Maharashtra Breaking News Updates: २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची असल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुका महायुतीनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. त्यानंतर आलेल्या निकालांमध्ये भाजपाला १३२ जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद जाईल अशीच चर्चा पाहायला मिळाली. पण त्यानंतर १० दिवस उलटल्यानंतरही नावाची घोषणा न झाल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं दिसून आलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Politics Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
‘त्याने’ अनेकांचे प्राण वाचविले; पण त्याचा जीव धोक्यात आला तेव्हा….
नियती, नशीब कधी काय करेल याचा कुणीच अंदाज व्यक्त करू शकत नाही, असे म्हणतात. लोणार तालुक्यातील एका अपघातात याचा दुर्देवी प्रत्यय आला.
बुलढाणा : हो खरंय; करोडपती आमदार मतदानानंतर ‘लखोपती’!
शीर्षक वाचून कुणीही बुचकळ्यात पडणे स्वाभाविक आहे. कारण बहुतेक उमेदवार करोडपती असताना मतदानानंतर लखोपती कसे झाले? असा प्रश्न त्यांना पडणार आहे.
आणखी एका पराभूत उमेदवाराची ईव्हीएमवर शंका… अडीच लाख रुपये भरून….
राजुरा मतदार संघात भाजपाचे देवराव भोंगळे अवघ्या ३ हजार ५४ मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे मतमोजणी सुरू झाल्यानंतर जवळपास पंधराव्या फेरीपर्यंत भोंगळे तिसऱ्या क्रमांकावर होते.
जल्लोषातून पालकमंत्रिपदावर दावा, भाजपची अजित पवार गटाला शह देण्याची तयारी
भाजपच्या महाराष्ट्र विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
नाशिक : नायलॉन मांजा निर्मिती, विक्री, वापरकर्ते आता तडीपार, पोलीस आयुक्तांचा कारवाईचा इशारा
पतंगोत्सवात वापरल्या जाणाऱ्या नायलॉन, चिनी व काचेचे आवरण असणाऱ्या मांज्यामुळे आजवर अनेक जण जायबंदी झाले आहेत.
तेलंगणाच्या महाकाय प्रकल्पामुळे धोका वाढला! गडचिरोलीला चार वर्षांत चार भूकंपाचे धक्के…
गेल्या चार वर्षात या परिसरात चारवेळा भूकंप झाला आहे. त्यापैकी बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता सर्वाधिक होती.
“आमदार गायकवाड यांच्या आरोपात तथ्य, पंख छाटण्याचा हा प्रकार…”, ‘या’ नेत्याची खासदार व आमदाराच्या वादात उडी
विधानसभा निवडणुकीत ‘शांत’ राहिल्यावर आणि ८४१ मतांच्या अल्प फरकाने विजयी झाल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी आपले मौन सोडले.
ठाणे जिल्ह्यात भाजपचा जल्लोष, शिंदेच्या सेनेत मात्र शुकशुकाट
ठाणे : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेते पदी निवड झाल्याने मुख्यमंत्री पदी त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ठाणे आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत एकमेकांना लाडू भरविले. तर, दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेत मात्र शुकशुकाट दिसून आला.
“देवेंद्रजींची मनिषा आम्ही पूर्ण केली, आज त्यांनी आमची…”, कोण म्हणतय असं?
सर्व चारही आमदार व जिल्हाध्यक्ष हे पूर्वीच फडणवीस यांना भेटून आले. तेव्हा जिल्ह्यास मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा बोलून दाखविली होती.
गटनेता निवडीच्या बैठकीत अकोल्याला मानाचे स्थान, आ. रणधीर सावरकरांवर…
गटनेता निवडण्यासाठी पक्ष निरीक्षक केंद्रीय अर्जमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदारांची बैठक घेण्यात आली.
कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात न्यायबंदीला मारहाण
कल्याण – येथील आधारवाडी तुरुंगातील एका न्यायबंदीला इतर सात न्यायबंदींनी मंगळवारी सकाळी दगड आणि बादलीच्या साहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत एका न्यायबंदीच्या डोळे, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एका न्यायबंदीच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्रीपद कुणाला मिळणार… सलग दहा वर्षांपासून नागपूर…
राज्यातील महत्वाच्या व वजनदार खात्यापैकी एक म्हणून ऊर्जा खात्याकडे बघितले जाते. त्यामुळे ऊर्जामंत्रीपद मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गजांकडून प्रयत्न होतात.
शहांसाठी ताटकळणारे अजित पवार हिरमसून अखेर मुंबईला रवाना; भेट मागितलीच नव्हती, अजितदादांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाब आणण्याचा प्रयत्न सपशेल फसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत २४ कोटींचे अमलीपदार्थ जप्त, पाच जणांना अटक; अमलीपदार्थांसह दोन कोटी रोखही हस्तगत, डीआरआयची कारवाई
मुंबईः हैदराबादवरून मुंबईत आलेले १६ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत २४ कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआयकडून देण्यात आली. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यता आली.
कल्याणमध्ये सहा लाखाचा गुटखा जप्त
कल्याण – येथील पश्चिमेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा लाख ६८ हजार रूपयांचा प्रतिबंधित गुटखा मंगळवारी जप्त केला. या प्रकरणात गुटख्याची विक्री करणाऱ्या तीन जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीच्या गाळ्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री केली जाते, अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी याठिकाणी मंगळवारी छापा टाकला. त्यावेळी त्यांना राजनिवास सुगंधित पान मसाला, राजश्री पान मसाला, कॅश गोल्ड मसाला, बाजीराव गोल्ड मसाला, जेड एल, डबल ब्लॅक, व्हीसी, मस्तानी या प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटख्याची पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत सहा लाख ६८ हजार रूपये आहे.
महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न व सुरक्षा कायद्याने गुटखा, पानमसाला, सुंगंधी तंबाखू यांची निर्मिती, साठवण, वाहतूक आणि विक्रीला प्रतिबंध केला आहे. हे प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ आरोग्यास अपायकारक आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारखे दुर्धर रोग होऊ शकतो यासाठी शासनाने या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घातले आहेत. हे माहिती असुनही या प्रकरणातील तिन्ही विक्रेत्यांनी सुगंधीत तंबाखु, पानमसाला विक्रीसाठी साठवण केला म्हणून मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार बालाजी गरूड यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुरबाडची विस्तारीत पाणी योजना मार्गी दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा जाहीर
बदलापूरः मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील विस्तारीत भागासाठी आवश्यक असलेल्या पुरक पाणी योजनेला गती मिळणार आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नुकतीच निविदा मागवण्यात आल्या असून २३ कोटी २२ लाखांच्या या खर्चातून ही योजना राबवली जाणार आहे.
जळगावमध्ये ईव्हीएम विरोधात मोर्चा
मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होताच संघ स्वयंसेवकामध्ये आनंद….
भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी संघाचे स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आल्याचे जाहीर होताच अनेक संघ स्वयंसेवकानी आनंद व्यक्त केला.
‘फेईंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम…या भागाला तर थेट सतर्कतेचा इशाराच…
नागपूर : ‘फेईंगल’ चक्रीवादळ महाराष्ट्रावर परिणाम करणार नाही, असाच अंदाज तो येईपर्यंत दिला जात होता. मात्र, आता या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवू लागला आहे. राज्यातील हवामान सध्या चांगलेच बदलले असून या हवामानाला आता लोकही कंटाळले आहेत.
Maharashtra Government Formation Live Updates: अजित पवारांना सकाळ-दुपार-संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव – एकनाथ शिंदे
यावेळी एकनाथ शिंदेंनी मंत्रीमंडळात सहभागी होणार की नाही हे तत्काळ सांगितलं नसलं, तरी अजित पवारांनी लागलीच मी तर शपथ घेणार आहे असं सांगून टाकलं. त्यावर एकनाथ शिंदेंनी ‘अजित पवारांना अनुभव आहे संध्याकाळीही शपथ घ्यायचा आणि सकाळीही शपथ घ्यायचा’, असं म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
Maharashtra Government Formation Live Updates: खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतंय – एकनाथ शिंदे
अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिफारस केली होती. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही शिफारसपत्र दिलं आहे. मी साधा गावी गेलो तरी तुम्ही तुमच्या चर्चा चालवत असता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा मला आनंद आहे – एकनाथ शिंदे

