Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Updates in Marathi: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडलं. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून आज कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. विदर्भाबरोबरच सिंधुदुर्गमधील २९३, कोल्हापूरात ४३१, सोलापूरमध्ये १४१८, नागपूरात २३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये १९६, अहमदनगरमध्ये १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकालही आज जाहीर होत आहेत.

Live Updates

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal Updates, 20 December 2022: राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार  सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले

12:43 (IST) 20 Dec 2022
Aurangabad Gram Panchayat Election Result 2022: सिल्लोड ग्रामपंचायत मध्ये शिंदे गटाने मारली बाजी

सिल्लोडमधील सर्व १८ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून १४ जागांवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार-शिंदे गटाने बाजी मारली आहे.

विजयी उमेदवार –

कासोद धामणी :- दत्तात्रेय काशीनाथ राकडे(शिंदे गट)

बोरगाव बाजार :-सत्तार बागवान (शिंदे गट )

सारोला :- मोहन गायकवाड (शिंदे गट )

जाभंई:- लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट)

रेलगाव :- पंकज जैस्वाल (शिंदे गट)

खुल्लोड :- स्वाती भागवान भोरकडे (शिंदे गट)

जलकी बाजार :- ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट)

धोत्रा :- पद्माबाई ज्ञानेश्वर जाधव (भाजप)

मोढा खुर्द :- लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट)

बोरगाव कासारी:-मिनाबाई कौतीक जाधव(भाजप)

पिंपळगाव पेठ:-दिलीप जाधव(शिंदे गट)

पिंपलदरी:-पूजा माहोर(भाजप)

निल्लोड:-उत्तम शिंदे(भाजप)

चारनेर/चारनेर वाडी:-रवींद्र बिलवाल(शिंदे गट)

सावखेडा :-काशिनाथ गोरे(शिंदे गट)

शिंदेंफळ:-रेखाबाई अक्कलकर(शिंदे गट)

मोढा बु:-वर्षा हावळे(शिंदे गट)

हट्टी मोहळ:-ममता कुलकर्णी(भाजप)

12:35 (IST) 20 Dec 2022
Palghar Gram Panchayat Election Result 2022: सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे आठ सदस्य विजयी

पालघर जिल्ह्यातील सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये १७ पैकी मनसेचे आठ सदस्य आत्तापर्यंत विजयी झाले आहेत.

12:15 (IST) 20 Dec 2022
Nashik Jalgaon Gram Panchayat Election Result 2022: उरणमध्ये ६ पैकी ३ ठिकाणी भाजपा

उरणमधील ६ पैकी ३ ग्रामपंचायती भाजपाकडे आल्या असून आमदार महेश बालदी यांची निवडणुकीत सरशी तर ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी आपल्या गावाची ग्रामपंचायत राखली आहे.

उरण ग्रामपंचायत निवडणूक

– उरण येथे तीन ग्रामपंचायतवर डोंगरी , सारडे, रानसई येथे भाजपा विजयी

– नविनशेवा येथे ठाकरे गटाचा सरपंच

– पुनाडे येथे काँग्रेस – सेनेचा सरपंच विजयी

– बोकडविरा ग्रामविकास आघाडी शेकाप विजयी

12:10 (IST) 20 Dec 2022
Nashik Jalgaon Gram Panchayat Election Result 2022: पिंपळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या गटाची सत्ता संपुष्टात आली असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भास्करराव बनकर गटाने १७ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. दिलीप बनकर गटाला केवळ एक जागा मिळाली असून सतीश मोरे गटाला चार जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदी ठाकरे गटाचे भास्करराव बनकर विजयी झाले आहेत.

12:07 (IST) 20 Dec 2022
Jalgaon Gram Panchayat Election Result 2022: एकनाथ खडसेंनी गड कायम राखला; भाजपा, शिंदे गटाला धक्का

एकनाथ खडसे यांनी गड कायम राखला आहे. कुर्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बिपिन महाजन यांचे पॅनल विजयी झाले आहे. तर उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

11:41 (IST) 20 Dec 2022
Beed Gram Panchayat Election Result 2022: निवडणुकीत आमचीच सरशी! पंकजा मुंडेंचं ट्वीट

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट केलं असून ग्रामपंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी असल्याचं म्हटलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदनही केलं आहे.

11:39 (IST) 20 Dec 2022
Shirol Gram Panchayat Election Result 2022: शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा कायमशिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा कायम

शिरोळ तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या सतरा ग्रामपंचायतचे निकाल मंगळवारी जाहीर झाले, एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखताना काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत १७ पैकी दहा ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले आहे, बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला पण यड्रावकर गटाच्या समर्थकानी चिवट झुंज देत विजय खेचून आणला यड्रावकर गटासाठी ग्रामपंचायतीच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या, आमदार राजेंद्र पाटील यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मंत्री आणि आमदारकीच्या कार्यकाळात शिरोळ तालुक्यासाठी 550 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामाची नोंद शिरोळ तालुक्याच्या जनतेने घेतली आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे, शिरोळ तालुक्यातील गावागावांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सर्व गावांचा कायापालट करू शकतात याच आत्मविश्वासाने गावागावांमधील मतदारांनी मतदान केल्याचे एकूण निकालावरून स्पष्ट झाले आहे.

शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, अकिवाट, कवठेसार, उमळवाड, औरवाड, नवे दानवाड, कनवाड, संभाजीपुर, हेरवाड आणि चिंचवाड या गावांमध्ये यड्रावकर गट आणि स्थानिक आघाडीचे सरपंच निवडून आले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मिळालेल्या या दैदिप्यमान यशामुळे यड्रावकर गटामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळी अधिवेशना निमित्त नागपूर येथे असलेल्या माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व विजयी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

11:31 (IST) 20 Dec 2022
Kolhapur Gram Panchayat Election Result 2022: शिरोलीत सतेज पाटील गटाला धक्का

शिरोली ग्रामपंचायतीत आमदार सतेज पाटील गटाला धक्का देऊन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गावातील सत्ता राखली आहे.

11:07 (IST) 20 Dec 2022
Baramati Gram Panchayat Election Result 2022: बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

Baramati Gram Panchayat Election Result 2022: बारामती तालुक्यातील सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. आहे. तिन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.

11:01 (IST) 20 Dec 2022
Sindhudurg Gram Panchayat Election Result Live: सिंधुदुर्गात ठाकरे गटाने खाते उघडले

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सिंधुदुर्गात खाते उघडले आहे. देवगडमधील मणची ग्रामपंचायत शिवसेनेकडे आली आहे.

10:41 (IST) 20 Dec 2022
Palghar Gram Panchayat Election Result Live: पालघरमध्ये मनसेने खातं उघडलं

पालघरमध्ये मनसेने खातं उघडलं असून गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली आहे.

10:39 (IST) 20 Dec 2022
Kolhapur Gram Panchayat Election Result Live: कागलमध्ये मुश्रीफ गटाला धक्का

कागल तालुक्यातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. अर्जुनवाडा (तालुका कागल) येथे सुरेखा शहाजी लुगडे या भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर अवचित वाडी येथे वेदिका संभाजी गायकवाड या प्रविणसिंह पाटील गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत.

– अंबपवाडीत सत्ताधाऱ्यांना धक्का

-कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथे मुश्रीफ गटाच्या सर्वच्या सरपंच पदासह सर्व जागा निवडून आल्या आहेत. कल्पना सुभाष भोसले या सरपंच म्हणून विजयी.

– गडहिंग्लज – सरपंचपदाचे विजयी उमेदवार

जखेवाडी : वैशाली गिरी

तारेवाडी : विश्रांती नाईक

शिरपूर तर्फ नेसरी : सचिन गुरव

यमहट्टी : संगिता नामदेव धुमाळे

सांबरे : ज्योती खराडे सरोळी : अस्मिता कांबळे

10:37 (IST) 20 Dec 2022
Nanded Gram Panchayat Election Result Live: ग्रामपंचायत शिंदे गट, काँग्रेसच्या ताब्यात

काँग्रेस व शिंदे गटाने बोढार चिमेगाव येथील ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता मिळवित संरपचासह ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. तर झरी पांगरी येथील ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या पॅनलने संरपचासह ताब्यात घेण्यास यश मिळविलं आहे.

10:28 (IST) 20 Dec 2022
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने खाते उघडले

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने खाते उघडले असून पंढरपुर तालुक्यातील अजोती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राष्ट्रवादीच्या उमेदवार आरती अभिजीत पाटील सरपंच पदी विजयी विजयी झाल्या आहेत.

10:24 (IST) 20 Dec 2022
उस्मानाबादमधील दोन ग्रामपंचायती ‘आप’कडे

उस्मानाबादमधील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. गोपाळवाडी ग्रामपंचायतीत भाजपा विजयी झाली आहे. तर कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायत आपकडे आली आहे. वाखरवाडी आणि गोरेवाडी ग्रामपंचयातीत ठाकरे गटाचा विजय झाला आहे.

09:45 (IST) 20 Dec 2022
शिरोळ तालुक्यात शिंदे गटाने जिंकल्या चार ग्रामपंचायती

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तसंच कागल तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर भाजपा विजयी झाली आहे. दुसरीकडे कागलमधील पिराचीवाडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

09:34 (IST) 20 Dec 2022
कोल्हापुरात ठाकरे गटाने खातं उघडलं

कोल्हापूर जिल्ह्यातील व्हनाळी येथे माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी झाले आहेत.

09:32 (IST) 20 Dec 2022
कोल्हापुरात मुश्रीफ गटाला धक्का

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधून पहिला निकाल हाती आला आहे. कागल तालुक्यातील बामणीत सत्तांतर झालं असून समरजितसिंह घाटगे गटाचा विजय झाला आहे.

09:28 (IST) 20 Dec 2022
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे – ३५, पालघर – ६२, रायगड – १९१, रत्नागिरी – १६३, सिंधुदुर्ग – २९१, नाशिक – १८८, धुळे – ११८, जळगाव – १२२, अहमदनगर – १९५, नंदुरबार – ११७, पुणे – १७६, सोलापूर – १६९, सातारा – २५९, सांगली – ४१६, कोल्हापूर – ५२९, औरंगाबाद – २०८, बीड – ७७१, नांदेड – १७०, उस्मानाबाद- १६५, परभणी – ११९, जालना – २५४, लातूर – ३३८, हिंगोली – ६१, अमरावती – २५२, अकोला – २६५, यवतमाळ – ९३, बुलडाणा – २६१, वाशीम – २८०, नागपूर – २३४, वर्धा – १११, चंद्रपूर – ५८, भंडारा – ३०४, गोंदिया – ३४५, गडचिरोली- २४. एकूण – ७१३५.