राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता १५ ऑक्टोबरपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरता येणार आहे. पण ही मुदतवाढ देताना सरकारने यात एक मोठा बदल केला आहे. हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता ज्या महिलांचे अर्ज अद्यापही भरायचे बाकी आहेत, त्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली मुदत

राज्य सरकारने यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार, लाखो महिलांनी त्यांचे अर्ज सादर केले होते. तसेच ज्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज सादर केले त्या महिलांना योजनेचा लाभही मिळाला. दरम्यान, सरकारने अर्जकरण्याची मुदत आता १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी पुन्हा एक संधी मिळाली आहे. महिलांकडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जातं आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली, केव्हापर्यंत करता येणार अर्ज? आदिती तटकरे म्हणाल्या…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ladki Bahin Yojana December
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!
Narendra Modi reaction on Donald Trump
Narendra Modi Reaction on Donald Trump Victory : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर ‘मित्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-अमेरिका…”
Shani gochar 2025
पुढचे १४३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार प्रत्येक कामात यश
Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Live Updates in Marathi
Ladki Bahin Yojana Payment Status : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही कसं तपासायचं? जाणून घ्या!
Mukhyamantri Ladki Bahin Yojana 4th installment Payment Status in Bank Account
Ladki Bahin Yojana 4th Installment : लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता खात्यात जमा; तुम्हालाही मिळाली का भाऊबीजेची ओवाळणी?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?

सरकारने अर्थसंकल्पात केली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा

राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. तसेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेच्या पहिल्या हफ्याही महिलांच्या खात्यात जमा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास २ कोटी ३० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

या योजनेला पात्र कोण असणार?

  • सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे.
  • २१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी.
  • इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
  • सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana Apply Online : लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आणली वेबसाईट, जाणून घ्या अर्ज भरण्याची सर्वांत सोपी प्रक्रिया!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड,
  • मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • पिवळे किंवा केशरी कार्ड,
  • उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका
  • बँकेचे पासबूक,
  • मोबाईल क्रमांक,
  • पासपोर्ट साईज फोटो,
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म