Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे राज्याच्या गादीवर पुन्हा एकदा महायुतीचा मुख्यमंत्री बसणार आहे. परंतु, या मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही समोर आलेला नाही. ५ डिसेंबर रोजी राज्यात शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीची जोरदार तयारीही सुरू झालीय. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् अन्य खातेवाटप अद्यापही झालेलं नाही. त्यामुळे कोणाच्या पारड्यात कोणतं पद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या चर्चांना उशीर होत आहे. तसंच, त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरीही ते मुख्यमंत्री पदासह इतर अनेक पदांसाठी अडून बसल्याची चर्चा आहे. गृहमंत्री पदावरही त्यांना दावा केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राज्यात आगामी काळात काय चित्र असेल हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Politics Live Updates : सत्ता स्थापनेचा तिढा कधी संपणार? राज्यातील घडामोडी वाचा

12:12 (IST) 3 Dec 2024
Maharashtra Live News : एकनाथ शिंदे आज घेणार बैठक; महायुतीच्या नेत्यांशीही करणार चर्चा!

एकनाथ शिंदे आज दुपारी सह्याद्रीला बैठक घेणार आहेत. ती बैठक घेतल्यानंतर सायंकाळी महायुतीच्या वरिष्ठ नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक होईल – संजय शिरसाट

12:11 (IST) 3 Dec 2024

‘सिकंदर का मुकद्दर’ चित्रपटात फ्लेमिंगो पक्ष्यांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण, नवी मुंबईतील पक्षिप्रेमींची नाराजी

मुंबई : ‘नेटफ्लिक्स’वर सध्या प्रसारित झालेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटात फ्लेमिंगो पक्ष्यांचे ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण करण्यात आल्याने पक्षिप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ड्रोनमुळे फ्लेमिंगो जखमी होण्याची वा विचलित होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत पक्षिप्रेमींनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 3 Dec 2024
शपथविधीच्या तयारीला वेग, फडणवीसांकडून थेट नागपुरातील चहाविक्रेत्याला आमंत्रण; नेमकं कनेक्शन काय?

राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. निर्वावाद बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री आणि इतर खात्यांबाबत अद्यापही अधिकृत माहिती आलेली नसली तरीही शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. दरम्यान, नागपुरातील एका चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण आलं आहे. गोपाळ बावनकुळे या चहाविक्रेत्याला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आमंत्रण पाठवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चहाविक्रेत्याच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा फोटोही लावला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

11:53 (IST) 3 Dec 2024

टीएमटीची विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, गेल्या अकरा महिन्यात ६ हजाराहून अधिक प्रवाशांवर कारवाई

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या अकरा महिन्यांत ६ हजार ९७५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १२ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 3 Dec 2024

गोंदिया जिल्ह्यात नक्षल सप्ताह, पोलिसांची काय आहे तयारी ?

दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवादी पीएलजीए सप्ताह पाळतात. या दरम्यान नक्षलप्रभावित भागात नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होते.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 3 Dec 2024

सरत्या वर्षात अवकाशात फिरत्या चांदणीची पर्वणी

महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी या अनोख्या आकाश नजाऱ्याचा आनंद घेता येईल. मात्र, स्थानपरत्वे मुंबई ते नागपूरकडे जाताना वेळेत किंचित वाढ तर उंची, दिशा, तेजस्वीतेत काही बदल होताना दिसणार आहे, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 3 Dec 2024

शरद पवार गटाचा ईव्हीएमविरोधातील आजचा मोर्चा रद्द

नाशिक : राष्ट्रवादीच्या वतीने (शरद पवार) मंगळवारी दुपारी ईव्हीएम विरोधात काढण्यात येणारा आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला आहे. मतदानात मोठा घोळ झाला असून मते वाढली कशी, असा प्रश्न या मोर्चाच्या माध्यमातून विचारला जाणार होता.

