Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Updates in Marathi: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडलं. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून आज कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. विदर्भाबरोबरच सिंधुदुर्गमधील २९३, कोल्हापूरात ४३१, सोलापूरमध्ये १४१८, नागपूरात २३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये १९६, अहमदनगरमध्ये १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकालही आज जाहीर होत आहेत.

Live Updates

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal Updates, 20 December 2022: राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार  सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले

22:53 (IST) 20 Dec 2022
अलिबाग- ग्रामपंचायत निवडणुकीत रायगडात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वरचष्मा

रायगड जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी मंगळवारी पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेनी आपला वरचष्मा राखला. मात्र महाविकास आघाडीची कामगिरी लक्षवेधी ठरली. शेकापची आणि काँग्रेसची पिछेहाट पुन्हा एकदा पहायला मिळाली.  वाचा सविस्तर बातमी...

21:06 (IST) 20 Dec 2022
“फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीचा झेंडा; दलबदलुंचं राजकारण…” जयंत पाटलांची टीका!

आतापर्यंत दोन्ही बाजूंनी सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्या असल्याचा दावा केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार विजयी झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

20:21 (IST) 20 Dec 2022
Gram Panchayat Election Result 2022 : अलिबाग- ग्रामपंचायत निवडणुकीत रायगडात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वरचष्मा

रायगड जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी मंगळवारी पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेनी आपला वरचष्मा राखला. मात्र महाविकास आघाडीची कामगिरी लक्षवेधी ठरली. शेकापची आणि काँग्रेसची पिछेहाट पुन्हा एकदा पहायला मिळाली. रायगड जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडूक पार पडली. मंगळवारी मतमोजणी नंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले. सविस्तर वाचा…

20:08 (IST) 20 Dec 2022
Gram Panchayat Election Result 2022 : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच वर्चस्व कायम; अजित पवारांचा करिष्मा दिसला!

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकाविला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यातील सत्तापालटानंतर पुण्याच्या पालकमंत्री नियुक्त झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत: प्रचार केला होता. सविस्तर वाचा…

19:40 (IST) 20 Dec 2022
काँग्रेस-राष्ट्रवादीची तब्बल ६५ वर्षांची सत्ता संपुष्टात; ‘या’ गावात भाजपाचा विजय

राज्यातील बऱ्याच गावांमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या पॅनलचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मेंढेपठार (बाजार) या गावातील गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत मोठा बदल घडवला आहे.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 20 Dec 2022
भाजपा आणि शिंदे गटाचा ३ हजार २९ अधिक ग्रामपंचायतींवर विजय - फडणवीस

आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार भाजपा आणि शिंदे गटाचा ३ हजार २९ अधिक ग्रामपंचायतींवर विजय झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

18:46 (IST) 20 Dec 2022
नाशिकमध्ये छगन भुजबळांना धक्का

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. सात पैकी केवळ एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला यश मिळवता आलां आहे.

18:43 (IST) 20 Dec 2022
अकोला जिल्ह्यात वंचितने वर्चस्व राखले!, राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना हादरे बसले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक ठिकाणी नव्यांना संधी मिळाली आहे. काही जागांवर प्रस्थापितांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. निकाल जाहीर होताच राजकीय पक्षांनी विजयी उमेदवारांवर दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. जिल्ह्यात वंचितने वर्चस्व राखले असून त्याखालोखाल भाजपला जागा मिळाल्या आहेत. सविस्तर वाचा…

18:24 (IST) 20 Dec 2022
मालेगाव : दाभाडीत पालकमंत्री भुसे गटाची जीत आणि हार

तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या दाभाडी ग्रामपंचायतीत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पालकमंत्री दादा भुसे तथा शिंदे गटाची जीत आणि याच गटाची हारदेखील झाल्याचे बघावयास मिळाले आहे. अत्यंत उत्कंठावर्धक बनलेल्या तेथील सरपंचपदाच्या सामन्यात भुसे गटाचे प्रमोद निकम यांनी बाजी मारली आहे. भुसे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे शशिकांत निकम यांचा त्यांनी दारुण पराभव केला आहे. सविस्तर वाचा…

18:12 (IST) 20 Dec 2022
भाजपा – शिंदे गटाने मिळवलेल्या यशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यातील एकूण ७ हजार ७८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असताना, यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार भाजपा आणि शिंदे गटाने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे दिसत असून, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:55 (IST) 20 Dec 2022
ग्रामपंचायत निवडणुकीत यश, अपयश नसतं - उद्धव ठाकरे

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर समाधान की असमाधान असा प्रश्न नाही. या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात तर काही ठिकाणी गावकरी एकत्र येऊन निवडणुका लढवत असतात. त्यामुळे हे कोणत्याही एका पक्षाचं यश, अपयश नाही. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक असं काही नसतं. वर्षानुवर्षं आपण हे आकडे ऐकत आहोत. याच्यात फोलपणा किती हे कालांतराने कळतं. आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा आहे असं उद्धव ठाकरे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

17:10 (IST) 20 Dec 2022
Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना दणका

पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २२१ पैकी ९२ ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला आहे. भाजपाला अवघ्या ३८ ठिकाणी विजय मिळाला आहे.

16:55 (IST) 20 Dec 2022
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022: बुलढाणा तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्वबुलढाणा तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व

बुलढाणा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदाचे निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाले. किरकोळ अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी प्रस्तापित राजकारण्यांना धक्का बसला असून मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिल्याचे चित्र आहे.

सविस्तर बातमी

16:52 (IST) 20 Dec 2022
९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर - नाना पटोले

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस व मित्र पक्षाने दमदार कामगिरी केली असून गावातील लोकांनीही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपा व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, लोकांमध्ये इज्जत राहिली नाही. महाविकास आघाडीच्या विजयाची धास्ती घेऊन भाजवा व शिंदे गट विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदोलनाचा थयथाट करत आहेत.

ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहेत, जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला ३६ जागाही मिळाल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपा विजयाचे खोटे दावे असून दुस-याच्या घरी पोरगा झालातरी भाजपवाले लाडू वाटतात. विधानपरिषद निवडणुकापांसून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतमध्येही पराभव केला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भाजपाला धूळ चारून काँग्रेसच्या विजयाचा गुलाल उधळू, असेही पटोले म्हणाले.

16:50 (IST) 20 Dec 2022
भाजपाची जोरदार मुसंडी, ठरला १ नंबरचा पक्ष; नेत्याचं ट्वीट

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याचं ट्विट भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे. "भाजपाचे प्रचंड यश, ४ वाजेपर्यत आलेल्या निकालात भाजपाची जोरदार मुंसडी. निकाल अजून येत आहेत तरी भाजपा नंबर १ आहे," असं ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी खाली आकडेवारीही दिली आहे.

ाजपा 2072

िंदेगट 703

्धव ठाकरे गट 507

ाँग्रेस 689

ाष्ट्रवादी 1121

16:04 (IST) 20 Dec 2022
Nandgaon Gram Panchayat Election Result 2022: नांदगावमध्ये नितेश राणेंनी राखला गड

नितेश राणे यांनी नांदगावमध्ये गड राखला आहे. सरपंच पदासह सर्व जागा भाजपाने जिंकल्या आहेत. "सिंधुदुर्ग हा भाजपाचा बालेकिल्ला असेल. विकास कऱण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नसेल हे जनतेने दाखवून दिलं आहे," असं नितेश राणे म्हणाले आहेत. यापुढे कोकणातील सर्व निवडणुका भाजपा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

15:36 (IST) 20 Dec 2022
नागपूर : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दत्तक गावात काँग्रेसचा झेंडा

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सरपंच व सदस्य निवडून आले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे रवी खंबालकर यांनी भाजपच्या सुरेश लंगडे यांचा पराभव केला.

सविस्तर बातमी

15:34 (IST) 20 Dec 2022
Dhule Gram Panchayat Election Result 2022: शिरपूर तालुक्यात भाजपाचा मोठा विजय

धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील आमदारांनी आपला गड राखत आपल्या तालुक्यांमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. शिरपूर तालुक्यात अमरीश पटेल, शिंदखेडा तालुक्यात जयकुमार रावल, धुळे तालुक्यात काँग्रेसचे कुणाल पाटील तर साक्री तालुक्यात मंजुळा गावित यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

शिरपूर तालुक्यातील १७ पैकी १७ जागांवर भाजपाचे लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहेत. शिरपूर तालुका हा आमदार अमरीश पटेल यांचा बालेकिल्ला राहिला आहे. अमरीश पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील मतदारांचे आभार मानले आहे.

15:28 (IST) 20 Dec 2022
विजयी उमेदवारांवर दगडफेक, भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू; जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील घटना

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे विजयोत्सव, तर दुसरीकडे पराभवामुळे नाराजी असे चित्र चित्र दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट एकमेकांना भिडले.

वाचा सविस्तर...

15:14 (IST) 20 Dec 2022
Sangli Gram Panchayat Election Result 2022: गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये विजय

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय झाल्या आहेत. पडळकरवाडी ग्रामपंचायतवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे.

15:11 (IST) 20 Dec 2022
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दत्तक गावात काँग्रेसचा विजय

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सरपंच व सदस्य निवडून आले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे रवी खंबालकर यांनी भाजपच्या सुरेश लंगडे यांचा पराभव केला.

15:07 (IST) 20 Dec 2022
Satara Gram Panchayat Election Result 2022: कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपा व शिंदे गट विजयी

कल्याणमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाच्या तीन, शिंदे गटाच्या तीन, तर भाजपच्या दोन जागा निवडून आल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. राष्ट्रवादीचा मात्र सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले.

14:36 (IST) 20 Dec 2022
"ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष, ठाकरे गटाला...", केशव उपाध्येंचा दावा

केशव उपाध्ये म्हणाले, "भाजपाचे प्रचंड यश. आतापर्यंत आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपाची जोरदार मुंसडी. इतर तीन पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही. निकाल अजून येत आहेत तरी भाजपा नंबर १ आहे. भाजपाला १२०४, उद्धव ठाकरे गटाला १२४, काँग्रेसला ९५ आणि राष्ट्रवादीला १६१ ठिकाणी यश मिळालं."

https://twitter.com/keshavupadhye/status/1605123158624718848

14:27 (IST) 20 Dec 2022
जळगाव: खडसेंची सरशी; कुर्‍हा काकोडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकाविला असून, खडसे समर्थक पॅनल विजयी झाले आहे.

सविस्तर वाचा

14:04 (IST) 20 Dec 2022
Satara Gram Panchayat Election Result 2022: साताऱ्यात फलटणमधील २४ पैकी २० ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

साताऱ्यातील फलटणमध्ये राष्ट्रवादीने बालेकिल्ला वाचवला असून २४ पैकी २० ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

13:50 (IST) 20 Dec 2022
Pune Gram Panchayat Election Result 2022: हवेली तालुक्यात ठाकरे गटाला एक जागा

हवेली तालुक्यातील सात जागांच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी प्रत्येकी तीन जागा, तर ठाकरे गटाला एक जागा असे उमेदवार विजयी झाले आहेत.

आहेरीगाव - आरती युवराज वांजळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

आव्हाळवाडी - नितीन घोलप ( ठाकरे गट)

भुरकेगाव - रुपाली संदीप थोरात (भाजपा)

पेरणे गाव - उषा दशरथ वाळके (भाजपा)

पिंपरी सांडस - साधना भोर्डे (राष्ट्रवादी)

कदम वाकवस्ती - चित्तरंजन गायकवाड (भाजपा)

गोगलवाडीच्या सरपंचपदी अश्विनी गोगावले (राष्ट्रवादी)

13:16 (IST) 20 Dec 2022
Katol Gram Panchayat Election Result 2022: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यातील वडवीरा गावामध्ये काँग्रेसची बाजी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यातील वडवीरा गावामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. आशिष देशमुख यांच्या गटाच्या सुनीता बनाईत सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

13:12 (IST) 20 Dec 2022
जळगाव: गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्येचा विजय; मात्र पॅनलचा पराभव

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा मातब्बर खासदार सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील विजयी झाल्या.

सविस्तर वाचा

13:10 (IST) 20 Dec 2022
Palghar Gram Panchayat Election Result 2022: इंदोरीकर महाराजांच्या सासूचा विजय

निमोन, मालुजे, जोर्वे, कोल्हेवाडी, निंभाळे, रहीमपुर, कनकापुर, सादतपुर या १० जागांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय खेचून आणला आहे. तब्बल ४५ वर्षानंतर निळवंडे गावात सत्तांतर झाले असून अन्य १२ जागांवर बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार या निळवंडे गावातुन विजयी झाल्या आहेत.

12:48 (IST) 20 Dec 2022
धुळे जिल्ह्यात दुपारपर्यंतच्या निकालात भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व

धुळे जिल्यातील १२८ ग्रामपंचायतींपैकी दुपारपर्यंत जाहीर झालेल्या निकालात भाजपने २५, काँग्रेस ६, राष्ट्रवादी २, शिवसेना ठाकरे गट एक, शिंदे गट ७ तर महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय संपादन केला आहे.

सविस्तर वाचा

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे – ३५, पालघर – ६२, रायगड – १९१, रत्नागिरी – १६३, सिंधुदुर्ग – २९१, नाशिक – १८८, धुळे – ११८, जळगाव – १२२, अहमदनगर – १९५, नंदुरबार – ११७, पुणे – १७६, सोलापूर – १६९, सातारा – २५९, सांगली – ४१६, कोल्हापूर – ५२९, औरंगाबाद – २०८, बीड – ७७१, नांदेड – १७०, उस्मानाबाद- १६५, परभणी – ११९, जालना – २५४, लातूर – ३३८, हिंगोली – ६१, अमरावती – २५२, अकोला – २६५, यवतमाळ – ९३, बुलडाणा – २६१, वाशीम – २८०, नागपूर – २३४, वर्धा – १११, चंद्रपूर – ५८, भंडारा – ३०४, गोंदिया – ३४५, गडचिरोली- २४. एकूण – ७१३५.

Story img Loader