Maharashtra News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. आज ३९ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी आज शपथ घेतली. एकूण ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
हे वाचा >> महायुतीच्या मंत्रिमंडळात कुणाला मिळाली संधी, वाचा ३९ मंत्र्यांची यादी
Maharashtra Political News Live Updates | Nagpur Oath Taking Ceremony | महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे लाईव्ह अपडेट्स
Maharashtra Cabinet Expansion Live: भाजपाकडून ‘या’ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन? सूत्रांची माहिती
भाजपाकडून नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून फोन गेल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Cabinet Expansion Live: आज मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजपाच्या ‘या’ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होणार आहे. यानिमित्त शपथविधीसाठी प्रत्येक पक्षाकडून आमदारांना फोन जात आहेत. भाजपाचे २१ जण शपथ घेतल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत भाजपाकडून १९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळाचा आज विस्तार, नागपुरात शपथविधी; नावे गुलदस्त्यातच (Photo Credit- Eknath Shinde/X)