11:18 (IST) 3 Dec 2024

एप्रिलपर्यंत दोन्ही पूल सेवेत गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या कामाला वेग; बर्फीवाला पूल उन्नतीकरणाचे कामही लवकरच

मुंबई : निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजू तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 3 Dec 2024

स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन

या भागातील लोकप्रतिनिधी, तसेच प्रवाशांची स्टेशनसाठी होत असलेली मागणी विचारात घेत महामेट्रोने येथे पाहणी केली.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 3 Dec 2024

पुणे : हरवलेल्या बालकाचा चार तासांत शोध; पोलीस आणि सजग महिलेची तत्परता

वाघोली भागात तीन वर्षांचा मुलगा सापडल्याची माहिती छायाचित्रासह पोलिसांनी त्वरीत समाज माध्यमात प्रसारित केली.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 3 Dec 2024

दोन मुलांना शाळेत सोडताना तीन हेल्मेट हाताळायचे कसे? संतप्त महिला पालकांचा सवाल

वाहतूक पोलीस विभागाने दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या सहप्रवाशाला हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. पोलिसांच्या या निर्णयाला शहरभरातून विरोध होत असून महिला संतप्त झाल्या आहेत.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 3 Dec 2024

राजकीय जीवनातील पहिल्याच पायरीत रोहित पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची दोन महत्वाची पदे आता सांगली जिल्ह्याच्या वाट्याला आली आहेत.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 3 Dec 2024

वर्धा : शपथविधी आणि मंत्रीपदासाठी लॉबिंग, मात्र ‘हे’ चार म्हणतात…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी चार डिसेंबर रोजी विधान भवनाच्या सेंट्रल हॉल मध्ये नवनिर्वाचित विधानसभा सदस्य तसेच विधान परिषद सदस्यांची म्हणजेच आमदारांची बैठक सकाळी दहा वाजता बोलावली आहे.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 3 Dec 2024

नवी मुंबईत कचऱ्याचे ढीग; ऐरोली, घणसोली, कोपरखैरणेत स्वच्छ भारत मोहिमेची ऐशीतैशी

Heaps of Garbage in Navi Mumbai: सध्या जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग आणि स्वच्छतेच्या आघाडीवर दिसणाऱ्या दिरंगाईमुळे स्वच्छ नवी मुंबई मोहिमेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 3 Dec 2024

शिवशाही बस अपघातावर महत्वाची अपडेट… तांत्रिक विश्लेषणातून…

नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला होता. या अपघातात ११ प्रवासी ठार तर २८ प्रवासी जखमी झाले होते.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 3 Dec 2024

खारघरमध्ये महत्त्वाकांक्षी भारत-आफ्रिका व्यापार केंद्र प्रकल्प, रोजगारनिर्मितीला हातभार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून लगतच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी जगभरातील वेगवेगळ्या देशांना व्यापार केंद्राच्या उभारणीसाठी भूखंड दिले जाणार असून हे संपूर्ण क्षेत्र भविष्यात देशातील सर्वात मोठे व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्याचा सिडको आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 3 Dec 2024

राज्यातील शेकडो धरणांचे पाणी नियोजन अधांतरी, सिंचन आरक्षणावरही परिणाम

जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत धरणांतील जलसाठ्याच्या नियोजनाचा विषय पुढे सरकणार नाही, असे खुद्द पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 3 Dec 2024

“एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात”, राऊतांच्या दाव्याने खळबळ; सत्ता स्थापनेचा तिढा वाढणार?

राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालेलं असतानाही मुख्यमंत्री पदाचं घोंगडं अद्यापही भिजत आहे. सत्तास्थापनेची तारीख ठरलेली असली तरीही मंत्रिमंडळातील खातेवाटपावर चर्चा झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द होत असल्याने चर्चा पुढे सरकत नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र, यावरून संजय राऊतांना वेगळाच संशय आला आहे. दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेंच्या पाठिशी असल्याने एकनाथ शिंदे भाजपाला डोळे वटारून रुसवे फुगवे करू शकत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

सविस्तर वृत्त वाचा

11:05 (IST) 3 Dec 2024

Maharashtra Live Blog : “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद द्या”, शिवसेनेची आग्रहावर ठाम!

लोकांना अपेक्षा होती की राज्यातील मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. पण त्यांनी हे स्वतःहून पद सोडल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पद देत असताना गृहमंत्रीपदही द्यावं. त्यांनी सत्तेत राहावं अशी सर्व आमदारांची इच्छा आहे – गुलाबराव पाटील</p>

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह