Maharashtra Politics Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवस झाले तरी अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल देऊनही महायुती सत्तास्थापनेचा दावा करू शकलेली नाही. आधी मुख्यमंत्रीपद व आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरून महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष भाजपा व शिवसेनेत (शिंदे) रस्सीखेच चालू आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहखाते मिळावे, या मागणीवर ते ठाम असून भाजपाची त्यास तयारी नाही. त्यामुळे आता गृहखात्यावरून तिढा असून हे खाते कोणाकडे जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता असून त्या वेळी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल. यासह महायुतीत खातेवाटपावरही चर्चा होऊ शकते. दिवसभरात घडणाऱ्या या सर्व राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
केजरीवालांपाठोपाठ उद्धव ठाकरे काँग्रेसला धक्का देणार? आगामी निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मागणी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (१ डिसेंबर) जाहीर केलं की दिल्लीच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी किंवा युती करणार नाही. हरियाणा व महाराष्ट्राच्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचं नुकसान होऊ लागलं आहे. आता शिवसेना (ठाकरे) देखील काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगतेय. अशातच शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी देखील तशीच मागणी केली आहे. पुण्यात आज शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी अहिर म्हणाले की "पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विभागनिहाय चर्चा करण्यात आली. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं. यावेळी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की आगामी निवडणुका आपण स्वबळावर लढवायला हव्यात की महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुकांना सामोरं जायला हवं? यावेळी बरेच पदाधिकारी म्हणाले की आपण आगामी निवडणूक स्वबळावर लढवली पाहीजे. तर बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणाले की आपण ही महाविकास आघाडी केली आहे. ती कायम ठेवली पाहिजे. आपण महाविकास आघाडी म्हणून आगामी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरं जावं लागेल".
चार कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक
पुणे : व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे ‘मतदारांच्या मनातील आमदार’…साकोलीतील फलकाची जोरदार चर्चा
साकोली मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात लढत झाली.
कोकणातील ढासळलेले गड सावरण्याचे उद्धव ठाकरेंपुढे मोठे आव्हान
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन ती कोकणात मोठ्या प्रमाणावर रुजविली. कोकण म्हटले की, ठाकरे यांची शिवसेना तळागाळात पहावयास मिळत होती.
शिवशाही बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती; चालकाने या पूर्वी ५ वेळा …
या अपघातात तब्बल ११ जणांनी नाहक प्राण गमावले. या प्रकरणी एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी चालकाला निलंबित केले असून या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आईला रुग्णालयात भेटून घरी जाताना १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
मुंबई : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईला भेटून घरी जाणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाचा नागपाडा परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मृत मुलगा दुचाकीच्या मागे बसला होता. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात नागपाडा पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुलाब्यातील प्रकल्पाला पालिकेची स्थगिती?
मुंबई : दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल अर्थात फिरते चक्र (मेरी गो राऊंड) तयार करण्याच्या प्रकल्पाला पालिका प्रशासनाने स्थगिती दिल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष व भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आलेल्या चार प्रकल्पांना आतापर्यंत पालिका प्रशासनाने स्थगिती दिल्याचा आरोपही त्यांनी केला असून पालिका प्रशासन हे कुलाबा विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नवनियुक्त पोलीस कर्मचारी रिक्षात विसरला महत्त्वाची कागदपत्र आणि गणवेश
ठाणे : नगर येथील रहिवासी असलेला नवनियुक्त पोलीस कर्मचारी सोमवारपासून ठाणे पोलीस दलात त्याचे कर्तव्य बजावण्यास सुरूवात करणार होता. परंतु त्यापूर्वीच त्याच्याकडील रूजू होण्याची, इतर महत्त्वाची कागदपत्र आणि गणवेशाची बॅग रिक्षात विसरला. परंतु वाहतुक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत ही बॅग त्याला पुन्हा मिळाली. बॅग मिळताच कर्मचाऱ्याचा जीव भांड्यात पडला.
डोंबिवलीत मालमत्ता कर थकविणाऱ्या क्रिटीकल केअर सेंटरसह पाच गाळे सील, पालिकेच्या ग प्रभागाची कारवाई
डोंबिवली : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या येथील ग प्रभाग हद्दीतील वाणीज्य वापर असलेल्या पाच आस्थापना ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सील केल्या. या मालमत्ताधारकांकडे एकूण १६ लाख ५४ हजार ९७७ रूपयांची थकबाकी आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी, मंत्र्यांना बंगले; कर्मचारी एका खोलीत चार !
एकीकडे मंत्री, राज्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले, स्वतंत्र गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मात्र एका खोलीत दोनहून अधिक कर्मचारी,अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा...
मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्याआधी नागपूरमध्ये चेहरा नसलेल्या नेत्याचे बॅनर्स, काय आहे संकेत?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपसह महायुतीने दमदार कामगिरी करत विजय प्राप्त केला.
आईला रुग्णालयात भेटून घरी जाताना १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
मुंबई : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईला भेटून घरी जाणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाचा नागपाडा परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मृत मुलगा दुचाकीच्या मागे बसला होता. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात नागपाडा पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बांगलादेश कॅनडातील हिंदूंवरील हल्ल्यांना मोदी जबाबदार, संजय राऊतांचा आरोप
संजय राऊत म्हणाले, भारतातील निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाने समाजांमध्ये ठिणगी टाकण्याचं काम केलं. त्याचे परिणाम जगभरातील हिंदूंवर होत आहेत. नेपाळ, कॅनडा, बांगलादेश व पाकिस्तान या देशांमध्ये हिंदूंना त्रास दिला जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंची जीवितहानी चालू आहे. याला केवळ मोदींची धोरणं कारणीभूत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी भारतातील मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी व भाजपाने देशभरातील मुस्लिमांना टार्गेट केलं. प्रार्थना स्थळांचं खोदकाम करायला प्रोत्साहन दिलं. त्याचा उलटा परिणाम हिंदूंवर झाला. इतर देशातील हिंदूंना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. इतर देशांमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही. बांगलादेशमध्ये जाऊन तिथल्या हिंदूंवर होणारे अत्याचार, हल्ले थांबवण्याची ताकद मोदी किंवा भाजपाच्या सरकारमध्ये नाही.