रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये रविवारी एकूण सुमारे ६६ टक्के मतदान झाले.

दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ४४० मतदारांनी (५७.३१) मतदानाचा हक्क बजावला. त्यात ६३ हजार ३२७ महिला, तर ६० हजार ११३ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

Conflict in Mahayuti over post of Guardian Minister of Raigad aditi tatkare bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
Vijay Wadettiwar, Vijay Wadettiwar on Opposition Leader post , Opposition Leader post ,
“… तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करू”, वडेट्टीवारांचे विधान; काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून भाजपवर निशाणा
minister, BJP, raigad district, mahayuti government,
रायगडमध्ये भाजपची मंत्रीपदाची पाटी कोरी
Ravindra Chavan supporters are upset because they did not get the ministerial post print poltics news
रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी
maharashtra Congress chief nana patole slams mahayuti government over leader of opposition post
विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा लागतो का? नाना पटाले अध्यक्षांना सवाल  म्हणाले….
Ajit Pawar :
Ajit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर कोणते बदल केल्यानंतर पक्षाला विधानसभेत यश मिळालं? अजित पवारांनी सांगितली चार सूत्र; म्हणाले…

दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया झाली.  मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे १५५ सरपंच आणि ६६६ सदस्यांच्या जागांसाठी रविवारी ५०७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सरपंचपदासाठी ४०६ उमेदवार, तर सदस्यपदासाठी १ हजार २०६ उमेदवार रिंगणात आहेत. रत्नागिरी तालुक्यात एका ठिकाणी यंत्र बंद पडल्याची नोंद झाली होती. ते तात्काळ बदलण्यात आले. रविवारी शासकीय सुट्टी असली तरीही सकाळच्या सत्रात बहुसंख्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी अखेरच्या सत्रात ८ ते १० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ६६ ते ६७ टक्केपर्यंत मतदान झाले असावे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान मंडणगड तालुक्यात ६३ टक्केपर्यंत, तर सर्वात कमी संगमेश्वर तालुक्यात ५१.६८ टक्के नोंद झाली.

जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना अशी चुरस निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि दापोली-खेड विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काही ठिकाणी भाजपकडूनही निवडणूक लढविण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मतपेटय़ा तालुक्याच्या ठिकाणी आणण्याचे काम सुरू होते. दिवसभरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुपारी ३.३० वाजेपर्यंतच्या मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी

  तालुका             मतदान             टक्के

* मंडणगड            ९९९९             ६३.१७

* दापोली             १३८२४            ५९.९८

* खेड               ७९६९              ६०.९४

* चिपळूण            १४०७२             ५८.४८

* गुहागर             १२३८३              ५७.६६

* संगमेश्वर           १४३६९              ५१.६८

* रत्नागिरी           २२७२१              ५८.०७

* लांजा              ११८८२             ५८.५६

* राजापूर            १६२२१             ५२.८७

सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकीत ५९.०८ टक्के मतदान

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आज झालेल्या २९३ गावांच्या ग्राम पंचायत सरपंच व ग्रा. पं. सदस्य निवडणुकीमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५९.०८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत धिम्या गतीने मतदान होत मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांच्या जवळपास गेले. सरपंच पदाचे उमेदवार ७१९ व सदस्य पदाचे ४६४९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सिलबद्ध झाले. किरकोळ वाद अपवाद म्हणून वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका मतमोजणी दि.२० डिसेंबर रोजी होणार आहे.  जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या २९३ गावांचे सरपंच व या गावातील ग्राम पंचायत २५५१ सदस्य विजयी होणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीतील उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे या निकालाकडे लक्ष लागले आहेत. मालवण व सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ ग्राम पंचायतपैकी ३२ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने २९३ ग्राम पंचायतींच्या सरपंच व सदस्यांच्या निवडींसाठी रविवारी मतदान झाले. ९२९ मतदान केंद्रांवर एकूण २ लाख ४७ हजार१६ पुरुष मतदारांपैकी आणि २ लाख ५२ हजार २० महिला मतदारांपैकी दु.३.३० वा. २,४१,८४६ मतदारांनी मतदाना चा हक्क बजावला. त्यामुळे ५९.०८ टक्के एवढे एकुण मतदान झाले होते.

७१९ सरपंच उमेदवारातून २९३ सरपंच आणि ४ हजार ६४९ उमेदवारांतून २,५५१ सदस्यांचे भवितव्य मतदान यंत्रात सिलबद्ध झाले. मंगळवारी म्हणजे २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या २९३ गावांचे सरपंच व या गावातील ग्राम पंचायत २५५१ सदस्य विजयी होणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीतील उमेदवार व राजकीय पक्षाच्या नेत्यांचे या निकालाकडे लक्ष लागले आहेत.

दुपारी ३.३० पर्यंत सावंतवाडी तालुक्यातील ५२ पैकी ३ बिनविरोध झाल्याने ४९ ग्रा.पं. साठी ६४.५२ टक्के, वेंगुर्ला तालुक्यातील २३ पैकी १ बिनविरोध झाल्याने २२ ग्रा.पं.साठी ५८.४८ टक्के, दोडामार्ग तालुक्यातील २८ पैकी ३ बिनविरोध झाल्याने २५ ग्रा.पं. साठी ५९.९६ टक्के, कुडाळ तालुक्यातील ५४ पैकी २ बिनविरोध झाल्याने ५२ ग्रा.पं. साठी ५७.१३ टक्के, मालवण तालुक्यातील ५५ पैकी ८ बिनविरोध झाल्याने ४७ ग्रा.पं. साठी ५८.४४ टक्के, कणकवली तालुक्यातील ५८ पैकी ६ बिनविरोध झाल्याने ५२ ग्रा.पं. साठी ५८.२१ टक्के, वेभववाडी तालुक्यातील १७ पैकी ६ बिनविरोध झाल्याने ११ ग्रा.पं.साठी ६२.२२ टक्के, तर देवगड तालुक्यातील ३८ पैकी ५ बिनविरोध झाल्याने ३३ ग्रा.पं. साठी ५६.४६ टक्के, मतदान झाले होते. जिल्यात दु. ३.३० वा. पर्यंत २,४१,८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सरासरी ५९.०८ टक्के मतदान झाले होते. पुढच्या दोन तासात मतदानाचा वेग मंदावला होता.

Story img Loader