Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal: ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपा, अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात चुरस पाहण्यास मिळते आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवार गटाने ८१ तर भाजपाने ८८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. मराठा आरक्षणासाठीही हालचाली सुरु झाल्याहेत तसंच इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत. या सगळ्यावर आपली नजर असणार आहे, लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Gram Panchayat Election Vote Counting ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुरळा! यासह महत्त्वाच्या बातम्या

11:23 (IST) 6 Nov 2023
नागपूर: लग्न करण्याचे आमिष देऊन तरुणीवर बलात्कार

नागपूर: एकाच कंपनीत कामावर असताना तरुणाची एका तरुणीशी ओळख झाली. त्याने ओळखीचा फायदा घेत तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर लग्नाला नकार देऊन तो फरार झाला.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 6 Nov 2023
चंद्रपूर : राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वेतनापासून वंचित, ७९ महिन्यांपासून पगार नाही

चंद्रपूर : राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्ग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मागील ७९ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. २०१७-१८ ते २०२२-२३ या सहा वर्षांत महाविद्यालयाला शैक्षणिक शुल्कापोटी ११८ कोटी ३० लाख रुपये मिळाले. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन थकीतच आहे.

सविस्तर वाचा..

11:15 (IST) 6 Nov 2023
राज्यासह देशात १२ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

नागपूर : राज्यासह देशभरात गारठा वाढत आहे. दिवसा आणि रात्री गुलाबी थंडी आहे. मात्र असे असतानाही दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह देशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 6 Nov 2023
मेट्रो ७ अ मार्गिकेतील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला सुरुवात

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा मेट्रो ७ अ मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून या मार्गिकेतील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 6 Nov 2023
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने पुकारलाला एसटीचा संप फसला काय? महामंडळ म्हणते..

नागपूर : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. परंतु महामंडळाच्या दाव्याप्रमाणे राज्यातील २५० आगारातील सर्व बस सकाळी मार्गस्थ झाल्या. त्यामुळे सदावर्ते यांच्या संघटनेचा संप फसला काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 6 Nov 2023
पुणे: पदपथावर झोपण्याच्या वादातून ज्येष्ठाचा खून; खडकीतील घटना

पुणे: पदपथावर झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 6 Nov 2023
सावधान! हवेची गुणवत्ता खराब झाल्याने आरोग्याला धोका!

पुणे: राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता खराब होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 6 Nov 2023
ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा नंबर वन-केशव उपाध्ये

भाजपा नंबर १

एकूण संख्या- २३५९

विजयी/घोषित

भाजपा- १०३

शिवसेना (शिंदे) ६७

राष्ट्रवादी(अजित पवार) ८७

ऊबाठा- ३०

काँग्रेस- ३८

शरद पवार गट- ३२

अन्य- ४२

11:02 (IST) 6 Nov 2023
भाजपाने ८८ तर अजित पवार गटाने जिंकल्या ८१ ग्रामपंचायती

ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा आणि अजित पवार गटामध्ये चुरस आहे. भाजपाने सर्वाधिक ८८ आणि अजित पवार गटाने ८१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

11:01 (IST) 6 Nov 2023
बारामतीत अजित पवार गट विजयी

बारामती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सत्ता. भोंडवे वाडी म्हसोबा नगर पवाइमाळ या तिन्ही ग्राम पंचायतींमध्ये अजित पवार गटाची सत्ता

11:00 (IST) 6 Nov 2023
एनआयएकडून सात दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल

पुणे: दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात कारवाया करण्याचा कट उधळला गेला.

सविस्तर वाचा…

10:47 (IST) 6 Nov 2023
गडकरींच्या भेटीत दृष्टीहिन क्रिकेटपटूंनी काय मागणी केली?

खेळाडूंनी एक विशिष्ट प्रकारचा क्रिकेटचा चेंडू गडकरी यांना भेट दिला. फटका मारल्यानंतर या चेंडूतील छर्रे आवाज करतात.

सविस्तर वाचा…

10:46 (IST) 6 Nov 2023
अंधारात नेऊन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

लहान बहिणीसोबत खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलीशी शेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने अंधारात नेऊन अश्लील चाळे केले.

सविस्तर वाचा…

10:45 (IST) 6 Nov 2023
उपराजधानीत प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांचा धुमाकूळ

गुन्हे शाखेच्या प्रत्येक पथकात एका कर्मचाऱ्याचे सुगंधित तंबाखू विक्रेत्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. ( संग्रहित छायाचित्र )

ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपा, अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात चुरस पाहण्यास मिळते आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.