत काही अडचणी आहेत का, अशी विचारणा केली. गावात किती जणांनी मतदान केले, अशी विचारणा करत त्यांनी मतदारांशीही चर्चा केली.
मतदारांना त्यांचे हक्क, संधी योग्य प्रकारे मिळत आहे की नाही हे पाहण्यासाठी हा पाहणी दौरा असल्याचे सहारिया यांनी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. पाहणी दौऱ्यानंतर त्यात आणखी काही सुधारणा करता येतील का, याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करू असेही त्यांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा