महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवालानुसार राज्याच्या इतर मागासवर्ग व भटक्या जमातीच्या यादीत नव्याने काही जाती समाविष्ट करण्यात आल्या असून काही जाती वगळण्यात आल्या आहेत. शासनाच्या या धोरणामुळे काही जाती दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार काही जातींचा समावेश इतर मागासवर्ग व भटक्या जमाती यादीमध्ये करण्यात आला तर काही जाती वगळण्यात आल्या आहेत. इतर मागासवर्गीयांच्या जातीमध्ये राठोड (आर्थिक निकषाच्या आधीन राहून)(३४७), मारवाडी न्हावी (३४८), गुरडी, गुटरडी-कापेवार, गुराडी, गुर्डा-कोपेवार, गुरड-कापू व गुरडी-रेड्डी (३४९) यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मालाजंगम (वीरभद्र)(५८), लाडशाखीय वाणी (१९०), शेरीगर व मोईली (२८),अहिर (१९८), तेलगु दर्जी, तेलगु शिंपी (१५३), कोइरी, कोईरी, कोयरी व कुशवाहा (८५), पंचम (२८१), बुनकर (२५१) या तत्सम उपजातींचाही इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
भटक्या जमातीच्या यादीमध्ये बागडी या जातीला (भज-ब) (३८) समाविष्ट करण्यात आले आहे. तर निषाद, मल्ला, मल्लाह, नावीक, ओडा, ओडेवार, ओडेलू, बेस्तार, बेस्ता, बेस्ती, बेस्तालू, भनार (२५), चितारी, जिनगर (८), धनगर अहिर (२९-१), गडरिया, गडारिया (२९-२६), कातारी, शिकलकर (शिकलीकरी) (२१), मुस्लीम राज, मुसलमान राज, मुस्लीम मेमार, मेमार, मुस्लीम गवंडी (२) या तत्सम जातींचा भटक्या जमातीत स्थान देण्यात आले आहे.
तसेच भटक्या जमातीतील मूळ जातीमध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार बेलदार (भज-ब) (२) मधील बेलदार कापेवार ऐवजी कापेवार, बेलदार मुन्नर कापेवार ऐवजी मुन्नर कापेवार, बेलदार मुन्नर कापू ऐवजी मुन्नर कापू, बेलदार तेलंगा ऐवजी तेलंगा, बेलदार तेलंगी ऐवजी तेलंगी, बेलदार पेंटरेड्डी ऐवजी पेंटरेड्डी आणि बेलदार बुकेकरी ऐवजी बुकेकरी असा बदल करण्यात आला आहे. इतर मागासवर्गीयांच्या यादीतून लाडशाखीय वाणी (३४३), बागडी (२) या जातींना वगळण्यात आले आहे. या जातींना १८ ऑक्टोबर २०१३ पासूनचे देय असलेले फायदे मिळतील, असेही शासनाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा