Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe Mahendra Gaikwad Conflict : अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात ४० सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यानी पंचांशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील घातली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. यावरून शिवराज राक्षे याने आता टीव्ही ९ ला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवराज राक्षे म्हणाला, “सर्वकाही चुकीचं झालं असून जतेनेहे पाहिलं आहे. कुस्तीचा व्हिडिओ तपासण्याची आम्ही विनंती केली होती. व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या, असं म्हणालो होतो. थर्ड अम्पायरला असा (थेट) निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली. दोन्ही खांदे टेकले असतील तर आम्ही हार मानायला तयार आहोत. कुस्तीत हार जीत होत असते. पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे.” कालच त्यांनी सांगितलं की पंचाचा निर्णय चुकीचा आहे. मग त्यावेळीच निर्णय चुकीचा आहे की चुकीचा आहे ते दाखवा.”

“मी वारंवार हेच सांगतो होतो की रिव्ह्यु दाखवा. त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर घेतलेला निर्णय मान्य आहे. पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केलं नाही. मला शिविगाळ केली. म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं”, असंही शिवराज राक्षे म्हणाला.

पंचांनी स्वतः चूक मान्य केली होती

“एखाद्या पैलवानावर अन्याय होत असेल तर तो गप्प बसणार नाही. तुम्ही नंतर मान्य करता की पंचांकडून चुकी झाली आहे. मग त्या पोझिशनचे पॉइंट देऊन पुढे खेळ सुरू ठेवला पाहिजे होता. पंचांनी स्वतः मान्य केलंय की चुकी झाली आहे. त्यामुळे पंचांवरही आक्षेप घेतला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्यावेळी काळजी घेतील”, असंही त्याने स्पष्ट केलं.

कोर्टात धाव घेणार

आम्ही कोर्टात जाऊन सविस्तर विषय मांडणार आहोत. कोर्ट जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल, असंही शिवराज राक्षेने पुढे स्पष्ट केलं.