Maharashtra Legislature Monsoon Session : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरूवात झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार, खातेपाटप ते अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्यासही झालेला विलंब अशा विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. पहिल्याच अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, आता विरोधक म्हणून त्यांच्यात एकजूट राहणार का, या प्रश्नाचे उत्तरही या अधिवेशनात मिळणे अपेक्षित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
कुटुंबातील अन् गावातील राष्ट्रप्रेमी महिलेचे निधन झाल्याने शोकाकुल कुटुंबातील सदस्य, सोयरे आणि ग्रामस्थ त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. ही अंत्ययात्रा ग्रामपंचायतजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोहोचली तेव्हा तिथे सामूहिक राष्ट्रगीत गायनाची लगबग सुरू होती. अंत्ययात्रा तिथेच थांबवून सर्व जण राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले.
डोंबिवली जवळील २७ गावातील भोपर गावातील व्यायम शाळेत बुधवारी सकाळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांची जोरदार हमरीतुमरी झाली. राजकीय आणि पाणी प्रश्नावरुन ही वादावादी आणि त्यानंतर हाणामारीची घटना घडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी मानपाडा पोलीस ठाण्यात केल्या आहेत.
प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने दुमजली बस आणि आसन आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा असलेली प्रीमियम वातानुकूलित बसही दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ ऑगस्ट रोजी या दोन्ही बसना हिरवा कंदिल दाखविण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री काही ट्वीट्स करून सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कंबोज यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये एसीबीनं दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याची बाब समोर आली आहे. सविस्तर बातमी
शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटांकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे चित्र असतानाच, ठाकरे समर्थक खासदार राजन विचारे यांनी यंदा ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर लावणार असल्याचे सांगत शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील गोडोली येथे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांला अनोख्या पद्धतीने पेढा भरवल्याची जोरदार चर्चा साताऱ्यात आहे.
गोडोली (सातारा)येथील कार्यकर्ते विनोद मोरे यांचा आज वाढदिवस आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांनी उच्छाद मांडला आहे. आठवडाभरात वाघांनी चार बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.तालुक्यातील अड्याळ शेतशिवारात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
ऑनलाईन क्रिकेट सट्टा व जुगाराचे रॅकेट चालविणाऱ्या प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे चौघांनी मिळून सरताज या मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन कोटींच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले.दरम्यान, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गंगमवार व झाडे यांनी सुटका करून घेण्यात यश मिळवले. सविस्तर वाचा…
येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरींचा वापर आता रेल्वे गाड्यांमध्ये करण्यात येणार आहे. वातानुकूलित डब्यांमध्ये या चादरी प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला आहे.स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण रेल्वेने अवलंबले आहे.
जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. पोलिसांनी अशा घटनांची वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार आणि महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली आहे. सविस्तर वाचा…
पाच लाख रुपयांची खंडणी उकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. आरोपींनी एका डेटिंग ॲपद्वारे तक्रारदार तरुणाशी संपर्क साधला व उच्चभ्रू महिलांसोबत मैत्री करण्यासाठी १० हजार रुपये देण्याचे आमीष दाखवून भेटण्यास बोलवले होते. सविस्तर वाचा…
इस्लामपूर आगारातील सजवलेल्या विठाई बसचे सारथ्य विनापरवाना केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी भाजपने बुधवारी पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी चौकशी करून उद्या सायंकाळपर्यंत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलीस अधिकार्यांनी दिले.
पादचारी तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर भागात राहायला आहे.
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली. त्यात पूर्व उपनगरातील काही ठिकाणांचा समावेश आहे. ईडीने सुमारे १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही शोध मोहीम राबवली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी (१७ ऑगस्ट) सकाळी पिंपरी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत उपक्रम राबवण्यात आला.
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचं संसदीय मंडळ (Parliamentary Board) आणि केंद्रीय निवडणूक समिती (Central Election Committee) नव्याने तयार केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान आणि नितीन गडकरी यांना यामधून वगळण्यात आलं आहे. जे पी नड्डा संसदीय मंडळाचे आणि भाजपाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. विशेष बाब म्हणजे निवडणूक समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
करोना संकटामुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकलेला नसून यंदा करोनाचे संकट कमी झाल्याने दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असल्याचे दिसून येते. संपुर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून या उत्सवाच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते उपस्थिती लावणार आहेत.
कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या निवृत्ती वेतनाबाबत कोळसा मंत्रालयाकडून लवकरच नवीन कायदा केला जाईल. त्यानुसार खासगी कंपन्यांनाही प्रतिटन कोळसा उत्पादनातून कामगारांच्या निवृत्ती वेतनासाठी निश्चित आर्थिक योगदान देण्यासह सरकारी कंपन्यांनाही पूर्वीहून जास्त योगदान द्यावे लागेल सविस्तर वाचा…
कन्नड तालुक्यातील एका लहानशा गावातील १७ वर्षीय मुलीवर सहा जणांनी वारंवार अत्याचार केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
वडारवाडी परिसरातील रहिवाश्यांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी कचरामुक्त वडारवाडी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याचे परिणाम आणि कचरा विलगीकरणाच्या पद्धतीबाबत वडारवाडी परिसरात पुढील तीन महिने जनजागृती केली जाणार आहे.
भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा जबाब घेण्याबाबत मानसोपचार विभागाचा सल्ला मागितला आहे. कारण, या जबाबनंतरच घटनेची वास्तविकता पुढे येणार आहे.
कोंढवा परिसरातील टिळेकरनगर परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी एकजण पिस्तुल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश चिंचकर, अमोल हिरवे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जाधवला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली.
भरधाव वाहनांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या सात महिन्यात ४८ पादचारी मृत्युमुखी पडले आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील वाहतुकीचे समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर बराच काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अलीकडेच या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मलाईदार खाती भारतीय जनता पार्टीला गेल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदच मिळालं नाही, यामुळे तेही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सविस्तर बातमी
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला आहे. परंतु लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सविस्तर बातमी
काटई-बदलापूर पाईप लाईन रस्त्यावरील समाधान हाॅटेलच्या व्यवस्थापकावर दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवून चाकुने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या खिशातील लाख रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन हल्लेखोर पळून गेले. सोमवारी रात्री ही घटना घडली. सविस्तर वाचा…
मागील ३० ते ३५ वर्षाच्या कालावधीत कल्याण-शिळफाटा रस्त्या लगतच्या शेतकरी, जमीन मालकांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. आता शासनाने मोबदला देण्याविषयी एक समिती स्थापन करुन शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सविस्तर वाचा…
भंडारा शहरातील स्टेशन मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात आज सकाळी १० वाजता बिबट्या संचार करताना दिसून आला. यामुळे शहरात दहशत पसरली आहे.सुरक्षा रक्षक विनायक शिवाजी देशमुख यांना त्यांच्या संरक्षण चौकीसमोरील गवतामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले.
कन्नड तालुक्यातील एका लहानशा गावातील १७ वर्षीय मुलीवर सहा जणांनी वारंवार अत्याचार केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. सविस्तर वाचा…