मुंबई : केंद्र सरकारने खरीप शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली असली तरीही सद्या:स्थितीत खरिपातील शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर खरीप हंगामातील शेतीमालाची नाफेड, एनसीसीएफकडून हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय भावांतर योजनाही जाहीर केली होती. तरीही सद्या:स्थितीत राज्यात उडीद वगळता एकाही शेतीमालाला हमीभावाइतका दर मिळत नसल्याचे चित्र आहे. नाफेड आणि एनसीसीएफकडून होणाऱ्या खरेदीला अद्याप गतीच आलेली नाही.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी

राज्यात खरीप हंमागातील सोयाबीनचे क्षेत्र सुमारे ५० लाख हेक्टर आहे. विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर होते. सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये आहे. पण हंगामात सोयाबीनला ४४०० पेक्षा जास्त दर मिळालेला नाही. शुक्रवारी सोयाबीनला सरासरी ४३४५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनचा हमीभाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल करण्याची घोषणा केली. शिवाय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीचे निकष बदलून ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांऐवजी १५ टक्के केले. तरीही सोयाबीनला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन बाबत केंद्राचे धोरण सपशेल फसले आहेत.

हेही वाचा >>> Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा अंधारेंनी केली अमृता फडणवीसांची नक्कल; म्हणाल्या, “ठाकरे मृत्यूशय्येवर असताना…”

कापसाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. मध्यम लांबीच्या धाग्याच्या कापसाला ७१२१ आणि लांब धाग्याच्या कापसाला ७५२१ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. पण, बाजारात कापूस पाच हजार ते सहा हजार रुपयांवर आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दरामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. मुगाला ८६८२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. पण, शेतकऱ्यांना जेमतेम ६९२६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

पीकनिहाय हमीभाव आणि मिळणारा दर

पीक हमीभाव मिळणारा दर

सोयाबीन- ४८९२ ४३४५

कापूस – ७१२१ ते ७५२१ ५००० ते ६०००

मूग – ८६८२ ६९२६

उडीद – ८११३ ८५००

मका – २२२५ २१००

शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकून, खिसा कापून मिळविलेला पैसा मतांवर डोळा ठेवून लाडक्या योजनांसाठी उधळण्यात आला. हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. शेतीवरील अरिष्ट आणखी गंभीर होणार आहे. शेतकऱ्यांना आपली होत असलेली लूट समजते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लुटारू राज्यकर्त्यांना शेतकरी नक्कीच धडा शिकवतील.– डॉ. अजित नवले, सरचिटणीस, भारतीय किसान सभा

Story img Loader