Ladki Bahin scheme launch Supriya Sule Post: महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभर आहे. आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. लाभार्थी बहि‍णींना या कार्यक्रमाला आणले जाणार असू लाभार्थी महिलांना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सरकारकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी केलेली असतानाच एका व्हायरल मेसेजमुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाऊंटवर हा मेसेज पोस्ट केला आहे.

काय आहे मेसेजमध्ये?

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सॲप मेसेज एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या मेसेजमध्ये लाभार्थी महिलांना आज बालेवाडी येथील कार्यक्रमाला हजर राहण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. ज्या लाभार्थी महिला उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे अर्ज रद्द केले जातील, असे या मेसेजमध्ये लिहिलेले आहे. या मेसेजनंतर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे.

Campaigning of candidates taking advantage of Sunday holiday in Vasai Nalasopara vasai news
रविवार ठरला प्रचार वार; वसई, नालासोपाऱ्यात रविवारच्या सुट्टीची संधी साधत उमेदवारांचा जोरदार प्रचार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी

हे वाचा >> Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!

सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.”

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana Apply Online : लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आणली वेबसाईट, जाणून घ्या अर्ज भरण्याची सर्वांत सोपी प्रक्रिया!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९० लाख महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे वितरीत करण्यात आले आहेत.