राजगुरुनगर : आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली. सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाणार नाही. आतापर्यंतच्या मराठा बांधवांनी केलेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा एल्गार पुकारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मनोज जरांगे पाटील यांची गर्जना, “आरक्षण दिलं नाही तर तुमच्या छाताडावर बसून…”

मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. पुणे दौऱ्यामध्ये शुक्रवारी जरांगे यांची राजगुरूनगर आणि जुन्नर येथे सभा झाली.  शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या सभेत जरांगे पाटील म्हणाले, सुनील कावळे यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे  सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा असे त्यांनी बजावले.

व्यासपीठावर काही काळ गोंधळ

मनोज जरांगे पाटील मंचावर असतानाच अचानक एक तरुण मंचावर आला. या आक्रमक तरुणाला जरांगे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकायला तयार नव्हता. या वेळी मंचावरील इतरांनी त्याला पकडून खाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विरोध केला. त्यामुळे मंचावर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आयोजकांनी या तरुणाला उचलून मंचावरून खाली नेले.