महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर आरेमधील मेट्रोच्या कारशेडपासून ते नामांतरणापर्यंतच्या अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बंडखोरी करुन भाजपासोबत आल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जातंय. अशातच आता या नव्या सरकारकडे भाजपाच्या एका आमदाराने धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणण्याची मागणी केलीय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in