छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. “२०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यादृष्टीने सांस्कृतीक मंत्रालयाकडून मोठा आराखडा तयार करण्यात येत आहे. या कार्यक्रमापर्यंत जगदंबा तलवार ब्रिटनने दिली, तर हा आनंदोत्सव आणखी उत्साहात साजरा होईल”, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत नरमले? सुषमा अंधारे म्हणाल्या, “मोठ्या लढाईची…”

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Congress city presidents strength for rebellion in Thane
ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

या तलवारीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे. “ब्रिटनमध्ये असलेली तलवार आणि उदयनराजे भोसलेंकडे असलेली तलावर, या दोन्ही तलवारी महत्त्वाच्या आहेत. इंग्रजांनी जे जे आपल्याकडून नेले, ते आणण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

“जे शिंदे-फडणवीसांसमोर झुकले नाहीत ते…”; ‘शिवसेना फोडण्यासाठी ‘ईडी’चा वापर’ झाल्याचा आरोप करत ठाकरेंकडून हल्लाबोल

शिवछत्रपतींच्या अनेक तलवारींपैकी एक असलेली ‘जगदंबा’ तलवार करवीरच्या छत्रपती घराण्याकडे होती. ही तलवार सध्या इंग्लडच्या राणीच्या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. १८७५-७६ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवे एडवर्ड) भारतभेटीवर आले होते. त्यावेळी कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) राज्य करत होते. यावेळी एडवर्ड यांना ही तलवार भेट म्हणून देण्यात आली होती. ही तलवार पुन्हा भारतात यावी, अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे. कोल्हापूरमधील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीने याबाबत मागणीदेखील केली आहे.