Maharashtra News : विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर जवळपास १२ दिवसांनी म्हणजे ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला. पण त्यानंतर पुन्हा आठवडा उलटूनही मंत्रीमंडळात कुणाचा समावेश होणार? याबाबत अनिश्चितताच असल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्याचवेळी दुसरीकडे मुंबईसह राज्यभरातील पालिका निवडणुकांची राजकीय पक्षांना प्रतीक्षा असून त्यासंदर्भात राजकीय घडामोडींना हळूहळू वेग येऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!

16:21 (IST) 13 Dec 2024

तिसऱ्या स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वंदना महाजन यांची निवड

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘दादा पाटील महाविद्यालया’त शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘तिसऱ्या स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापिका, लेखिका व नामवंत समीक्षक ‘डॉ. वंदना महाजन’ यांची निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे संयोजक प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली आहे. ्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३ जानेवारी रोजी दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. वंदना महाजन यांचे आजपर्यंत ‘मराठी कादंबरीतील स्त्रीवाद, सांस्कृतिक प्रवाहांची स्त्रीवादी समीक्षा, स्त्रीवाद आणि समाज परिवर्तन, स्त्रीवाद आणि मराठी साहित्य, स्त्रीवाद जाणिवेतला आणि नेणिवेतला, मराठीतील स्रियांची कथा, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास १८१८ ते १८७४ हे समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘वादळवाट’ हा काव्यसंग्रह तसेच सत्यापासून साहित्यापर्यंत, कल्चरली करेक्ट, विचारकिरण दीनमित्र मुकुंदराव पाटील समग्र अग्रलेख, तिचा अवकाश, महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य हे संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत.

16:14 (IST) 13 Dec 2024

नागपूर: विद्यापीठाच्या ३६ परीक्षा पुढे ढकलल्या, कधी होणार बघा

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महारा नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन १६ डिसेंबरला आयोजित केल्याने विद्यापीठाच्या ३६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. या समारंभात राज्यपाल प्रमुख अतिथी राहणार आहेत. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचा तिसरा टप्पा सुरू आहे.

सविस्तर वाचा

15:59 (IST) 13 Dec 2024

Maharashtra News Live: आम्ही मशिदी पाडू आणि मंदिरं वाचवू – प्रसाद लाड

एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही हा आमचा शब्द आहे. अनधिकृत मशि‍दींचा विषय आम्ही उचलला. मुंबईतल्या १२ मशिदी पाडण्यासाठी आम्ही नोटिसी दिल्या. उद्धव ठाकरेंना त्या मशीदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं. आम्ही मशिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे – प्रसाद लाड, भाजपा नेते

15:10 (IST) 13 Dec 2024

ईव्हीएमविरोधात धार्मिक संघटनाही मैदानात; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नाशिक – देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्राला (ईव्हीएम) हद्दपार करून मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ यांच्यावतीने शुक्रवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढली गेली. मोर्चात पराभूत उमेदवारांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सविस्तर वाचा

15:09 (IST) 13 Dec 2024

डोंबिवलीत सारस्वत बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी गुन्हा

डोंबिवली येथील पूर्व भागातील सारस्वत बँकेत पाचशे रूपयांच्या ४५ बनावट नोटा भरणाऱ्या ग्राहकाविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ग्राहक हे कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील रहिवासी आहेत.

सविस्तर वाचा

15:09 (IST) 13 Dec 2024

राज्यभरात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू महिलांचा… माहिती अधिकारात…

नागपूर : राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मागील साडेतीन वर्षांत झालेल्या एकूण अपघातात दगावणाऱ्या नागरिकांमध्ये ८७ टक्के महिला आहेत. माहितीच्या अधिकारातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

सविस्तर वाचा…

14:27 (IST) 13 Dec 2024

एनएमएमटीचे ‘चालते फिरते’ ग्रंथालय गायब; परिवहन विभागाच्या चांगल्या उपक्रमाला अनास्थेचे कोंदण

नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन सेवेने लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवाशांकरिता बसमध्ये ‘लेट्स रिड इंडिया फाऊंडेशन’ च्या माध्यमातून ‘बुक्स इन बस’ या नावाने चालते फिरते ग्रंथालय हा उपक्रम सुरू केला होता. प्रवासी वाहतूक सेवेमध्ये ग्रंथालय सुविधा हा देशातील पहिला उपक्रम म्हणून पालिकेने स्वत:ची पाठ देखील थोपटून घेतली होती.

सविस्तर वाचा

14:26 (IST) 13 Dec 2024

Maharashtra Cabinet Expansion Live Updates: अजित पवारांची दिल्लीत मोदींशी भेट!

अजित पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, “महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सकारात्मक चर्चा” झाल्याचा केला उल्लेख!

