महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन येत्या शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) कोकण दौऱ्यावर येत असून दापोली आणि रत्नागिरी येथील विविध प्रकल्पांची पाहणी करणार आहेत.के. शंकरनारायणन यांचे २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आगमन होणार असून विद्यापीठातील फळप्रक्रिया आणि शेतीविषयक प्रयोगांची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर वळणे येथील स्वामी समर्थ काजू प्रक्रिया उद्योग व जालगाव येथील अंगणवाडीला भेट देऊन राज्यपाल गव्हे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेतून बांधलेल्या विहिरीची आणि जालगाव कुंभारवाडी येथे इंदिरा आवास योजनेतून बांधलेल्या घरांची पाहणी करणार आहेत. त्या दिवशी संध्याकाळी ते मोटारीने रत्नागिरीला प्रयाण करणार असून तेथे त्यांचा मुक्काम राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी (१मार्च) सकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांचे सादरीकरण राज्यपालांना केले जाणार आहे. त्यानंतर ‘आविष्कार’ ही मतिमंद मुलांची शाळा आणि भाटय़े येथील नारळ संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची ते पाहणी करणार आहेत. दुपारी शंकरनारायणन सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा