विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपा आमदारांकडून धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली. त्यानंतर भाजपाच्या दहा आमदारांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाच्या कारवाईवरुन देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

सभागृहात निलंबन प्रस्ताव मांडण्यापूर्वी तालिका अध्यक्षांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अध्यक्ष महोदय, आपण जी वस्तुस्थिती सांगितली, त्या हे सांगितलं पाहिजे की, तिथे शिवसेनेचे आमदारही आले होते. ते शिवसेनेचे आमदार आणि भाजपाचे आमदार यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी मी स्वतः पूर्ण लोकांना बाहेर काढलं. हे खरं आहे की, आम्ही रागात होतो. बाचाबाची झाली. पण नंतर आपण गळाभेट घेतली. त्यानंतर आता असा प्रस्ताव येत असेल, तर… सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करून घ्याल. हे खरं आहे की, काही लोकांचे शब्द चांगले नव्हते. त्याचक्षणी मी तुमची माफी मागितली. हे देखील नोंदवलं पाहिजे. पण, हे पुढे करून विरोधकांची संख्या कमी करत असतील, तर हे योग्य नाही,” असं मत फडणवीस यांनी मांडलं.

हेही वाचा- सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका; भाजपाच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “अध्यक्ष म्हणून नाही, तर भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आम्ही करतो. त्यामुळे मला वाटत की, मोठ्या मनाने विरोधकांना बोलावून चर्चा केली पाहिजे. त्यानंतर कारवाई करायची असेल तर करावी; अन्यथा कुणी वासरू मारलं म्हणून दुसरा गाय मारेल, अशी अवस्था याठिकाणी होणार असेल तर लोकशाहीला योग्य नाही. जी घटना घडली, तिथे दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले. पण मी स्वतः त्यांना मागे केलं. भांडण होऊ दिलं नाही. त्यामुळे असा प्रस्ताव आणणं योग्य होणार नाही,” असा इशारा फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा- ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; सत्ताधारी आणि विरोधक भिडले

ठराव संमत झाल्यानंतर फडणवीस चांगलेच संतापले. भाजपा आमदारांच्या निलंबनानंतर सभागृहात बोलताना म्हणाले,”याठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे. लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधीपक्षाची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो म्हणून हा प्रयत्न आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतोय. हे एकतर्फी कामकाज आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही,” असा संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.