प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार :  सध्या करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन  शर्तीचे प्रय करत आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी फलक, भित्तीपत्रके, पत्रके, समाजमाध्यमांवर जाहिरातबाजी करत आहेत. पण याच जनजागृतीचा फटका मात्र आता पाळीव प्राण्यांना बसत आहे. या जाहिरातीत आजारी असलेल्या  पाळीव प्राण्यांबरोबर थेट संपर्क आणि प्रवास करणे टाळा असे म्हटले आहे. या संदेशामुळे पाळीव प्राण्यांशी नागरिकांनी संपर्क कमी केला असून  त्यांचा देखभालीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदेशाने पाळीव प्राणीप्रेमींनी  नाराजी व्यक्त केली आहे.

करोनाच्या भीतीने काहींनी प्राण्यांना रस्त्यावर सोडले आहे. तर, काही गृहसंस्थांमध्ये प्राणी असलेल्या असेल्याला रहिवाशाला प्राणी गृहसंस्थांमध्ये ठेवण्यास मनाई करत आहेत. सदर जाहिरातीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या संदर्भात भारतीय पशु कल्याण मंडळ  यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. आणि या तक्रारीनुसार  पशु कल्याण मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना फलकातून पाळीव प्राण्यांविषयीचा संदेश वगळण्याचे  आदेश देण्यात आल्याची माहिती पालघर मानद पशु कल्याण अधिकारी मितेश जैन यांनी दिली आहे.

तर महापालिकने लवकरच हा संदेश वगळला जाईल आणि नवीन पत्रके छापायला दिली असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी तबस्सुम काझी यांनी दिली.

Story img Loader