पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. या आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे. विधानसभेच्या सभागृहाबरोबरच अध्यक्षांच्या केबिनमध्ये शिरुन शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर कारवाई करण्यात आल्याचं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली ही घोषणा केलीय. मात्र थेट निलंबनाची कारवाई होण्याइतका काय गोंधळ अध्यक्षांच्या केबिनमध्ये घडला यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केबिनमधील गोंधळाचा व्हिडीओ ट्विट केलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा