Maharashtra Breaking News Updates: २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची असल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुका महायुतीनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. त्यानंतर आलेल्या निकालांमध्ये भाजपाला १३२ जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद जाईल अशीच चर्चा पाहायला मिळाली. पण त्यानंतर १० दिवस उलटल्यानंतरही नावाची घोषणा न झाल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं दिसून आलं.
Maharashtra Politics Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
पोलिसांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा दोन वर्षांनी रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पुणे : जंगली महाराज रस्ता परिसरात वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे चित्रीकरण समाज माध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालायच्या आदेशामुळे तक्रारदार नागरिकाला दिलासा मिळाला आहे. याबाबत विजय सागर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली होती.
ते अखेर ‘आलेच’, त्या फलकांचा अर्थ आत्ता उलगडला
नागपूर : फडणवीस यांच्या नागपूर शहरात पाठमोरा फोटो असलेलेल शेकडो फलक शहराच्या विविध भागात लागले होते. त्यात लिहिले होते. मी पुन्हा येणार आणि ते खरेच ठरले. ते पुन्हा आले. तो पाठमोरा फोटो होता देवेंद्र फडणवीस यांचा. ते उद्या मुख्यमत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानापुढे जल्लोष
नागपूर : भाजप गटनेते पदाची घोषणा होताच देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा उत्सव साजरा केला. . देवाभाऊ आगेबढो च्या घोषणा देण्यात आल्या देवेंद्र फडणवीस यांचा नाव भाजपचे कोर कमिटीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी निश्चित होताच नागपुरात त्यांच्या घरासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय.
मामाच्या गावी बालिकेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
कराड: मामाच्या गावाला आलेल्या बालिकेचा घरामागील विहिरीत पडून मृत्यू झाला. वारुंजी (ता. कराड) येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली. कराड शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
ओवी विश्वास जाधव (वय ४) मुळ रा. तासवडे (ता. कराड) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
विदर्भाची भाजपला साथ, काँग्रेसचीही राखली लाज
विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. २०१९ च्या तुलनेत या पक्षाच्या २८ जागा वाढल्या. यात सर्वाधिक ९ जागा विदर्भातील आहेत.
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस विदर्भातील पाचवे, नागपुरातील दुसरे मुख्यमंत्री
Devendra Fadnavis New CM of Maharashtra : वसंतराव नाईक यांच्यानंतर पूर्णवेळ पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्या वैदर्भीय नेत्यांनी काम केले त्यात देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.
तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमताने सुमारे ४५ लाख रुपयांना फसवणूक केली होती.
जेष्ठांनी जीवाला जपायचे की हेल्मेटला? सक्तीमुळे पेच
नागपूर : उतारवयात दुचाकी चालवणे खूप अडचणीचे असते. मात्र, नाईलाजास्तव दुचाकी चालवून कामे करावी लागतात. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी मनमर्जी करीत दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती केली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जायचंय्? मग ‘हे’ वाचाच…
अकोला : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अनारक्षित गाड्यांचे नियोजन केले.
सावधान! ‘डिजिटल अरेस्ट’ नव्या ‘सायबर फ्रॉड’चा धोका; अशी होते फसवणूक…
अकोला : ऑनलाइन व्यवहार करतांना आता ‘डिजिटल अरेस्ट’ नव्या ‘सायबर फ्रॉड’चा धोका निर्माण झाला आहे. अधिकारी असल्याचे बतावणी करून सायबर गुन्हेगार फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
‘लाडकी बहीण योजने’च्या वैधतेबाबत राज्य शासन गप्प, उच्च न्यायालयाकडून आता…
नागपूर : राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी योजनेच्या कायदेशीर वैधतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. याबाबत राज्य शासनाला उत्तर सादर करण्याकरिता ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शेवटची संधी दिली होती.
Maharashtra Government Formation Live Updates: देवेंद्र फडणवीसांनी भाषणातून दिले तडजोडीचे संकेत
आपल्याला सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक मोठं ध्येय घेऊन राजकारणात आलो आहोत. फक्त पदांसाठी आलेलो नाही. त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, काही गोष्टी मनाविरुद्ध होतील. तरीही आपण सगळे व्यापक हितासाठी एकत्र काम करू आणि आपली शक्ती दाखवून देऊ – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Government Formation Live Updates: ७२ दिवसांसाठी तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो – देवेंद्र फडणवीस
एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी या पदावर बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो – देवेंद्र फडणवीस

