धाराशिव : महाराष्ट्राचे वैभव असलेली महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा यंदा धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रीडा मैदानावर येत्या १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. विजेत्या मल्लासाठी स्कॉर्पिओ गाडी व मानाची गदा व अन्य विजेत्या मल्लांसाठी दोन कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.

स्पर्धेच्या आयोजनबाबत हातलाई कुस्ती संकुल येथे रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह कार्यालयीन सचिव ललीत लांडग, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद भक्त, तांत्रिक सचिव बंकट यादव, विजय भराटे यांच्यासह धाराशिव जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप, अत्याचाराचे VIDEO पॉर्न साइटवर केले अपलोड

यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर येत्या १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेसाठी २० गट सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील कुस्तीपटू, कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत ही भव्य स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी विजेत्या मल्लांना मोटारसायकली, चांदीची गदा, मानचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्थानिक कुस्तीपटूनाही महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून संधी दिली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

धाराशिव शहरात सलग पाच रंगणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ४५ वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. ४५० खेळाडू माती व ४५० खेळाडू गादी गटात असे ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत. माती व गादी अश्या वेगवेगळ्या वजन गटात स्पर्धा पार पडणार असल्याची घोषणा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने केली.

आणखी वाचा-आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलीसांना निलंबित करावे – नरेंद्र पाटील

धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळत आहे. साधारणपणे एक लाख प्रेक्षक बसतील अश्या स्वरूपाची असणार गॅलरी उभारण्यात येणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व धाराशिव कुस्ती तालीम संघ त्याबाबत आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंदाजे २ कोटी रुपयांची बक्षिसे

प्रथम बक्षीस चांदीची मानाची गदा व ३० लाख रुपये किमतीची स्कर्पिओ गाडी, द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर असणार आहे. २० गटात स्पर्धा होणार असुन प्रत्येक गटातील प्रथम विजेत्या मल्लाला बुलेट आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्तजनार्थ १२ लाख रुपयांची बक्षिसे असणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांना स्पर्धेसाठी निमंत्रित करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.