वाई:राष्ट्रवादी काँग्रेस अजुनही पंधरा वर्षे सत्तेत येऊ शकत नसल्याचा दावा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून शिंदे गट आणि भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला जात आहे. साताऱ्यातही शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला होता. यावर  देसाईंनी उत्तर दिले आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

Atulbaba Bhosale
पृथ्वीराज चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याला पराभूत केल्याचं बक्षीस मिळणार? आमदार अतुल भोसले म्हणाले, “फडणवीसांनी मला…”
ajit pawar devendra fadnavis eknath shinde (1)
अजित पवारांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं का ठरेल…
Jitendra Avhad wins Maharashtra Assembly Election 2024, EVM results announced.
Jitendra Awhad: “मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो?” ईव्हीएमच्या गोंधळात जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
ajit pawar on evm marathi news
“लोकसभा, छत्तीसगड निवडणुकीत मतयंत्रात घोटाळा झाला नाही का?”, अजित पवार यांचा विरोधकांना सवाल
Devendra Fadnavis viral video
Devendra Fadnavis : ‘वापस आना पडता है’… देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची सोशल मीडियावर चर्चा; व्हिडीओ व्हायरल!
ajit pawar sharad pawar (6)
दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांचं सूचक विधान; तर्क वितर्कांना उधाण!
ajit Pawar Sunil Tatkare shinde fadnavis
सत्तास्थापनेआधी महायुतीत राडा? आधी अजित पवार, आता तटकरेंच्या वक्तव्याने वातावरण तापलं; भाजपाही हतबल? नेमकं चाललंय काय?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : समंदर लौटकर आ गया! देवेंद्र फडणवीस… राजकीय चक्रव्यूहात न अडकलेला अभिमन्यू !

हेही वाचा >>> आरोग्य विभागाची ३९४ रुग्णालये अग्निसुरक्षा यंत्रणा बसण्याच्या प्रतिक्षेत

रामराजेंचा पक्ष सध्या सत्तेत नाही. राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. सत्तेसाठी त्यांची ही तळमळ सुरू आहे. पण, पुढील अडीच वर्षेच नव्हे तर पुढील पंधरा वर्षे त्यांना सत्तेसाठी तळमळत राहावे लागणार आहे .

फलटणच्या कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजेंनी विरोधकांमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे वक्तव्य केलं होते. त्याविषयी  देसाईनां विचारले असता त्यांनी रामराजेंवर  टीका केली. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आली की लोकशाही टिकली. ते सत्तेतून बाजूला गेली की लोकशाहीला धोका होतो. रामराजेंना मला नम्रपणे सांगायचे आहे की, हे तुम्हाला तुमच्या पुरतं दिसतंय. आम्ही विधानसभेत लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केलं आहे. तसेच लोकशाही मार्गानेच विधान परिषदेत सभापतींची निवड केली आहे. बहुमताचा आदर लोकशाहीत केलाच पाहिजे. बहुमतालाच लोहशाहीत महत्व आहे.

हेही वाचा >>> पोलीस अधीक्षक समीर शेख यांची हुतात्मा अधिकाऱ्याच्या आई वडिलां बरोबर दिवाळी

मुळात रामराजेंना खंत आहे की, त्यांचा पक्ष सत्तेत नाही. त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर असल्याने राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. सध्या सत्तेसाठी त्यांची तळमत सुरू आहे.रामराजे हे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत. परंतु, तुमचं सरकार असताना लोकशाही राहिली आणि आमचं सरकार असताना ती संपली असं असू शकत नाही. रामराजेंची टीका ही उद्वेगातून आहे. खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी सत्तेपासून जास्त काळ लांब राहू शकत नाही आणि यामुळे त्यांची अगापाखड होत आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीला पुढील १५ वर्ष सत्तेत येवू देणार नाही, असा खणखणीत इशाराच शंभुराज देसाई यांनी दिलाय

महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य करण्याचा निर्णय

उद्धव साहेब बाहेर पडले. हा त्यांचा २४ मिनिटांचा दौरा होता. त्यांना जे अडीच वर्षात निर्णय घेता आले नाहीत ते आम्ही शंभर दिवसांत घेतले. त्यामुळे त्यांनी कितीही टीका केली तरी महाराष्ट्रातील जनतेने सर्वकाही पाहिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री १८ तास काम करत असून आम्ही त्यांचे सहकारी मंत्रीही तेवढ्यात वेगाने पळून त्यांच्या बरोबरीने व जबाबदारीने काम करत आहेत. आगामी काळात महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य करण्याचा निर्णय आम्ही शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली घेतला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा त्यांच्याच काळात झाली होती. ते पैसे तुम्ही अडीच वर्षात देऊ शकला नाही. ते आम्ही शंभर दिवसांत दिले.ते पहाणीसाठी उद्धव ठाकरे बाहेर पडले, हा २४ मिनिटांचा पहाणी दौरा होता. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त मदत मिळवून दिली आहे. तुमच्या मंत्रीमंडळात आम्हीही होतो. त्यावेळी आम्ही निर्णय करा, असे सातत्याने सांगत होतो. पण काहीच झाले नाही. त्यांना टीका करू देत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. हे सरकार शंभर दिवसांत किती काम करत आहे.