विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर भाजपाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केलं. ठाकरे सरकार हे ओबीसींवर अन्याय करणारं सरकार आहे. ठाकरे सरकारने लोकशाहीचा गळा आवळलाय, ठाकरे सरकारची हिटरलशाही सुरुय अशी घोषणाबाजी आंदोलन करणाऱ्या भाजपा आमदारांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा >> भाजपा आमदारांनी शिव्या दिल्या, मी फडणवीसांना म्हणालो आवरा पण… ; अध्यक्षांनी सांगितलं काय घडलं

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये गोंधळ घालून गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. या आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे. या आमदारांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबित केलं आहे. केंद्राकडून ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी इमपेरिकल डेटा घेण्याबाबतचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर होताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन अनेक आमदार वेलमध्ये उतरले.

नक्की वाचा >> समजून घ्या : राजदंड म्हणजे काय? सभागृहाच्या कामाकाजात राजदंड एवढा महत्वाचा का असतो?

आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीचे भान ठेवतात आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर नेलं. त्यानंतर थोडावेळ कामकाज तहकूब करण्यात आलं. मात्र राजदंड पळवण्यावरुन सुरु झालेल्या गोंधळातून नंतर अध्यक्षांच्या दालनाबाहेर धक्काबुक्कीही झाली. याच साऱ्या गोंधळानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर १२ आमदारांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा जाधव यांनी केली. या निलंबनानंतर भाजपा आमदारांनी वॉक आऊट केलं. सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर पायऱ्यांवरच भाजपा आमदारांनी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली.

नक्की वाचा >> …तेव्हा भास्कर जाधव, फडणवीस आणि नरहरी जिरवाळही झालेले निलंबित

“ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “ठाकरे सरकार हाय हाय…”, “गली गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है”, “लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “हिटलरशाही नही चलेगी…” अशा घोषणा देत भाजपा आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरच आपला निषेध नोंदवला.

या निलंबनाच्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.  ”आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका सरकारने खरी केली आहे.आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडं पाडल आणि हे सरकार अपयशी ठरलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे, सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून १२ आमदरांना निलंबित केलेलं आहे,” असं फडणवीस म्हणाले.