चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने जगभरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनमध्ये अवलंबण्यात येत असलेले ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यानंतर करोनाची नवीन लाट आली असून या लाटेमध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट असलेल्या बीएफ-७ चे आहेत. त्यामुळेच भारतामध्येही या सब व्हेरिएंटसंदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि ओदिशामध्ये प्रत्येकी दोन ओमायक्रॉन सब-व्हेरिएंट बीएफ-७ ने बाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून आढावा बैठकी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र याच करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बुधवारी नागपूरमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत या व्हेरिएंटचं नावही नीट घेता आलं नाही. पत्रकारांसमोरच तानाजी सावंतांना ‘ओमिक्रॉन’ या शब्दाची आठवण त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना करुन द्यावी लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा