Maharashtra News Updates, 07 June 2022 : भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अवमानकारक वक्तव्याचे इस्लामी देशांत तीव्र पडसाद सुरूच असून या प्रकरणावरुन भाजपा प्रवक्त्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर पोहोचली आहे. याच प्रकरणावरुन राज्यातील राजकारणामध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि सहयोगी आमदारांची बैठक सोमवारी सायंकाळी घेतली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची संधी साधत अपक्ष व सहयोगी आमदारांनी नाराजी सूर लावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

राज्यात करोना संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत असून मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील दैनंदिन रूग्णवाढीबाबत सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. खबरदारी म्हणून पुन्हा मुखपट्टी सक्ती लागू करण्याबाबत करोना नियंत्रण कृती गटाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केल़े त्यामुळे राज्यात लवकरच मुखपट्टी सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून करोना रुग्णांची वाढती संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

13:13 (IST) 7 Jun 2022
Moosewala Murder Case: “त्याने हत्या केली असेल तर…”; पुण्यातील शार्प शूटर संतोष जाधवच्या आईचं मुलाला भावनिक आवाहन

पंजाबमधील काँग्रेसचे नेते आणि गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील संशयीत गुन्हेगार संतोषी जाधवच्या आईने संतोष हा मुसेवाला यांच्या खून प्रकरणात असल्यास त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्याची चूक पाठीशी घालण्यासारखी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याला चांगली संगत असलेले मित्र लाभले नाहीत म्हणून तो आज इथं पोहचला असल्याची खंत ही त्यांनी बोलून दाखवली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

13:12 (IST) 7 Jun 2022
ठाण्यात रुग्णवाढ होऊ लागल्यानंतर लसीकरण केंद्रांवर पुन्हा गर्दी

मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दररोज दिवसाला २०० ते २५० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. करोनाच्या या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वत:हून लसीकरण केंद्रावर जाऊ लागली आहेत. त्यामुळे ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर पुन्हा नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांचे असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर बातमी

12:54 (IST) 7 Jun 2022
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी अफगाणिस्ताननेही भारताला सुनावलं

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताला आखाती देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं असून सौदी अरेबियानेही निषेध नोंदवला आहे. त्यातच आता तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तान सरकारनेही भारताला धर्मांधतेवरुन सुनावलं आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी भारताला मुस्लिमांच्या भावना भडकावू नयेत अशी विनंती केली आहे.

सविस्तर बातमी

12:36 (IST) 7 Jun 2022
Video: पुरातत्व वैभवात पडली भर, ३५हून अधिक कातळशिल्पे सापडली

मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर काही पुरातन कातळशिल्पं आढळून आली. अभ्यासक सतीश लळीत यांनी ह्या कातळशिल्पांचा शोध लावला. कातळशिल्पांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

12:32 (IST) 7 Jun 2022
विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवार ठरले!

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून त्यासंदर्भात लवकरच पक्षाकडून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर

12:23 (IST) 7 Jun 2022
NABARD recruitment 2022: नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या अधिक तपशील

NABARD recruitment 2022: नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD ) ने पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार ४ जून २०२२ ते २४ जून २०२२ पर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

12:16 (IST) 7 Jun 2022
Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीला गरज असेल तर आम्ही…”; असदुद्दीन ओवेसींनी स्पष्ट केली भूमिका

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. सहयोगी व अपक्ष आमदारांनी नाराजीचा सूर लावल्याने शिवसेनेसाठी दुसरी जागा निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यात लक्ष घालत आहेत. दरम्यान एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी याबाबत भाष्य केले आहे. वाचा सविस्तर…

12:05 (IST) 7 Jun 2022
एखाद्या मजल्यावर रुग्ण सापडल्यास सर्वांची करोना चाचणी होणार; ठाणे पालिका आयुक्तांचा आदेश

एखाद्या मजल्यावर करोना रुग्ण सापडल्यास त्या मजल्यावरील सर्व रहिवाशांच्या चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. यानंतर आरोग्य विभागाने मंगळवारी सकाळपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक करोना रुग्ण माजिवडा मानपाडा क्षेत्रात सापडत आहेत. म्हणजेच, घोडबंदर भागातील उच्च मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू वसाहतीमध्ये अधिकाधिक करोना रुग्ण सापडत आहेत.

सविस्तर बातमी

11:46 (IST) 7 Jun 2022
अनिल देशमुख प्रकरणात केतकी चितळेची उडी; म्हणाली, “त्यांना जामीन दिल्यास ते…”

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० तारखेला मतदान पार पडणार असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा त्यातही खास करुन शिवसेना भाजपामध्ये या निवडणुकीमध्ये चांगलीच चढाओढ दिसून येत आहे. या निवडणुकीमधील प्रत्येक मत महत्वाचं ठरणार असल्यानेच राष्ट्रवादीकडून सध्या अटकेत असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असं असतानाच आता अनिल देशमुख यांना मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून केलेल्या याचिकेला अभिनेत्री केतकी चितळेने विरोध केलाय. केतकीने या जामीन याचिकेविरोधात याचिका दाखल केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

11:45 (IST) 7 Jun 2022
“…मग पोलीस मला अटक कशी करु शकतात?”; पोलीस, सत्तेचा गैरवापर होत असल्याचा केतकी चितळेचा आरोप

वेगेवगेळ्या पोलीस स्थानाकांमधील तक्रारींच्या आधारे दाखल करुन घेण्यात आलेल्या सर्व एफआयआर बेकायदा असून माझी अटकही बेकायदा आहे, असा दावा अभिनेत्री केतकी चितळेनं केलाय. आपल्याला अटक करताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्याचा भंग करण्यात आला असल्याने आपल्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही केतकी चितळेनं न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

https://twitter.com/LoksattaLive/status/1534033580229545984

11:42 (IST) 7 Jun 2022
पुणे : महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

महाविद्यालयात ओळख झाल्यानंतर अल्पवयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्या एकास दहा वर्ष सक्तमजुरी तसेच दहा हजार रु. दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.

11:40 (IST) 7 Jun 2022
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची जुळवाजुळव सुरु असतानाच पुण्यात BJP, NCP आमदारांचा एकत्र मॉर्निंग वॉक

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार दिल्यामुळे रस्सीखेच वाढली आहे. शिवसेनेचे आमदार मुंबईत रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. भाजपने आपल्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस आपल्या आमदारांना आज सुरक्षितस्थळी हलविणार आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.

11:39 (IST) 7 Jun 2022
बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहनतळ

खडकवासला धरण चौपाटी परिसरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी महापालिका आणि पोलिसांकडून ठोस पाऊले उचलण्यात येणार आहेत. खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहनतळ उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली झाली असून हवेली पोलीस ठाण्याकडूनही त्याबाबत पाठपुरावा सुरू झाला आहे. पोलिसांकडून पुणे महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडूनही आवश्यक कार्यवाही सुरू झाली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:15 (IST) 7 Jun 2022
मोबाईल खरेदीच्या बहाण्याने डोंबिवलीतील तरूणीची फसवणूक

डोंबिवलीतील एका १७ वर्षाच्या तरूणीला ‘तुझा मोबाईल मी ओएलएक्सवरून खरेदी करणार आहे. तू कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ये’ असे सांगितले. तरुणी आल्यानंतर तिच्या जवळील मोबाईल काढून अनोळखी तरूण पसार झाला आहे. मोबाईल विक्रीतून आपली फसवणूक झाल्याने तरूणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अज्ञात इसमाचा शोध सुरू केला आहे.

सविस्तर बातमी

11:14 (IST) 7 Jun 2022
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी संजय राऊतांची भाजपावर टीका!

नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “जगभरात जे वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली आहे. सगळे देश भारतावर टीका करत नाहीयेत, पण त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्यांदाच एखाद्या लहान देशाकडून मोठ्या देशाकडे माफी मागण्याचा आग्रह होतोय”, असं राऊत म्हणाले आहेत.

वाचा सविस्तर

11:08 (IST) 7 Jun 2022
शिधावाटप दुकानात फळे आणि भाजीपालाही मिळणार

रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने विविध उत्पादने शिधावाटप दुकानामधून विक्री करण्याला गेल्या काही वर्षात परवानगी मिळाली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता शिधावाटप दुकानांमधून फळे आणि भाजीपाला मिळणार आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने नुकताच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नवी बाजारपेठ खुली होणार आहे.

सविस्तर बातमी

10:37 (IST) 7 Jun 2022
Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल ‘या’ तारखेला अपेक्षित; जाणून घ्या अधिक तपशील

Maharashtra 12th Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बारावीचा निकाल लवकरच प्रसिद्ध करणार आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल. निकालाची अपेक्षित तारीख जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

10:19 (IST) 7 Jun 2022
“औरंगाबादला काय आमदार विकत घ्यायला चाललेत का?”

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घोडेबाजाराच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यात ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्यामुळे औरंगाबादमधलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. यासंदर्भात आता भाजपा नेते किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा सविस्तर

10:15 (IST) 7 Jun 2022
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नाराज शिलेदारांवर भाजपाचा डोळा

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपखाडी भागातील सेनेच्या नाराज शिलेदारांना हेरून त्यांना पक्ष प्रवेशासाठी भाजपाकडून गळ घातली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याशिवाय प्रभागात प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपाकडून संपर्क साधला जात असल्याचेही वृत्त आहे. यानिमित्ताने ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नेत्यांनी शहरात मिशन कमळ राबविण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली असून त्यासाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नाराज शिलेदारांवर भाजपाचा डोळा असल्याचे सूत्रांकडून समजते.

सविस्तर बातमी

10:00 (IST) 7 Jun 2022
Petrol- Diesel Price Today: राज्यातील आजचा पेट्रोल-डिझेल भाव काय? जाणून घ्या

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

09:43 (IST) 7 Jun 2022
VIDEO: …अन् अंगणात बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने फरफटत नेलं

नाशिकमध्ये बिबट्याने एका वस्तीत शिरुन पाळीव कुत्र्यावर हल्ला करुन ठार केलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ट्विटरला २० हजारांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

सविस्तर बातमी

09:42 (IST) 7 Jun 2022
बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम

वाढती महागाई आणि ‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना दिलासा मिळाला आहे. बोरिस जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला आहे. २११ विरुद्ध १४८ मतांनी बोरिस जॉन्सन यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवलं. एकूण ३५९ मतं नोंदवण्यात आली. यामधील २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास दाखवला.

सविस्तर बातमी

09:36 (IST) 7 Jun 2022
सिद्धरमय्या यांनी चड्ड्या जाळण्याची धमकी दिल्यानंतर आरएसएसने काँग्रेसला पाठवली अंतर्वस्त्रे

राजकीय पक्षांमध्ये होणारे वाद काही लोकांसाठी नवीन नाहीत. जनकल्याण योजना, धोरणं, न्याय अशा अनेक मुद्द्यांवर राजकीय नेत्यांमध्ये चर्चा तसंच आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण कर्नाटकमधील एक वाद चक्क अंतर्वस्त्रापर्यंत पोहोचला आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं घडलं आहे.

काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) निषेध करण्यासाठी चड्ड्या जाळल्या जातील असं वक्तव्य केलं होतं. याला उत्तर देताना आरएसएसने काँग्रेस कार्यालयात पाठवण्यासाठी अंतर्वस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

सविस्तर बातमी

09:36 (IST) 7 Jun 2022
VIDEO : केदारनाथमध्ये अनियंत्रित हेलिकॉप्टरचे धोकादायक लँडिंग

चार धाम यात्रेसाठी यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर नियंत्रण सुटल्याने जमिनीवर कोसळण्यापासून थोडक्यात बचावले. खराब हवामानामध्ये केदारनाथ मंदिराच्या हेलिपॅडवर खासगी हेलिकॉप्टर उतरत होते. हे प्रकरण ३१ मे पर्यंतचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चार धाम मार्गावर कार्यरत सर्व हेलिकॉप्टर ऑपरेटरना सर्व सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर…

09:34 (IST) 7 Jun 2022
Gold- Silver Price Today: सोन्याला पुन्हा तेजी! चांदीचे दर वाढले; जाणून घ्या आजचा भाव

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. १० ग्रॅम २२ कॅरेट आणि १० ग्रॅम २४ कॅरेटची महाराष्ट्रातील आजची किंमत जाणून घ्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

09:32 (IST) 7 Jun 2022
करोना संसर्गाची तीव्रता सौम्यच ; तज्ज्ञांचे मत; मृत्यू, रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अल्प

राज्यात गेल्या आठवडाभरात करोनाच्या रुग्णसंख्येत सुमारे दीडपटीने वाढ झाली असली तरी मृतांची संख्या अत्यल्प आहे. करोनाचा प्रसार वाढत असला तरी सध्या संसर्गाची तीव्रता सौम्य असल्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राज्यात करोना संसर्गाचा प्रसार पुन्हा झपाटय़ाने वाढत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या काळात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पाचशेच्या घरात होता. जूनच्या पहिल्या आठवडय़ात यात वेगाने वाढ होऊन आता तो जवळपास दीड हजारांपर्यंत गेला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

09:32 (IST) 7 Jun 2022
भीती न बाळगता सेनेच्या उमेदवारांना निवडून आणा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदारांना आवाहन

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची संधी साधत अपक्ष व सहयोगी आमदारांनी नाराजी सूर लावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. येथे वाचा सविस्तर वृत्त

09:31 (IST) 7 Jun 2022
Video: दुचाकीस्वार अन् SUV चालकाचा वाद; Cut मारुन भरधाव वेगात गेलेल्या चालकाला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक

दिल्लीमधील गुन्हेगारी घटनासंदर्भात वेळोवेळी बातम्या समोर येत असतानाच राजधानीमधून नुकताच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. रस्त्यावरील हाणामारी आणि वाहतुक कोंडीदरम्यान झालेल्या वादांमधून प्रकरणं थेट पोलीस स्थानकापर्यंत पोहचल्याची अनेक उदाहरणं दिल्लीसाठी काही नवीन नाहीत. मात्र दिल्लीमधील अरजान घर मेट्रो स्थानकाजवळ रविवारी एक फारच विचित्र प्रकार काही दुचाकीस्वारांसोबत घडला. येथे वाचा सविस्तर वृत्त

09:30 (IST) 7 Jun 2022
प्रेषित अवमानप्रकरणी UAE, इंडोनेशिया, मालदीवनेही नोंदवला निषेध; BJP प्रवक्त्यांचा निषेध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर

भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अवमानकारक वक्तव्याचे इस्लामी देशांत तीव्र पडसाद सुरूच आहेत. कतार, इराण, कुवेतपाठोपाठ आता संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांनाही या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. या देशांच्या सहभागामुळे या प्रकरणावरुन भारताचा विरोध करणाऱ्या देशांची संख्या १२ वर पोहोचली आहे. यामध्ये सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, जॉर्डन, ओमान, पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

09:28 (IST) 7 Jun 2022
मुखपट्टी सक्तीबाबत लवकरच निर्णय ; करोना रुग्णवाढीबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिंता

राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू लागला असून, गेल्या दीड महिन्यांत सातपटीने रुग्णवाढ झाली. विशेषत: मुंबई महानगर प्रदेशात दैनंदिन बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी राज्यातील करोनास्थितीचे सादरीकरण करताना परिस्थिती गंभीर होत असल्याचा इशारा दिला. येथे वाचा सविस्तर वृत्त

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर वाचू शकता.