Maharashtra Government Formation Live Updates: अचानक दिल्लीला का गेलो होतो? अजित पवारांनी सांगितलं कारण…
मी एक खुलासा करू इच्छितो. मी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मी कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. मी अमित शाह यांना भेटायलाच गेलो नव्हतो, तर भेट नाकारायचा प्रश्नच येत नाही. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्य म्हणून ११ जनपथ हा बंगला देण्यात आला आहे. त्या बंगल्यावर काय बदल करता येतील, हे बघण्यासाठी आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो. शिवाय सर्वोच्च न्यायालयात आमच्या खटल्याचं काम पाहणाऱ्या वकिलांना भेटणं आणि एका जवळच्या नातेवाईकाचं लग्न अशा तीन गोष्टींसाठी प्रामुख्याने मी दिल्लीला गेलो होतो – अजित पवार

Maharashtra Government Formation Live Updates: एकनाथ शिंदेंनाही मंत्रीमंडळात राहण्याची फडणवीसांकडून विनंती…
मी एकनाथ शिंदेंना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रीमंडळात राहावं. त्यामुळे त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे आम्ही तिघे व आमच्या पक्षाचे इतर नेते, मित्रपक्ष असे मिळून चांगलं सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न आम्ही करू – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Government Formation Live Updates: सत्तास्थापनेचा दावा सादर…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या आझाद मैदान येथे शपथविधी पार पडेल – देवेंद्र फडणवीस

आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. ५ नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपालांनी आम्हाला शपथविधीची वेळ दिली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमान पक्ष, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झाली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र आम्ही दिलं आहे – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Government Formation Live Updates: महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते राजभवनावर दाखल
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर फडणवीसांसह अजित पवार व एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल झाले आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी ते राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन संख्याबळ पाठिंब्याचं पत्र ते राज्यपालांना सुपूर्द करणार आहेत.
पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सावळागोँधळ, ग्राहक सेवा केंद्रांवर कारवाईचा इशारा
नाशिक : लागवड केलेली नसताना विमा काढणे, लागवड क्षेत्रापेक्षा अधिकचे क्षेत्र संरक्षित करणे, एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिकवेळा विमा उतरवणे असे प्रकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत घडल्याचे कृषी विभागाच्या पडताळणीत उघड झाले आहे.
नंदुरबार : घरासाठी केलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू
घरासाठी तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाला.
नववर्षात पुणेमुंबई प्रवास सुसाट, ठाणे खाडी पूल तीनच्या दुसऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
कात्रज चौकाची ‘कोंडी’… वाहतुकीचा बोजवारा
पुणे : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त मंगळवारपासून वाहतुकीत बदल करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. दररोजच्या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाद्वारे जावे लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र होते.
Maharashtra Politics Updates: मुख्यमंत्रीपद, मंत्रीमंडळ निश्चिती व शपथविधी.. वाचा सर्व घडामोडी!