Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची तयारी केली आहे. रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता आहे. भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा सामावेश केला जाणार नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते. भाजपच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नावे अंतिम करणार आहेत.

Live Updates

Maharashtra Political News Live Updates | Nagpur Oath Taking Ceremony | महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे लाईव्ह अपडेट्स

12:54 (IST) 15 Dec 2024

Maharashtra Cabinet Expansion Live: सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट? अद्याप फोन गेला नसल्यामुळे चर्चांना उधाण

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन गेला नसल्याची माहिती मिळत आहे. भाजपाने त्यांना विश्रांती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुपारी ४ वाजता याबद्दल निश्चित माहिती मिळू शकेल.

12:08 (IST) 15 Dec 2024

संभाव्य मंत्र्यांना अखेर निरोप पोहोचले; चव्हाण, मुनगंटीवार यांना विश्रांती, वर्धेचे पंकज भोयर यांना संधी

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासावर आला असताना रविवारी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाजप व मित्र पक्षाच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सकाळी १० वाजता संभाव्य मंत्र्यांना फोनव्दारे शपथविधीसाठी तयार राहा, असे निरोप देण्यात आले.

सविस्तर वाचा....

12:07 (IST) 15 Dec 2024

Maharashtra Political News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ९ आमदार शपथ घेणार, तटकरेंची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ९ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. आज नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळणार आहेत. अजित पवार यांनी आधीच शपथ घेतली आहे. तर आज ९ आमदार शपथ घेतील.

11:17 (IST) 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion Live: शपथविधी काही तासांवर, संभाव्य मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात, नेते संभ्रमात

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला असताना अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नसल्याने नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा...

10:57 (IST) 15 Dec 2024

Maharashtra Cabinet Expansion Live: भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट? गिरीश महाजन म्हणाले नव्या नेतृत्वाला...

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपाकडून काही जुन्या आणि काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे, असेही ते म्हणाले. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून याचा आनंद वाटतो. तसेच काही वरिष्ठ नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

10:05 (IST) 15 Dec 2024

Maharashtra Cabinet Expansion Live: भाजपाकडून 'या' आमदारांना मंत्रिपदासाठी फोन? सूत्रांची माहिती

भाजपाकडून नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून फोन गेल्याची माहिती मिळत आहे.

10:02 (IST) 15 Dec 2024

Maharashtra Cabinet Expansion Live: आज मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजपाच्या ‘या’ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होणार आहे. यानिमित्त शपथविधीसाठी प्रत्येक पक्षाकडून आमदारांना फोन जात आहेत. भाजपाचे २१ जण शपथ घेतल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत भाजपाकडून १९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra cabinet expansion

मंत्रिमंडळाचा आज विस्तार, नागपुरात शपथविधी; नावे गुलदस्त्यातच (Photo Credit- Eknath Shinde/X)

Story img Loader