Dr. Manmohan Singh Passes Away : सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले आणि १९९१ च्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ.मनमोहन सिंग यांचे काल वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. काल संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री ९.५१ मिनिटांनी रुग्णालयाने त्यांचे निधन झाल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. यानंतर नियोजित सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

Hema Malini
“ती फार मोठी घटना नव्हती”, भाजपा खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर विधान; ३० जणांचा झाला होता मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Marotrao Gadkari passed away, Senior Gandhian thinker, Marotrao Gadkari , Marotrao Gadkari news,
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन, विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी…
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोक संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “डॉ. मनमोहन सिंग यांनी आधी वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलली आणि अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करत एक नवी आर्थिक क्रांती आणली”, असे म्हणत आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, “साध्या सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले आहे.”

हे ही वाचा : डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना आदरांजली वाहताना अजित पवार म्हणाले की, “भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचे बहुतांश श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे.

Story img Loader