Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे राज्याच्या गादीवर पुन्हा एकदा महायुतीचा मुख्यमंत्री बसणार आहे. परंतु, या मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही समोर आलेला नाही. ५ डिसेंबर रोजी राज्यात शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीची जोरदार तयारीही सुरू झालीय. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् अन्य खातेवाटप अद्यापही झालेलं नाही. त्यामुळे कोणाच्या पारड्यात कोणतं पद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या चर्चांना उशीर होत आहे. तसंच, त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरीही ते मुख्यमंत्री पदासह इतर अनेक पदांसाठी अडून बसल्याची चर्चा आहे. गृहमंत्री पदावरही त्यांना दावा केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राज्यात आगामी काळात काय चित्र असेल हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होईल.
Maharashtra Politics Live Updates : सत्ता स्थापनेचा तिढा कधी संपणार? राज्यातील घडामोडी वाचा
विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या वारणानगर शाखेने या संमेलनाचे आयोजन केले असून हे शनिवारपासून (७ डिसेंहबर) दोन दिवसीय संमेलन वारणा विद्यापीठाच्या विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्राच्या सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे साहित्यनगरीमध्ये होणार आहे.
पुणे : गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाच्या अद्याक्षरांपासून होत असलेला ‘विविद स्मृती संगीत समारोह’ रविवारी (८ डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून ‘भैरव ते भैरवी’ या संकल्पनेवर आधारित १४ तासांच्या या महोत्सवात ३० ते ४० वर्षे वयोगटातील अकरा युवा कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार पद्मरेखा धनकर, प्राजक्ता माळी यांना जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने चंद्रपूर येथील ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर आणि पुण्यातील कवयित्री व अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना यंदाचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंची भेट का घेतली? किरण पावसकरांनी दिली माहिती
“एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. महायुतीमध्ये कधीही नाराजी नव्हती आणि नाही. नाराजीचा काही प्रश्न नाही. एकनाथ शिंदे यांची तब्येत व्यवस्थित नव्हती. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, माध्यमात चर्चा झाल्या की ते नाराज आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भरभरून एवढं त्यांना मतदान केलं. तसं येणारा कार्यक्रम देखील मोठा व्हावा आणि त्यामध्ये शिवसेना देखील असणार आहे”, असं किरण पावसकर यांनी म्हटलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची आज वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीसंदर्भात बोलताना किरण पावसकर यांनी म्हटलं की, “कोणत्याही मागण्यांसाठी महायुतीचं सरकार अडलेलं नाही. गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत”, असं त्यांनी म्हटलं.
डोंबिवलीत पत्नीला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
डोंबिवली : घरातील सावत्र मुलीला मी सांभाळणार नाही, या कारणावरून झालेल्या भांडणातून रविवारी दुपारी कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी भागात एका पतीने आपल्या पत्नीला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या महिलेची बहीण आणि शेजाऱ्यांनी धावपळ करून या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर या महिलेचा पती घरातून पळून गेला.
घोडबंदर येथील बोरिवडे मैदान ठेकेदाराकडून गिळंकृत, मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
ठाणे : घोडबंदर येथील बोरिवडे मैदानात एका ठेकेदाराने जलवाहिन्यांची साठवणुक करण्याबरोबरच तिथे शेड उभारून हे मैदान गिंळकृत केल्याचा आरोप करत खेळाच्या मैदानातील हे साहित्य हटविण्याची मागणी मनसेने केली आहे. पालिकेने हे अतिक्रमण त्वरीत हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, खेळाच्या मैदानावर अतिक्रमण केले असेल तर ते तात्काळ हटविण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Live Blog : एकनाथ शिंदेंची भेट घेण्याकरता देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल!
एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री पदावरून चर्चा प्रलंबित आहेत. या चर्चा आता होण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळा अवघ्या ४८ तासांवर येऊन ठेपलेला असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यवतमाळ : अजब न्याय! शेतकऱ्यांचा माल बाहेर अन् व्यापाऱ्यांचा मात्र…
यवतमाळ : सोयाबीनचे भाव वाढतील या आशेने घरात ठेवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी अत्यल्प दरात विक्रीस काढले आहे. त्यामुळे सध्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजार समितीत मात्र व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर असे चित्र आहे.
टिटवाळा येथे महावितरणकडून २४ लाखाची वीज चोरी उघड
कल्याण : महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरी करणाऱ्या वीज ग्राहकांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. गेल्या महिन्यात टिटवाळ्यात वीज ग्राहकांच्या घरांच्या तपासणीत ८७ जणांकडे २४ लाख २० हजार रुपयांची वीजचोरी आढळली. या सर्व ८७ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Live News : एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर येताच बैठकांना जोर
दादर येथे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आज पार पडली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे हे देखील व्हीसीद्वारे उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले. ६ डिसेंबर रोजी येणाऱ्या अनुयायांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालये, जेवण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे तसेच येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.
मंत्रिमंडळातील नावांवर होणारी चर्चा म्हणजे केवळ अंदाज, छगन भुजबळ यांचा दावा
सध्या मंत्रिमंडळात कोणाचा सहभाग असणार, याविषयी वेगवेगळ्या नावांवर होणारी चर्चा म्हणजे केवळ अंदाज आहे, असे राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.
रुग्णालयात दाखल होताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, प्रकृतीविषयी दिली माहिती
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांना माध्यमांनी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता प्रकृती बरी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
#WATCH | Thane: On being asked about his health condition, Maharashtra Caretaker CM Eknath Shinde says "Badhiya hai." pic.twitter.com/EvejRPRkbP
— ANI (@ANI) December 3, 2024
घाटकोपर फलक दुर्घटनाप्रकरणी माजी संचालिकेला जामीन
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात महाकाय लोखंडी फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. यातील मुख्य आरोपी भावेश भिंडे हाही जामिनावर बाहेर असून त्याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला आहे.
वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम लवकरच सुरू, आवश्यक परवानग्या मुंबई महापालिकेला प्राप्त
मुंबई : वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आवश्यक असलेली सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्राची केंद्राची व राज्याची परवानगी मुंबई महापालिकेला मिळाली आहे. आता केवळ वनखात्याची परवानगी शिल्लक असून ती महिन्याभरात मिळण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; नेते म्हणाले, “परिस्थिती जटील, पक्षाचा निर्णय…”
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणाच्याही संपर्कात नव्हते. दिल्लीतील बैठक संपल्यानंतर ते थेट दरे या त्यांच्या गावी गेले. तेथून परतल्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नसून आज त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रु्गणालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना घशाचा संसर्ग झाला असून ताप आणि अशक्तपणा असल्याचं शिवसेनेचे नेते सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुशिक्षित बेरोजगार अभियंते म्हणतात आमच्यावर अन्याय”, काय आहे कारणे ?
चंद्रपूर :सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ४० टक्के, सोसायट्यांना २६ टक्के तर खुल्या कंत्राटदारांना ३४ टक्के कामे देण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र या धोरणला हरताळ फासण्याचे काम जिल्हा परिषदेत सुरू आहे. सुशिक्षित अभियंत्यांना कामे मिळू नये म्हणून कार्य स्थळी भेट बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित अभियंते कामापासून वंचित राहिले आहेत.
डोंबिवलीत गरीबाचा पाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता रूंदीकरणातील व्यापारी गाळे जमीनदोस्त
डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या १५ मीटर रस्त्याला बाधित होणारे २५ व्यापारी गाळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तोडून टाकले.
मासेमारी नौकेची पाणबुडीला धडक, दोन खलाशांचा मृत्यू
मुंबई : पाणबुडीला मासेमारी नौकेने धडक दिल्याची घटना अरबी समुद्रात घडली असून या धडकेत नौकेवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला. या अपघातात नौसेनाच्या पाणबुडीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मासेमारी नौकेवरील तांडेलविरोधात मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणे : टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी चोरी
ठाणे : टेस्ट ड्राईव्ह करून येतो असे सांगत दुचाकीच चोरी केल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर प्रकरणी सीआयडीचे वर्तन संशयास्पद
मुंबई : बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीचा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गांभीर्याने तपास करत नसल्यावरून उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.
नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटले ‘या’ नवीन नावाने…
नागपूर : देशातील विविध रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यात नागपुरातील इतवारी रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. या रेल्वेस्थानकावर पुनर्विकासाचे काम पूर्ण झाल्याने स्थानकाचे रूपडे पालटले आहे. केंद्राच्या अमृत भारत स्टेशन योजनेत देशातील १,३३७ स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील मोटार अपघातात दाम्पत्याचा मृत्यू
राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे फाट्यावर दोन भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाल्याने सुरत येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करणार
ताप आणि अशक्तपणा वाढल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.
वर्धा : धक्कादायक! बदनामी केली म्हणून महिलेचा खून…
वर्धा : बदनामी केली म्हणून संतप्त होण्याचा प्रकार नवा नाही.पण थेट खून करण्याची मानसिकता अफलातूनच. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरात रहस्य सापडले. खेक शिवारात जंगल परिसरात अज्ञात महिलेची कवटी व हाड, कपडे, दागिने, मेडिकल पट्टा असे साहित्य दिसून आले होते.
३० लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष्य एमएमआर ग्रोथ हब’साठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट; म्हाडाचा आठ लाख घरांसाठी प्रारूप आराखडा
मुंबई : देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी निती आयोगाच्या शिफारशीनुसार मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार आहे.
Maharashtra Live News : मुंबईतील मुख्यालयात भाजपाच्या नेत्यांची बैठक सुरू
#WATCH | Maharashtra BJP leaders hold a meeting at the party's state office in Mumbai.
— ANI (@ANI) December 3, 2024
(Video Source: BJP) pic.twitter.com/rjq9Fqn2gI
शरद पवार गटाचा ईव्हीएमविरोधातील आजचा मोर्चा रद्द
नाशिक : राष्ट्रवादीच्या वतीने (शरद पवार) मंगळवारी दुपारी ईव्हीएम विरोधात काढण्यात येणारा आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात मित्रपक्षांसह नंतर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले बहुमत हे संशयास्पद असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात येणार आहे. राजकीय पटलावर ईव्हीएमविषयी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मंगळवारी बी,.डी.भालेकर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर गजानन शेलार यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले होते. मतदानात मोठा घोळ झाला असून मते वाढली कशी, असा प्रश्न या मोर्चाच्या माध्यमातून विचारला जाणार होता. नाशिककरांनी तसेच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले होते. परंतु, आता पक्षाच्या वतीने मोर्चा रद्द करण्यात आला आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागर किनारी सिगल पक्ष्यांचे आगमन
हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झालेल्या या परदेशी पाहुण्यांमुळे मालवण दांडी, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत.
Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री शपथविधीसाठी खास चार जॅकेट तयार!
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे चार जॅकेट बनविण्यात आले असून ते घेऊन गोविंद टेलर मुंबईला रवाना झाले आहे.
भिवंडीत १२ वर्षानंतर भटक्या श्वान निर्बिजीकरण केंद्र
ठाणे : भिवंडीत मागील काही महिन्यांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढत असून काही भटके श्वान लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत. तर अनेकदा श्वान देखील जखमी होत असतात. या प्रकारानंतर भिवंडी महापालिकेने आता निर्बिजीकरण आणि श्वानांवर उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात दररोज १० ते १५ श्वानांवर उपचार होऊ लागले आहे.