Maharashtra Breaking News Highlights : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मंत्रिमंडळाच्या यादीवर अंतिम मोहोर उमटविणार असल्याची माहिती मिळत आहे. १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस असल्यामुळे अजित पवार यांनी सहकुटुंब आणि पक्षातील काही नेत्यांसह शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते विविध पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Political News Updates | महाराष्ट्र न्यूज अपडेट्स
नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश
ठाणे : ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेत नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येत असून हे काम मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे थांबण्याची शक्यता आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन नवीन रेल्वे स्थानकांच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. यामुळे नवीन स्थानकाच्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट दिला. यावर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी पितृतूल्य व्यक्तिमत्व आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांची भेट घेण्याचा पायंडा आहे. आज त्यासाठीच त्यांची भेट घेतली. तसेच २०१४ रोजी मोदींनी प्रचाराची सुरुवात रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून केली होती. तसेच ते छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. म्हणूनच मी त्यांना आज महाराजांची प्रतिकृती भेट दिली.
Extremely thankful to Hon PM Narendra Modi ji for your valuable time, guidance, blessings and standing firm behind Maharashtra.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2024
In last 10 years, with your support Maharashtra is Number 1 in almost every sector and now aims to take this journey of VIKAS to the next level under… pic.twitter.com/nr6pmBG5UC
पुणे : नगर रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील टाटा गार्डन चौकात घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
मुंबई : गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या धर्तीवर अभ्युदयनगर, आदर्शनगर आणि वांद्रे रेक्लेमेशन या तीन म्हाडा अभिन्यासांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे.
ठाणे : भात पिकानंतर ओस पडणाऱ्या कोकण विभागातील शेतीला दुसऱ्यांदा लागवडीसाठी तयार करणाऱ्या कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी केली आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात येत आहे. यंदा सुमारे ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड करण्यात येणार आहे.
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
पवई पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत १३ किलो २१७ ग्रॅम चरस आणि शस्त्रासह एका सराईत आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही अमलीपदार्थ विक्रीचे दोन व सेवनाबद्दल एक गुन्ह दाखल आहे. सविस्तर वाचा…
तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना
कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात सातहून अधिक नागरिकांचा मृत्यू आणि ४२ जण जखमी झाले. या घटनेमुळे बेस्ट बसमधील सुरक्षित प्रवासाची हमी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘बेस्ट’च्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचे २४७ अपघात झाले.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
गोंदिया : नवेगाव-नागझिऱ्यातील जंगलात गेल्या काळात क्षेत्र अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला. आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून आनंदाची बातमी आली आहे.
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
बदलापूर : नव्याने खरेदी केलेल्या घराची घरपट्टी लावण्याकरता लाचेची मागणी केल्याबद्दल बदलापूरजवळील वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराकडून त्यांनी २० हजारांची मागणी केली होती.
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
नाशिक : राज्यातील सर्व पंपांवर आता २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वितरणास सुरुवात झाली आहे. यापूर्वी हे प्रमाण १० ते १५ टक्के होते. इथेनॉल मिश्रित पेट्रोल पाण्याच्या संपर्कात आल्यास वाहनांचे इंजिन खराब होण्याचा धोका संभवतो.
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
पुणे : पाच महिन्यांपूर्वी पुराचा फटका बसलेल्या आणि पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पुराचे पाणी घुसणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी पुणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
शहरातील पदपथांचे लेखापरिक्षण करणार? काय आहे कारण
पुणे : नागरिकांना सहज आणि सुरक्षित चालता यावे, यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘पादचारी सुरक्षा आणि सुविधा धोरण’ तयार केले आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकसत्ता’ने समोर आणल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आता शहरातील विविध रस्त्यांवरील पदपथांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
छत्रपती संभाजीनगर : महायुतीमध्ये मंत्री पदाचा निकष ठरवताना मंत्रीपदी सिल्लोड आमदार अब्दुल सत्तार यांचा समावेश करू नये असे काही तरी करा, अशी गळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत घातली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
नागपूर : महायुती सरकारने शिक्षकांना मोठी भेट दिली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला असूनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नव्हता. आचारसंहितेपूर्वी ही यावर चर्चा झाली होती, मात्र वेतन वाढ रखडलेलीच होती.
Maharashtra News Live: अजित पवार – शरद पवार भेटीवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले, “माझी तर हिंमत झाली नसती..”
शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबिय आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसह त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावर प्रतिक्रिया देत असताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे. “शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. पण माझी मात्र अशी हिंमत झाली नसती. जर मी वडिलधाऱ्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला असता तर मी तरी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत केली नसती. मला लाज वाटली असती”, असे संजय राऊत म्हणाले.
कल्याण पूर्वेत ‘शक्तिधाम’मध्ये पालिकेचे पहिले प्रसूतीगृह, महिलांचा कल्याण पश्चिमेतील रुग्णालयात जाण्याचा त्रास वाचला
कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडीतील शक्तिधाम या पालिकेच्या इमारतीत अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे प्रसूतीगृह कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. कल्याण पूर्वेत अशाप्रकारचे हे पालिकेचे पहिलेच प्रसूतीगृह आहे. मागील अनेक वर्षापासून कल्याण पूर्वेत प्रसूतीगृह सुरू करण्याची मागणी नागरिक पालिकेकडे करीत होते. त्यांची मागणी आता पुर्ण झाली आहे.
‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
बुलढाणा : अचानक उद्धभवलेल्या आणीबाणीच्या प्रसंगाची पोलिसांना माहिती देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रणालीवर चुकीची माहिती देणाऱ्या मेहकर येथील ‘सर्किट’ युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने मध्यरात्री मंदिरावर हल्ला झाल्याचा संदेश ‘११२’ वर दिल्याने मेहकर पोलिसांची धावपळ झाली होती
Maharashtra News Live: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळही उपस्थित होते. या भेटीनंतर पवार कुटुंबिय पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
#WATCH | Delhi: Maharashtra Deputy CM and NCP chief Ajit Pawar along with his wife and party leaders including Praful Patel, Chhagan Bhujbal arrive at the residence of NCP-SCP chief Sharad Pawar, to wish him on his birthday today. pic.twitter.com/CS6cv9oP4E
— ANI (@ANI) December 12, 2024