Maharashtra News Updates, 07 June 2022 : भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अवमानकारक वक्तव्याचे इस्लामी देशांत तीव्र पडसाद सुरूच असून या प्रकरणावरुन भाजपा प्रवक्त्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर पोहोचली आहे. याच प्रकरणावरुन राज्यातील राजकारणामध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि सहयोगी आमदारांची बैठक सोमवारी सायंकाळी घेतली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची संधी साधत अपक्ष व सहयोगी आमदारांनी नाराजी सूर लावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

राज्यात करोना संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत असून मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील दैनंदिन रूग्णवाढीबाबत सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. खबरदारी म्हणून पुन्हा मुखपट्टी सक्ती लागू करण्याबाबत करोना नियंत्रण कृती गटाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केल़े त्यामुळे राज्यात लवकरच मुखपट्टी सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून करोना रुग्णांची वाढती संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

22:06 (IST) 7 Jun 2022
महाविकास आघाडीची बैठक संपली; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरू असलेली महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सविस्तर बातमी

21:28 (IST) 7 Jun 2022
रावसाहेब दानवेंनी मांजरांच्या पिल्लांसोबत केली महाविकास आघाडीच्या आमदारांची तुलना; नेमकं काय म्हणाले…

राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आपली मतं फुटू नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकार आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यांना एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवलं आहे. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची अवस्था माजरांच्या पिल्लांसारखी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमी

21:26 (IST) 7 Jun 2022
‘भाजपानं अपक्षांना मिठी मारली तरी…’, राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पार्टीकडून मोठे प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडीनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एकत्रित बोलावलं आहे. संबंधित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित आहेत. याठिकाणी राज्यसभा निवडणुकीबाबत आमदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सविस्तर बातमी

21:21 (IST) 7 Jun 2022
प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : संयुक्त राष्ट्राने दिली प्रतिक्रिया

भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर जगभरातून संताप व्यक्त केला जातोय. शर्मा यांच्या या टिप्पणीवर सौदी अरेबिया, इराण तसेच इतर मुस्लीम राष्ट्रांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर संयुक्त राष्ट्रानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

19:33 (IST) 7 Jun 2022
मविआचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये, तर भाजपाच्या आमदारांचा ताजमध्ये मुक्काम

राज्यासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपा तसेच महाविकास आघाडीचे बडे नेते छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच स्वपक्षातील आमदारांनाही मुंबईत येण्याचे आदेश भाजपा आणि महाविकास आघाडीने आदेश दिले आहेत. घोडेबाजार टाळता यावा म्हणून भाजपाने त्यांच्या आमदारांना हॉटेल ताजमध्ये ठेवले आहे. तर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेल ट्रायडेन्टमध्ये करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

19:15 (IST) 7 Jun 2022
Covid 19 : राज्यात आज दिवसभरात १ हजार ८८१ नवीन करोनाबाधितांची नोंद

राज्यात करोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात १ हजार ८८१ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९६,११४ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ८४३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. वाचा सविस्तर बातमी…

19:14 (IST) 7 Jun 2022
कानपूरच्या घटनेप्रकरणी मीडियावर एकतर्फी व्हिडिओ दाखवले जाताय – ओवेसींचा आरोप!

“कानपूरमध्ये जी घटना घडली आहे, त्याबद्दल दुर्दैवाने सांगावं लागतय की टीव्ही मीडियामध्ये केवळ एकतर्फी व्हिडिओ दाखवले जाताय. दगडफेक दोन्ही बाजूने झाली आहे.” असं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज लातूर येथे पत्रकारपरिषदेत बोलताना म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

19:09 (IST) 7 Jun 2022
प्रेषित अवमान प्रकरण: “मोदींनी हे समजून घेण्याची गरज आहे की…”; भाजपाला लक्ष्य करत ओवेसींकडून नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने देशातील २० कोटी अल्पसंख्यांक मुस्लिमांविरोधात जे द्वेषाचं वातावरण निर्माण केलं आहे त्यामुळेच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अशाप्रकारची वायफळ बडबड करत असल्याचा टोला एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लगावलाय. नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओवेसी यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अटक करवी अशीही मागणी केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:07 (IST) 7 Jun 2022
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला आणि म्हणाले, बेटा…”; नुपूर शर्मांच्या मुलाखतीचा Video चर्चेत

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना भाजपाने रविवारी निलंबित केलं. मात्र यानंतरही या प्रकरणावरुन इस्लामी देशांत तीव्र पडसाद सुरूच आहेत. असं असतानाच आता काही दिवसांपूर्वी नुपूर यांनी दिलेल्या मुलाखतीमधील काही भाग व्हायरल होत आहे. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात नुपूर यांनी ही मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यांनंतर धमक्या येऊ लागल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यामध्ये अगदी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाकडून आपल्याला समर्थन मिळत असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये नुपूर यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी फोन केल्याचा दावा केला होता. येथे वाचा सविस्तर वृत्त.

19:06 (IST) 7 Jun 2022
प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला

दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. ते ६४ वर्षांचे होते. येथे वाचा सविस्तर वृत्त.

19:04 (IST) 7 Jun 2022
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण : भाजपा आमदाराविरोधात गुन्हा दाखल

हैदराबादमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाभाजप आमदार रघूनंदर राव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी या बलात्कार प्रकरणाशी संबंधित काही व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध करत या घटनेत एमआयएम पक्षाच्या आमदाराच्या मुलाचा समावेश असल्याचा दावा केला होता. वाचा सविस्तर

19:04 (IST) 7 Jun 2022
गोव्यात ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार, एकास अटक

गोव्यातील आरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळ एका महिला ब्रिटिश पर्यटकावर स्थानिकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२ जून) घडली आहे. आरोपीने महिलेसोबत आलेल्या एका पुरुष पर्यटकासमोरच हा अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून ३२ वर्षीय आरोपी व्हिन्सेंट डिसोझा याला अटक केले आहे. आरोपी डिसोझाने याआधी ग्रंथपाल म्हणून काम केलेले आहे. वाचा सविस्तर

18:25 (IST) 7 Jun 2022
Maharashtra HSC Result 2022 : बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर, सीट नंबर आठवत नसेल तर ‘असा’ शोधा Seat Number

हाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आसन क्रमांक अर्थात सीट नंबर माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सीट नंबर/रोल नंबर माहित नसेल तर आत्ताच शोधून ठेवा. जाणून घ्या महाराष्ट्र बोर्ड बारावीचा रोल नंबर/आसन क्रमांक कसा शोधायचा हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

18:15 (IST) 7 Jun 2022
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलींचे रूपेरी यश, मुलांच्या संघानेही मिळवले कास्यपदक

हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये आज कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य पदकाची कमाई केली. याशिवाय, मुलांच्या कबड्डी संघानेही कांस्य पदकाची कमाई केली आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा…

18:03 (IST) 7 Jun 2022
राज्यसभा निवडणूक: माकपचे आमदार विनोद निकोले शिवसेनेला करणार मतदान

राज्यसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षाचे आमदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले हे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. सविस्तर बातमी

17:16 (IST) 7 Jun 2022
करोनाची चौथी लाट येणार का? देशात सध्या नेमकी परिस्थिती काय?

देशात मंगळवारी करोनाच्या ३१७४ रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी नोंद झालेल्या ४५१८ च्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे. दोन दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी देशासाठी वाढती करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.. अनेक राज्यांमध्ये धीम्या गतीने रुग्णवाढ होत असून देशपातळीवर याचा परिणाम जाणवत आहे.

देशात अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात येत असून करोनाची चौथी लाट येण्याची भीती सतावत आहे. जाणून घेऊयात देशात नेमकी काय स्थिती आहे….

सविस्तर बातमी

17:13 (IST) 7 Jun 2022
“काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा,” नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता उद्धव ठाकरेंना सुनावलं.

सविस्तर बातमी

16:30 (IST) 7 Jun 2022
पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीचे मिशन विदर्भ

राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. गडचिरोलीतील पक्षाचे गतवैभव परत मिळवण्यासोबतच सध्या काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी सामाजिक उपक्रमांचा आधार घेतला जात आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी या मिशनचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या यशस्वीनी सामाजिक अभियानातून महिला सक्षमीकरण आणि अपगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे दत्तक घेतले आहेत. वाचा सविस्तर

16:21 (IST) 7 Jun 2022
Ranji Trophy 2022 Quarterfinals : अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणाऱ्या २१ वर्षीय सुवेदचा डबल धमाका, पदार्पणातच ठोकले द्विशतक

मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात रणजी करंडकातील दुसरा उपांत्यपूर्व सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसरा दिवस मुंबईच्या फलंदाजांच्या नावावर राहिला. मुंबईच्या सुवेद पारकरने पदार्पणातच शानदार खेळ करत द्विशतक झळकावले आहे. बाद फेरीत पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद रणजी करंडकाच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय, सर्फराज खाननेदेखील शतक केले.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा…

15:51 (IST) 7 Jun 2022
गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला; महाराष्ट्रात कधी होणार आगमन, हवामान विभागाची मोठी अपडेट

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तीन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर, महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पण वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं नाही. त्यामुळे हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. यानंतर आता आयएमडीने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा नवा मुहूर्त काढला आहे. सविस्तर बातमी

15:34 (IST) 7 Jun 2022
शिरुर : न्यायालयाच्या आवारात पतीचा पत्नी आणि सासूवर गोळीबार; पत्नीचा जागीच मृत्यू

शिरूर न्यायलायाच्या आवरात एका व्यक्तीने आपल्या सासू आणि पत्नीवर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये पत्नी मरण पावली असुन आरोपीच्या सासूवर उपचार सुरू आहेत. माजी सैनिक असणाऱ्या या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यु झाला असून तर सासू गंभीर जखमी झाली आहे. सासूला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

15:05 (IST) 7 Jun 2022
Maharashtra HSC Result 2022: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘असा’ पाहा रिझल्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी चार वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. निकाल कसा पहायचा आणि अन्य माहितीसाठी इथे क्लिक करा.

15:05 (IST) 7 Jun 2022
“आप सरकार पंजाबमध्ये…”; राहुल गांधी यांनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबचे गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली. मार्चमध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मूसवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा गावातून निवडणूक लढवली होती. वाचा सविस्तर…

14:53 (IST) 7 Jun 2022
पाठिंब्यासाठी एमआयएमकडे मदत कोण मागणार? नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं

घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्या आमदरांना मुंबईत पाचारण केलं आहे. दुसरीकडे भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी असं आवाहन ओवौसी यांनी केल्यानंतर एमआयएमकडे मदतीसाठी कोण प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे. वाचा सविस्तर

14:53 (IST) 7 Jun 2022
नुपूर शर्माच्या संपूर्ण कुटुंबाला दिल्ली पोलिसांनी पुरवली सुरक्षा

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षातून (भाजप) हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात एफआयआर नोंदवला होता. आपल्याला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत, अशी तक्रार नुपूर शर्मा यांनी करत पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. वाचा सविस्तर बातमी…

14:38 (IST) 7 Jun 2022
पाकिस्तानातून ड्रग्स, हत्यारांची खेप घेऊन येणाऱ्या ड्रोनचं गूढ उलगडलं; सुरक्षा दलाचा मोठा खुलासा

अलीकडेच सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी सीमेतून भारतात घुसखोरी करणारं ड्रोन पाडलं होतं. संबंधित ड्रोनचं तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं आहे. यातून पाकिस्तानस्थित दहशतवादी गटाचं काळं कृत्य समोर आलं आहे. ड्रोनच्या उड्डाण मार्गाच्या विश्लेषणानुसार, संबंधित ड्रोन सर्वप्रथम भारतातून पाकिस्तानात गेलं होतं. त्यानंतर ते शस्त्रांसह परत भारतात आलं होतं. दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत ते पाडलं. सविस्तर बातमी

14:11 (IST) 7 Jun 2022
RSS ची कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्याऱ्या आरोपीस अटक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तामिळनाडूतील पुडुकुडी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

13:48 (IST) 7 Jun 2022
धमकीचं पत्र पाठवण्याआधी सलमानच्या घराची रेकी; विश्वास नांगरे पाटील पोहोचले गृहमंत्र्यांच्या भेटीला

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी भेट घेतली आहे. या प्रकरणासंदर्भात नांगरे-पाटील यांनी गृहमंत्र्यांना सविस्तर माहिती दिलीय. सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना हे धमकीचं पत्र पाठवण्याआधी त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

13:22 (IST) 7 Jun 2022
पाकिस्तानचा ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला करण्याचा कट

जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत ड्रोनच्या सहाय्याने बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. मुलांच्या खाण्याच्या डब्यात आयईडी (IED) बॉम्ब ठेवत ड्रोनच्या सहाय्याने भारताच्या हद्दीत पाठवण्यात आले होते.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

13:20 (IST) 7 Jun 2022
RSS ची कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी

उत्तर प्रदेशमधील लखनऊ आणि उन्नावमधील नवाबगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर वाचू शकता.