मुंबई : देश- विदेशातील गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी उद्याोग विभागास दिल्या होत्या. त्यानुसार देश- विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी, त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

राज्य सरकार व प्रमुख उद्याोग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्याोगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उद्याोग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गुंतवणूक वाढविण्यासाठी…

● राज्यात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल.

● आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल.

● महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. याअंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांशी सहकार्य वाढवणे, दूतावास व व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा : बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली

● या नव्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष व उद्याोग संचालनालय सक्रिय भूमिका बजावणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात येणार आहे.