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1867484491809534389

14:14 (IST) 13 Dec 2024

देहूरोड संरक्षण विभागाच्या हद्दीतील रखडलेला पालखी मार्ग पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी म्हणाले…

पिंपरी : तीर्थक्षेत्र देहूगाव ते देहूरोडपर्यंतचा साडेतीन किलोमीटर अंतराचा संरक्षण विभागाच्या हद्दीतील श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पायी चालताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

वाचा सविस्तर…

13:52 (IST) 13 Dec 2024

सोन्याच्या दरात २४ तासात घसरण… हे आहे आजचे दर…

नागपूर : सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असतांनाच गुरूवारच्यात तुलनेत शुक्रवारी २४ तासात दरात मोठी घट नोंदवली गेली. त्यामुळे लग्नानिमित्त सोन्याचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने दरवाढीमुळे ग्राहक चिंतेत होते, हे विशेष.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 13 Dec 2024

अमरावती : रेल्‍वे प्रवाशांसाठी खुषखबर ! सामान्‍य डब्‍यांच्‍या संख्‍येत वाढ

अमरावती : सामान्य डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपाययोजना हाती घेतल्‍या असून लवकरच ३७ मेल / एक्‍स्‍प्रेस रेल्‍वे गाड्यांमध्‍ये ११७ अतिरिक्‍त सामान्‍य श्रेणीचे डबे जोडण्‍यात येणार आहेत. दररोज सुमारे दहा हजार प्रवाशांना त्‍याचा लाभ मिळू शकणार आहे.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 13 Dec 2024

बुलढाणा: ‘आधार’च्या मदतीने तेलंगणामधील नातेवाईकांचा शोध

बुलढाणा : मध्यरात्री बसस्थानक वर एकटीच असलेल्या महिलेची रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी चौकशी केली.मात्र भाषेची अडचण आल्याने तिची माहिती काढणे तर दूरच संभाषण करणेही अशक्य ठरले. सुदैवाने ‘त्या’ महिले जवळ असलेल्या आधार कार्ड वरून पोलिसांनी शोध घेत तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

सविस्तर वाचा…

12:40 (IST) 13 Dec 2024

गोंदिया : आसाम वरून मुंबईला जाणारे सुपारीचे ट्रक बेपत्ता

गोंदिया : एक ट्रक भाड्याने घेऊन त्या ट्रकमध्ये ३५ टन सुपारी टाकून ती सुपारी आसाम येथून राष्ट्रीय महामार्गाने मुंबई येथे नेत असताना तो ट्रक देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर बेपत्ता झाला.ही घटना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.याप्रकरणी तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 13 Dec 2024

Maharashtra Politics Live Updates: सुनंदा पवार यांच्या विधानावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

त्यांना एकत्र यायचं असेल तर अजित पवारांचं नेतृत्व त्यांनी मान्य करावं आणि एकत्र यावं – अमोल मिटकरी</p>

12:38 (IST) 13 Dec 2024

गोदावरीतील पाणवेली काढण्यासाठी पुन्हा सव्वा दोन कोटींचा खर्च; ट्रॅशस्किमर यंत्र चालवणे, देखभाल-दुरुस्तीचे आव्हान

नाशिक – गोदावरी नदीपात्र पाणवेलीच्या जोखडातून मुक्त झाल्याचे दृष्टीपथास पडत नसताना पाणवेली काढण्यासाठी वापरात असलेल्या ट्रॅशस्किमर यंत्र चालविण्यासह त्याच्या देखभाल व दुरुस्तीवर मात्र खर्च कायम आहे. पुढील पाच वर्षे हे यंत्र चालवणे व देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा दोन कोटींच्या खर्चाला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

सविस्तर वाचा

12:35 (IST) 13 Dec 2024

Maharashtra Breaking News Live Updates: पुन्हा एकत्र यायला हवं, रोहित पवार यांच्या आईची प्रतिक्रिया

अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं. मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवं हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा – सुनंदा पवार, रोहित पवार यांच्या आई

12:28 (IST) 13 Dec 2024

अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम

अकोला : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटांतील महिलांच्या योगदानातून अकोल्यात तेजस्विनी भवन उभारण्यात आले आहे.साधन केंद्रातर्फे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली इमारत ठरली. अकोल्यात हा पथदर्शी उपक्रम राबवला जात आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 13 Dec 2024

१३७ कोटींच्या फसवणूकप्रकरणी ‘ईडी’ची देशभरात कारवाई

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मुंबई, दिल्ली आणि गुरगावमधील १९ ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती गुरुवारी दिली. सुमाया-डेंट्सू प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली असून त्यात ४६ लाख भारतीय चलन, चार लाख विदेशी चलन व तीन कोटी ४० लाख रुपयांचे सोन्याचे लगड जप्त करण्यात आले.

वाचा सविस्तर…

12:03 (IST) 13 Dec 2024

पूर्वीच्या वादातून सशस्त्र हल्ल्यात तरुण ठार, महिलेसह सहा जखमी

सांगली : तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला असून एका तरुणाचा मृत्यू झाला तर महिलेसह पाच जण जखमी झाले आहेत.