मी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानतो. आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि आमच्या सर्व मित्रपक्षांचेही आभार मानतो. संविधानाची यावेळी ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वार्थानं महत्त्वाचं असं हे वर्षं आहे. मोदी नेहमी सांगतात की कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा माझ्यासाठी देशाचं संविधन सर्वात महत्त्वाचं आहे. या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा अधिकार दिला. भारताला उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा सरकार स्थापन करतोय – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Government Formation Live Updates: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित
मी सगळ्यांचे आभार मानतो की विधिमंडळ गटनेता म्हणून सगळ्यांनी माझी निवड केली. यावेळची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं जर झालं तर या निवडणुकीनं आपल्यासमोर एक गोष्ट निश्चित केली आहे. ती म्हणजे एक है, तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने दिलेल्या कौलानंतर जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेचा हा निर्णय संपूर्ण भारतासाठी एक संदेश आहे. या नियमित विधानसभा निवडणुका नाहीत. लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील निवडणुका महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. महाराष्ट्रात मिळालेला अभूतपूर्व विजय विकसित भारतच्या दिशेनं मोठा संदेश आहे. जनता त्यांच्या अनुभवाच्या आधारे निर्णय घेत असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारकिर्दीला कंटाळून जनतेनं हा कौल दिला आहे – निर्मला सीतारमण

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पहिल्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २०१९ ला अजित पवारांसोबत भल्या सकाळी त्यांनी घेतलेली शपथ बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता उद्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे.
मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सूचित करतो – चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनीही फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
Maharashtra Government Formation Live Updates:५ नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी
आपल्या १३६ जागा निवडून आल्या आहेत. मित्रपक्षांसह एकूण २३७ आमदारांचा आपला विधानमंडळाचा गट आहे. फक्त भाजपाचा विचार केला तर १३२ अधिक ५ अपक्ष असा १३७ आमदारांचा गट असणार आहे – चंद्रशेखर बावनकुळे

वृद्ध, नोकरदार महिलांसाठी म्हाडाकडून वसतिगृह, उत्पन्न गटानुसार सुविधा
मुंबई : म्हाडाने सामाजिक बांधिलकी जपत ‘एमएमआर ग्रोथ हब’मध्ये गृहनिर्मितीसह वृद्ध आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ग्रोथ हब’मधील आठ लाख घरांच्या प्रारूप आराखड्यात यासंबंधीचा समावेश करण्यात आला आहे.
कारावास भोगलेल्या नागरिकांना निवृत्तीवेतन
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांचे रखडलेले निवृत्तिवेतन देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील निवृत्तिवेतनासाठी सरकारने नऊ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे.
भूसंपादनाआधीच पुलाचे कंत्राट, गोरेगाव खाडीवरील प्रकल्पाच्या कामाला कंत्राटदार नेमणुकीनंतरही दिरंगाई
मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने गोरेगाव खाडी पुलावर भगतसिंग नगर झोपडपट्टी परिसरातून पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलासाठी ३२५ कोटी रुपयांचे कंत्राट देऊन दोन वर्षे झाली तरी पुलाचे काम एक इंचही झालेले नाही.

भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा झाल्यानंतर उद्या अर्थात ५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान येथे नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. संध्याकाळी पाच वाजता हा शपथविधी होणार असून त्यासाठी देशभरातील राजकीय दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले
पुणे : बांगलादेशी घुसखोर तरुणीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, आमतुली, जि. बोरगुना, बांगलादेश) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Maharashtra Government Formation Live Updates: देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस विधानभवन येथे दाखल
? 10.20am | 4-12-2024?Vidhan Bhavan, Mumbai | स. १०.२० वा. | ४-१२-२०२४?विधान भवन, मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2024
? Arrival at Vidhan Bhavan, Mumbai
? विधान भवन, मुंबई येथे आगमन
? विधान भवन, मुंबई में आगमन#Maharashtra #Mumbai #VidhanBhavan pic.twitter.com/0ABnbrRtOd
Maharashtra Government Formation Live Updates: देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब!
भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार त्यासंदर्भातला प्रस्ताव विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांडणार आहेत. आशिष शेलार व रवींद्र चव्हाण या प्रस्तावाला अनुमोदन देणार आहेत.
Maharashtra Government Formation Live Updates: चंद्रकांत पाटील गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडणार
भाजपाच्या विधिमंडळ पक्ष बैठकीत चंद्रकांत पाटील गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडणार आहेत.
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाचे सगळे आमदार फेटे बांधून उपस्थित झाले आहेत. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक थोड्या वेळात सुरू होणार असून थोड्याच वेळात पक्षाचा गटनेता निश्चित केला जाणार आहे.
Maharashtra Politics Updates: मुख्यमंत्रीपद, मंत्रीमंडळ निश्चिती व शपथविधी.. वाचा सर्व घडामोडी!