Maharashtra Government Formation: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १० दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. भाजपा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अनेक बैठका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी होणाऱ्या (५ डिसेंबर) शपथविधीवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे कळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे. बुधवारी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यानंतर हे वृत्त समोर आले आहे.

दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शाहांना भेटायला गेल्याच्या सहा दिवसानंतर काल पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे समोरासमोर भेटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढली असल्याचे समजते.

Eknath Shinde Amit Shah Meeting
“किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!

हे वाचा >> “किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?

शिवसेनेमधील नेत्यांनी सांगितले की, आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक केंद्रातून पाठविलेले निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीनंतर ते दोघेही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सत्तास्थापनेबाबत अंतिम निश्चिती होण्याची शक्यता आहे.

तसेच आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचाही दावा केला जाणार आहे. शिवसेनेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अंतिम ठरल्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. शिवसेनेच्या एका नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, खातेवाटपाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. गृह खाते कुणाला मिळणार? याचीही निश्चिती झालेली नाही. सत्तास्थापनेनंतर कोणते खाते कुणाला मिळणार, हे कळेल.

या भेटीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास आर्धा तास चर्चा झाली. शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीवरून शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांनी भेट का घेतली? याविषयी माहिती सांगितली आहे. “एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. महायुतीमध्ये कधीही नाराजी नव्हती आणि नाही. नाराजीचा काही प्रश्न नाही. एकनाथ शिंदे यांची तब्येत व्यवस्थित नव्हती. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, माध्यमात चर्चा झाल्या की ते नाराज आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भरभरून एवढे त्यांना मतदान केले. तसे येणारा कार्यक्रम देखील मोठा व्हावा आणि त्यामध्ये शिवसेना देखील असणार आहे”, असे किरण पावसकर यांनी म्हटले.

Story img Loader