महाराष्ट्राच्या नवनिर्मितीत योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सोमवारी मुंबई येथे ‘महाराष्ट्र आयकॉन २०१३’ पुरस्काराने गौरविण्यात येणार असून त्यात नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत व सपकाळ नॉलेज हबच्या संचालिका कल्याणी सपकाळ यांचा समावेश आहे.
आर्ट इन फॅशन मासिकाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येणार असून रवींद्र नाटय़ मंदिरात सायंकाळी सहा वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. कविता राऊतची क्रीडा व युवक कल्याण गटातून, तर कल्याणी सपकाळ यांची शालेय शिक्षण गटातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या सोहळ्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान, अभिनेता मकरंद अनासपुरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मासिकाच्या संपादिका सारिका कदम व पुरस्कार निवड समितीचे कार्यकारी संचालक शैलेंद्र मोहिते यांनी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा