सांगली : मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील बस सेवा स्थगित करण्यात आली आहे. मंगळवारी सातारा इंडी जाणार्‍या बसवर जत तालुक्यात मुचंडी येथे दगडफेक झाल्यानंतर अथणी, बेळगाव, विजापूर या कर्नाटकातील आगारांनी आणि मिरज व जत आगारांनी बस सेवा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंगळवारी दुपारी सातारा ते इंडी धावणारी कर्नाटकमधील इंडी आगाराची बस (केए २८ एफ २३२९) ही बस विजापूर मार्गे जात असताना मुचंडी येथील लिंब ढाब्याजवळ आल्यानंतर तीन दुचाकीवरून आलेल्या ५ ते ६ तरूणांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून ५० हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात सहा जणाविरूध्द जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणखी वाचा-सोलापूर : मराठा आरक्षणासाठी व्यक्तिला चितेवर ठेवून केलं आंदोलन

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर काल रात्रीपासूनच कर्नाटकातील बसची महाराष्ट्रातील बस वाहतूक थांबविण्यात आली आहे. यामुळे मिरज व जत आगारातील आंतरराज्य प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मिरज आगारातून प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार कागवाड सीमेपर्यंत बस वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून जत ते विजापूर मार्गावर बस वाहतुक सुरू असल्याची माहिती विभाग नियंत्रण सुनील भोकरे यांनी बुधवारी दिली.