Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Updates : राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार १६५ ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदाच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी रविवारी १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. सोमवारी (१७ ऑक्टोबर) याच १०७९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. मात्र, भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध महाविकासआघाडी असा विचार केला तर मविआला अधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गट अशा एकूण ३५२ ठिकाणी विजय मिळाला, तर मविआने ४५१ ठिकाणी विजय मिळवला. या सर्व घडामोडींच्या लाईव्ह अपडेट…

Live Updates

Gram Panchayat Election Results 2022 Updates : राज्यातील १,०७९ ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या मतमोजणीची प्रत्येक लाईव्ह अपडेट...

20:36 (IST) 17 Oct 2022
वर्ध्यातील आर्वीत काँग्रेसचे वर्चस्व; सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा सरपंच

वर्ध्यातील आर्वी तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यात काँग्रेसने पाच ग्रामपंचायतींवर विजयी मिळवला, तर भाजपाने दोन ग्रामपंचायत विजय मिळवला. वाठोडा (हैबदपूर) काँग्रेस माजी आमदार अमर काळे यांचे गाव आहे. त्याठिकाणी काँग्रेसला विजय मिळवता आला. आर्वी शहरात काँग्रेसने ढोल ताशांसह फुलांचा वर्षाव करत जल्लोष साजरा केला.

भाजपचे नेरी मिर्झापूर येथे बाळा सोनटक्के, तर जाम येथे राजकुमार मनवरे असे दोन सरपंच विजयी झाले. नेरी मिर्झापूर येथे सर्वच सदस्य भाजपाचे निवडून आले.

सरपंच पदाचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे-

काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायत

१. सुरेंद्र धुर्वे - मांडला ग्रामपंचायत

२. अली रजक लियाकत - पिपरी ग्रामपंचायत

३. सचिन पाटील - हैबतपूर, वाथोडा ग्रामपंचायत

४. गजानन हनवते - सर्कसपूर ग्रामपंचायत

५. विना संजय वलंके - अपक्ष - ७ सदस्य बिनविरोध - अहिरवाडा ग्रामपंचायत

भाजपाच्या ताब्यातील ग्रामपंचायत

६. बाळा सोनटक्के - सरपंच - नेरी मिर्झापूर, ग्रामपंचायत

७. राजकुमार मनोरे, जाम पुनर्वसन ग्रामपंचायत

20:28 (IST) 17 Oct 2022
अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम

अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता राखली. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम, पुढील अडीच वर्षासाठी पार निवडणूक पडली. भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने वंचितच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. जिल्हा परिषदेत भाजपाचे पाच सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षपदी संगीता अढाऊ, तर उपाध्यक्षपदी सुनिल फाटकर यांची निवड.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

वंचित बहुजन आघाडी (अपक्षासह): २५

शिवसेना : १२

भाजप : ५

काँग्रेस : ४

राष्ट्रवादी : ४

प्रहार : १

अपक्ष : २

एकूण- ५३

19:15 (IST) 17 Oct 2022
आतापर्यंत कोणाला किती ग्रामपंचायतीत विजय?

भाजपा - २३९

शिंदे गट - ११३

राष्ट्रवादी - १५५

ठाकरे गट - १५३

काँग्रेस - १४३

इतर - २९५

16:49 (IST) 17 Oct 2022
‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत

वाई : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत सर्व अपक्ष निवडून आले आहेत.गावात उभे राहिलेले प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनेलचे पक्षीय उमेदवार पराभूत झाले. जावळी तालुक्यात भणंग या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. बातमी वाचा सविस्तर...

16:12 (IST) 17 Oct 2022
आतापर्यंत कोणाला किती ग्रामपंचायतीत विजय?

भाजपा - २१३

शिंदे गट - ९९

काँग्रेस - १२१

ठाकरे गट - १११

राष्ट्रवादी - ७०

इतर - २२१

15:07 (IST) 17 Oct 2022
रायगडात शिंदे गटाच्या आमदार गोगावलेंना झटका; खरवली ग्रामपंचायतीवर मविआचा झेंडा

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात भरत गोगावले यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखता आले नाही. बंडखोरी केल्यानंतर प्रतिष्ठा पणाला लावत आमदार भरत गोगावले ग्रामपंचायत निवडणूकीत 'बाळासाहेबांची शिवसेना' म्हणून उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, जनतेने त्यांच्याच गावात त्यांना जोर का झटका दिला आहे. गोगावलेंच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी काँग्रेसचे चैतन्य म्हामूणकर यांना जनतेने कौल दिला.

14:38 (IST) 17 Oct 2022
ग्रामपंचायत निवडणूक: BJP पहिल्या तर NCP चौथ्या स्थानावर असं म्हणत प्रश्न विचारताच अजित पवार चिडून म्हणाले, “तुम्हाला कसं…”

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना या निकालांमध्ये भाजपा एक नंबरला तर राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला असता त्यांनी चिडलेल्या स्वरातच उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. येथे वाचा सविस्तर वृत्त

14:04 (IST) 17 Oct 2022
राज्यात आतापर्यंत कोणाला किती ग्रामपंचायतीत विजय?

भाजपा - १३४

शिंदे गट - ९३

काँग्रेस - ९५

ठाकरे गट - ७५

राष्ट्रवादी - ७३

इतर - ८३

12:49 (IST) 17 Oct 2022
वर्धा ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती यश?

वर्ध्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, ७ पैकी काँग्रेसचा ४ ग्रामपंचायतीत विजय, तर भाजपाकडे ३ ग्रामपंचायत

12:46 (IST) 17 Oct 2022
कल्याणमधील ७ ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती यश?

कल्याण तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यात २ बिनविरोध झाल्या आहेत.

१. वाहोली - सलीम सरोले - उद्धव ठाकरे गट

२. आडीवली - राऊत कमलाकर दामोदर - उद्धव ठाकरे गट

३. केळणी - राजेश भोईर - अपक्ष

४. मामलोणी - कोर तुषाल दत्तात्रय - भाजप / उद्धव ठाकरे गट

५. रुंदे - नरेश चौधरी - भाजप

६. फळेगाव - भारती पाटील बिनविरोध- राष्ट्रवादी

७. उशीद - सुवर्णा भोईर बिनविरोध उद्धव ठाकरे गट

12:44 (IST) 17 Oct 2022
नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती यश?

नागपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल

तालुका : रामटेक

ग्रामपंचायत नाव:पुसदा पुनर्वसन १

विजयी सरपंचांचे नाव : मंगला बळवंत मेश्राम

मिळालेली मते : बिनविरोध

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमदेवाराचे नाव : निरंक

मिळलेली मते : निरंक

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक

नागपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल

तालुका : रामटेक

ग्रामपंचायत नाव: पुसदा पुनर्वसन २

विजयी सरपंचांचे नाव :मेघा प्रदीप कोडवते

मिळालेली मते : बिनविरोध

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस

पराभूत उमदेवाराचे नाव : निरंक

मिळालेली मते : निरंक

कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक

12:44 (IST) 17 Oct 2022
नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती यश?

तालुका : भिवापूर

१) ग्रामपंचायत नाव: गाडेघाट- घाटउमरी

सरपंच :- विष्णु मंगर (काँग्रेस)

२) ग्रामपंचायत : पांजरेपार

सरपंच :- आकांक्षा पंकज मानवटकर ( शिवसेना)

३) ग्रामपंचायत :- थुटानबोरी

सरपंच :- विनोद नथ्थू गुरूपुडे (भाजप)

४) ग्रामपंचायत : अड्याळ

सरपंच :- योगेश तुमडाम (भाजप)

५) ग्रामपंचायत सावरगाव-नेरी

सरपंच : नलू भारत गजभीये (स्वतंत्र पॅनल)

६) ग्रामपंचायत : नागतरोली

सरपंच : नलु प्रदीप गजभीये (स्वतंत्र)

12:43 (IST) 17 Oct 2022
नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती यश?

