Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal: ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपा, अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात चुरस पाहण्यास मिळते आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवार गटाने ८१ तर भाजपाने ८८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. मराठा आरक्षणासाठीही हालचाली सुरु झाल्याहेत तसंच इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत. या सगळ्यावर आपली नजर असणार आहे, लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Gram Panchayat Election Vote Counting ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुरळा! यासह महत्त्वाच्या बातम्या

18:18 (IST) 6 Nov 2023
ठाण्यात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ठाणे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय रुग्णालयात भरती झालेल्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे तसेच समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने सोमवारी काम बंद आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

18:02 (IST) 6 Nov 2023
ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या आणि बढत्या

ठाणे: ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या नुकत्याच अंतर्गत बदल्या आणि बढत्या झाल्या आहेत.

सविस्तर वाचा…

17:55 (IST) 6 Nov 2023
ठाणे: वाद सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला भोसकले

ठाणे: मुंब्रा येथील स्थानक परिसराजवळ दोघांमधील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सोहेल मोमीन यांना सुऱ्याने भोसकण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. सोहेल यांच्यावर मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

17:30 (IST) 6 Nov 2023
सातारा : परदेशी नागरिकाचा साताऱ्यात आकस्मिक मृत्यू

युक्रेनचे नागरिक असलेले कोव्हिडीनि फॉलुस्की (वय ३९ वर्ष) हे कारखान्यात देखरेख करण्यासाठी जर्मन कंपनीकडून आले होते.

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 6 Nov 2023
नागपूर : अपंगांच्या सेवेसाठी कृत्रिम अवयव मोबाईल व्हॅन सज्ज

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हे वाहन कमीत कमी वेळेत कृत्रिम अवयव बनविण्यास सक्षम आहे.

सविस्तर वाचा…

16:35 (IST) 6 Nov 2023
उल्हासनगरात उभे राहणार संक्रमण शिबीर; शिबिराच्या उभारणीसाठी २३ कोटींचा निधी मंजूर

धोकादायक, निर्माणाधीन इमारतीतील रहिवाशांना पर्यायी व्यवस्था असावी, त्यासाठी संक्रमण शिबीराची उभारणी करावी अशी मागणी सातत्याने होत होती.

सविस्तर वाचा…

16:24 (IST) 6 Nov 2023
ऐन दिवाळीत डोंबिवली वाहतूक कोंडीच्या विळख्यात, डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते काँक्रिटीकरणासाठी खोदले

हा रस्ता खोदल्यामुळे शिवमंदिर स्मशानभूमीत पार्थिव घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांना वळसा घेऊन स्मशानभूमीत जावे लागत आहे. डोंबिवली पूर्व भागातील शिवमंदिर रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता ओळखला जातो.

सविस्तर वाचा…

16:15 (IST) 6 Nov 2023
साडेपाच वर्षांत मुंबईत ५९ हजार कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे, फक्त ४ टक्के गुन्ह्यांमध्ये शिक्षा

मुंबईः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील केवळ चार टक्के प्रकरणांमध्ये आरोपी दोषी ठरले आहेत. जानेवारी २०१८ ते जुलै २०२३ या कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेत सुमारे ५९४ गुन्हे दाखल झाल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त माहितीतून स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा…

16:14 (IST) 6 Nov 2023
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा महायुतीचा दावा

जळगाव – जिल्ह्यात १६७ पैकी १५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह ३१ गावांतील रिक्त सदस्यपदाच्या ५१, तर सरपंचपदाच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा-शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींत विजय मिळविल्याचा दावा या पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

15:49 (IST) 6 Nov 2023
“गुणरत्न सदावर्ते यांची मलिन प्रतिमा उजळवण्याची सरकारने सुपारी…”, श्रीरंग बरगे म्हणाले…

मंत्री उदय सामंत यांनी शासन स्तरावर बैठक घेत सदावर्तेंची प्रतिमा उजळवण्याची सुपारी घेतली, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 6 Nov 2023
पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत मराठा-कुणबी नोंदी असलेल्या १२ हजार २९४ व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण

पुणे : मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.

सविस्तर वाचा…

14:35 (IST) 6 Nov 2023
गोंदिया : ‘त्याने’ घरकूलच काढले विकायला, शासनाचे अनुदान रखडल्याने संताप; देवरी नगरपंचायत पेचात

चंद्रहास केशोराव लांडेकर यांना २०१८-१९ मध्ये घरकूल मंजूर झाले. त्यांनी घरकुलाचे बांधकाम केले. मात्र अद्यापही त्यांना शेवटचा हप्ता मिळाला नाही.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 6 Nov 2023
कापूस, तुरीच्या पिकांत गांजाचे आंतरपीक; राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यावर पोलिसांची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका जणाला अटक केली आहे.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 6 Nov 2023
“यंत्रणांच्या भीतीने नव्हे तर महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी सरकारमध्ये सहभागी”, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

‘निर्धार नवपर्वाचा’, ‘घड्याळ तेच वेळ नवी’ अभियानांतर्गत गोंदियात एन.एम.डी. महाविद्यालयातील सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा…

13:48 (IST) 6 Nov 2023
झारखंडमधून हरवलेली महिला वर्षभरानंतर सुखरुप घरी पोहोचली; महिला राज्यगृह व स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

अकोला: सुमारे वर्षभरापूर्वी झारखंडमधून हरवलेल्या महिलेला तिच्या स्वत:च्या जिल्ह्यात पाठवून कुटुंबापर्यंत पोहोचविण्यापर्यंत महिला राज्यगृह व स्वयंसेवी संस्थांना यश आले आहे.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 6 Nov 2023
धुळे जिल्हातल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपाचे वर्चस्व

धुळे जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात पुन्हा एकदा भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध करत ३१ पैकी २५ जागांवर विजय प्राप्त केला आहे.

धुळे जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, त्यातील पाच ग्रामपंचायतीच्या बिनविरोध झाल्या होत्या यातील शिरपूर तालुक्यातील दोन आणि शिंदखेडा तालुक्यातील दोन ग्रामपंचायती या भाजपकडे गेल्या होत्या तर साखरी तालुक्यातील एक ग्रामपंचायत ही काँग्रेसकडे गेली होती.

ग्रामपंचायतींसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. मतदानावेळी नागरिकांनी उस्फूर्तपणे मतदान करीत गावाचा कारभारी निवडला असून काल झालेल्या मतदानावेळी ८० टक्के मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला असून ३१ पैकी २५ जागांवर भाजपाने विजय मिळवला असून अजित पवार गटाने दोन जागांवर तर महाविकास आघाडीने दोन आणि स्थानिक विकास आघाडीने दोन जागांवर विजय प्राप्त केला आहे.

धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून जनतेने पुन्हा एकदा भाजप आणि राज्य सरकारवर विश्वास दाखवत भाजपला यश प्राप्त करून दिले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे. विजय झालेल्या उमेदवारांनी गुलालाची उदाहरण करीत जल्लोष केला यावेळी मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

13:23 (IST) 6 Nov 2023
आत्तापर्यंत भाजपाकडे २७८ ग्रामपंचायती

दुपारी १२.३० ला हाती आलेल्या निकालांनुसार महायुतीकडे म्हणजेच भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडे ६०९ ग्रामपंचायती आल्या आहेत. तर उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांना फारसं यश आलेलं नाही.

कुणाकडे किती ग्रामपंचायती? (दुपारी १२.३० ची आकडेवारी)

भाजपा-२७८

शिवसेना (शिंदे गट)- १३०

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- २०१

उबाठा-५७

शरद पवार गट-६६

काँग्रेस-७१

13:23 (IST) 6 Nov 2023
सिगारेटचा झुरका अन् रेल्वेचा दंडुका! रेल्वेगाडीत धुम्रपान करणाऱ्यांकडून साडेअठरा हजारांचा दंड वसूल

धावत्या रेल्वेगाडीत धुम्रपान किंवा स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थांसह प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे रेल्वे मालमत्तेचेच नव्हे तर सहप्रवाशांचेही नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 6 Nov 2023
सांगलीतील दुष्काळात लोकप्रतिनिधी राजकारणातच मग्न

सांगली : कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगावच्या पूर्व भागांतील काही गावे अभूतपूर्व पाणी टंचाईला सामोरे जात असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मात्र या प्रश्‍नावर शासन दरबारी आवाज उठविण्याऐवजी राजकीय कुरघोड्या करण्यात धन्यता मानत आहेत.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 6 Nov 2023
दिवाळीत रेल्‍वेने प्रवास करताना ‘या’ वस्‍तू घेऊन जाऊ नका; रेल्‍वेने दिला इशारा

रेल्‍वेने प्रवासादरम्‍यान काही वस्‍तू बाळगण्‍यास बंदी घातली आहे. या वस्‍तू प्रवाशांना सोबत नेता येत नाहीत.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 6 Nov 2023
अमरावती विभागात रब्‍बीची पेरणी संथ; पाच टक्‍केच क्षेत्रात पेरणी

चांगला पाऊस झाल्‍यास खरिपातून काहीतरी हाती लागेल आणि दिवाळी आनंदात होईल, असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्‍या अनियमिततेमुळे नुकसान सोसावे लागले.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 6 Nov 2023
मालेगाव: वृध्देच्या मृत्युप्रकरणी जन्मठेप

मालेगाव: दागिने मिळवण्यासाठी मारहाण आणि गळा आवळल्याने बागलाण तालुक्यातील श्रीपुरवडे येथील वृध्देचा मृत्यू झाल्याप्रकरणी आनंदा सोनवणे याला येथील न्यायालयाने जन्मठेप व ५० हजार दंडाची शिक्षा ठोठावली.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 6 Nov 2023
कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी समाजाकडून सतर्कतेची गरज; स्त्री: व्यक्त-अव्यक्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मृदुला भाटकर

नाशिक: पॉश आणि पोक्सो कायद्यान्वये दाखल होणाऱ्या खऱ्या गुन्ह्यात गुन्हेगाराला निश्चितपणे कठोर शिक्षा व्हायला हवी. परंतु, घरगुती हिंसाचार प्रतिबंधकसारख्या कायद्याचा दुरुपयोग होताना दिसतो. कुठल्याही कायद्याचा दुरुपयोग होणे अतिशय हानीकारक असते.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 6 Nov 2023
गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात अकोल्यात अधिराज्य कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

अकोला : भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला शहरात तब्बल ४० वर्षे आपला दबदबा कायम ठेवला. राजकीयसह सामाजिक, धार्मिक व कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची ‘लालाजी’ या प्रेमळ नावाने वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती. या दिग्गज नेत्याचे दुर्धर आजाराने निधन झाल्यामुळे भाजपचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान झाले. लालाजींनी निर्माण केलेले अधिराज्य कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे राहणार आहे.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 6 Nov 2023
मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वीकारला. यापूर्वी ते नांदेडस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरू होते.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 6 Nov 2023
नाशिकमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्ष स्थापन – जिल्हा, तालुकास्तरावर समिती गठीत

नाशिक: मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या धर्तीवर आता संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया राबवली जाणार असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 6 Nov 2023
महायुतीने जिंकल्या ३४८ ग्रामपंचायती

ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपा आणि अजित पवार गटात चुरस पाहण्यास मिळते आहे. आत्तापर्यंत जे निकाल हाती आले आहेत. त्यानुसार ३४८ जागांवर महायुतीने बाजी मारली आहे.

भाजपाने आत्तापर्यंत १४२ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने १२० ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. शिंदे गटाने ८६ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला १७५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.

11:35 (IST) 6 Nov 2023
पुणे: सोसायटीतील दुकानदाराकडून दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य

पुणे: सोसायटीतील दुकानदाराने दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 6 Nov 2023
पुणे: सुनेशी अश्लील वर्तन; सासऱ्यावर गुन्हा

पुणे: सुनेशी अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ३२ वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 6 Nov 2023
चंद्रपूर : वाघिणी पाठोपाठ वाघ जेरबंद

दोन वाघांना जेरबंद केल्याने वनविभाग आणि तेथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सविस्तर वाचा…

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. ( संग्रहित छायाचित्र )

ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपा, अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात चुरस पाहण्यास मिळते आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.