2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updates : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा अवघ्या राज्याला होती, ती अखेर संपली आहे. मतदानाची वेळ आता संपली असून राज्यात पुन्हा कोण सत्ता स्थापन करणार याचे अंदाज आता येऊ लागले आहे. विविध माध्यम आणि संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर केले जात असून पोल डायरीने दिलेल्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपाच्या महायुतीला मतदारांना कौल दिल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीत भाजपाला ७७ ते १०८, शिवेसना (एकनाथ शिंदे) पक्षाला २७ ते ५०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १८ ते २८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच, महायुतीला १२२ ते १८६ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला २८ ते ४७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला २५ ते ३९ जागा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला १६ ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळू शकतात. तर, जवळपास १२ ते २९ अपक्ष निवडून येण्याची शक्यताही या पोल डायरीतून वर्तवण्यात आली आहे.

चाणक्य

महायुती – १५२ ते १६०
महाविकास – १३० ते १३८
इतर – ६ ते ८

पिपल्स पल्स

महायुतीला – १७५ ते १९५
महाविकास आघाडी- ८५ ते ११२
इतर- ६ ते १२

पी मार्क

महायुती – १३७ ते १५७
महाविकास आघाडी – १२६ ते १४६
इतर – २ ते ८

PMARQ पोल

महायुती – १३७ ते १५७
महाविकास आघाडी – १२६ ते १४६
इतर – २ ते ८

CNBC Matriz

महायुती – १५०ते १७०
महाविकास आघाडी – ११० ते १३०
इतर – ८ ते १०

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll Live: चाणक्यचा पोल सांगतो आहे महायुतीला १६० जागा मिळणार

प्रमुख पक्षांचे उमेदवार

  • भाजप १४९
  • काँग्रेस १०१
  • शिवसेना( उद्धव ठाकरे) ९५
  • शिवसेना (शिंदे) ८१
  • राष्ट्रवादी (शरद पवार) ८६
  • राष्ट्रवादी (अजित पवार) ५९
  • मनसे १२५
  • वंचित २००
  • अपक्ष २०८६

२०१९ विधानसभा निवडणूक

भाजपा – लढवलेल्या जागा -१६४, विजय – १०५
शिवसेना – लढवलेल्या जागा – १२८, विजय – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस – लढवलेल्या जागा – १२१, विजय – ५४
काँग्रेस – लढवलेल्या जागा – १४७, विजय – ४४

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra exit poll updates vidhan sabha election prediction of mahayuti 122 seats know mva updates voting percentage sgk