तालुका कुही:

ग्रामपंचायत नवेगाव :

सरपंच : विद्या प्रकाश चापले

मिळालेले मते ३३८

काँग्रेस गट विजयी

तालुका कुही :

ग्रामपंचायत फेगड :

सरपंच : आशिष रामभाऊ पाल

मिळालेले मते- ८३८

भाजप विजयी

तालुका : कुही

ग्रामपंचायत तारोली:

विजयी : सुरेखा कवडू राऊत

मिलेलेले मते ५०७

भाजप गट विजयी

तालुका कुही :

ग्रामपंचायत तुडका

सरपंच : धनराज शहारे मिळालेले मते ३०५

भाजप गट विजयी

12:41 (IST) 17 Oct 2022
नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती यश?

तालुका : रामटेक

ग्रामपंचायत नाव: टांगला चिकनापुर

विजयी सरपंचांचे नाव : पंचफुला वासुदेव मडावी

मिळालेली मते : २४२

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : काँग्रेस

पराभूत उमदेवाराचे नाव (सरपंच पद) : रेखा शिवदास उईके

मिळालेली मते : २१८

कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : शिवसेना शिंदे गट

12:38 (IST) 17 Oct 2022
कोकण ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाचं वर्चस्व?

रत्नागिरीत १२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने विजय मिळवला आहे, शिंदे गटालाही काही प्रमाणात यश, सिंधुदुर्गच्या देवगडमधील माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा विजय, पडवणे ग्रामपंचायतीत ठाकरे गट जिंकला

12:35 (IST) 17 Oct 2022
राजापूरमधील ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाचा दबदबा

राजापूरमधील ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाचा दबदबा, १० पैकी ७ ठिकाणी विजय, राजापूरमधील राजन साळवेंच्या ताकदीचं दर्शन

12:31 (IST) 17 Oct 2022
रायगडमध्ये कोणत्या पक्षाचा किती ग्रामपंचायतीत विजय?

भाजपा - ५

शिंदे गट - १८

मविआ - २२

शेकाप - ६

12:30 (IST) 17 Oct 2022
कल्याण वाहोली ग्रामपंचायतीला २० वर्षांनंतर सरपंच, मविआचा विजय

कल्याण वाहोली ग्रामपंचायतीला २० वर्षांनंतर सरपंच, गावाने मागील २० वर्षे विविध कारणांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता, यंदा निवडणूक संपन्न, महाविकासआघाडीचा विजय

12:18 (IST) 17 Oct 2022
नाना पटोलेंच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत कमळ फुललं

भंडारा जिल्ह्याच्या साकोली मतदारसंघातील ग्रामपंचायतीत कमळ फुललं, शिरेगाव ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता

12:16 (IST) 17 Oct 2022
कोल्हापुरात ७ ग्रामपंचायतपैकी ४ राष्ट्रवादीकडे, तर ३ शिंदे आणि भाजपाकडे

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचं खातं उघडलं, भुदरगडच्या फये गावात विजय, ७ ग्रामपंचायतपैकी ४ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर ३ शिंदे आणि भाजपाकडे

12:11 (IST) 17 Oct 2022
आतापर्यंत कोणाला किती ग्रामपंचायतीत विजय?

भाजपा - ७६

शिंदे गट - ४०

ठाकरे गट - ४८

राष्ट्रवादी - ४४

काँग्रेस - ४०

इतर - ४४

12:10 (IST) 17 Oct 2022
नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात

नागपूर जिल्ह्यात तीन तालुक्यात १७ ग्रामपंचायत निवडणुकीत आज निकाल जाहीर होत आहे. नागपूर जिल्हा हा भाजपाच्या बालेकिल्ला मानला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही नागपूर जिल्ह्यातील असल्याने ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live News

राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज (१७ ऑक्टोबर) जाहीर होत आहे.

Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: राज्यातील १,०७९ ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या लाईव्ह अपडेट्स...