वाचा सविस्तर…

12:03 (IST) 13 Dec 2024

गृह फसणुकीप्रकरणी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा

मुंबई : ठाण्यातील रहिवाशाचे घर बेकायदेशिररित्या विकल्याच्या आरोपाखाली खेरवाडी पोलिसांनी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर…

12:02 (IST) 13 Dec 2024

चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याने शहरवासीयांत भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 13 Dec 2024

पालकांनो सावधान ! मुलांना व्हॅन, रिक्षा, बस मधून शाळेत पाठवताय?

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून बिनदिक्कत वाहतूक केली जात असल्याचे उपप्रादेशिक विभागाच्या (आरटीओ) नियमित तपासणीतून समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

12:00 (IST) 13 Dec 2024

पेट्रोल भरलेल्या टँकरच्या टायरमधून धूर आल्याने नागरिकांची पळापळ

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथे २२ हजार लिटर पेट्रोल भरलेला टँकर (एम एच ०८ एपी ०७७७) च्या टायर मधून धूर येऊ लागल्याने एका नागरिकाच्या सतर्कतेमूळे मोठा अनर्थ टळला. टँकरने पेट घेण्या आगोदरच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेने टँकरच्या टायरमधून येणाऱ्या धूरावर पाणी मारले.

वाचा सविस्तर…

11:59 (IST) 13 Dec 2024

आपल्या खासदारकीला आव्हान देणारी निवडणूक याचिका फेटाळून लावा, नारायण राणे यांची उच्च न्यायालयात मागणी

मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते विनायक राऊत यांची आपल्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

वाचा सविस्तर…

11:20 (IST) 13 Dec 2024

“वरिष्ठांचा निर्णय अंतिम, पण पालकमंत्री जिल्ह्यातीलच हवा”, महायुतीच्या नेत्यांची भावना

गोंदिया : १४ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. गोंदिया जिल्ह्यातून कुणाचा नंबर लागणार ! गोंदिया जिल्ह्याच्या इतिहास नुसार जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळणार की जिल्ह्यातील हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 13 Dec 2024

Maharashtra Politics Live Updates: उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरे दुपारी १ च्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत.

11:00 (IST) 13 Dec 2024

मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी

ठाणे : मुंब्रा बायपास मार्गावरील टोलनाका परिसरात शुक्रवारी पहाटे ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला. या अपघातामध्ये चालक रियाज अहमद (४८) यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 13 Dec 2024

Maharashtra Politics Live Updates: महापालिका निवडणुकांवरून संजय राऊतांचं टीकास्र

शिवसेनेनं मुंबईसह १४ महानगर पालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आम्ही अत्यंत ताकदीनं या निवडणुका लढू. ३ वर्षं या निवडणुका त्यांनी घेतल्या नाहीत. कारण त्यांना हरण्याची भीती होती. वाममार्गाने आपण या निवडणुका जिंकू शकतो, याची खात्री पटल्यानंतर आता ते निवडणुका घेत आहेत. पण आम्ही प्राणांची बाजी लावून या निवडणुका लढवू – संजय राऊत</p>

10:49 (IST) 13 Dec 2024

Maharashtra Breaking News Live Updates: संजय राऊतांची शरद पवारांच्या ‘त्या’ भेटींवर प्रतिक्रिया!

मी शरद पवारांना ओळखतो. राज्यसभेत आम्ही बाजूबाजूलाच बसतो. मला वाटत नाही की शरद पवार सरकारसोबत जाण्याचा विचार करतील. भाजपाच्या गोटात सामील झालेल्यांच्या नादाला लागून ते वेगळा विचार करतील असं वाटत नाही.

यासंदर्भात गौतम अदाणी मध्यस्थी करत आहेत. गौतम अदाणींच्या घरी अलिकडे राजकीय चर्चा होतात, महाराष्ट्राचं भवितव्य ठरवायचा प्रयत्न ते करत आहेत. गौतम अदाणी म्हणजे काय आचार्य विनोबा भावे आहेत का? गौतम अदाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का? गौतम अदाणी म्हणजे काय जमनालाल बजाज आहेत का? गौतम अदाणी म्हणजे काय यशवंतराव चव्हाण आहेत का? राजकारण्यांच्या गटातटात मध्यस्थी करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं हे काम करत आहेत? कोण आहेत हे? नरेंद्र मोदींचा मित्र म्हणून एक उद्योगपती महाराष्ट्रात राजकारण करणार, महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार? जे त्यांच्या घरात मुंड्या खाली घालून बसतात, त्यांना लाज वाटली पाहिजे स्वत:ला मराठी म्हणवून घ्यायची – संजय राऊत</p>

महाराष्ट्र सरकार स्थापन २०२४

Maharashtra Political News : राज्यभरातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर