Maharashtra Legislature Monsoon Session : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरूवात झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार, खातेपाटप ते अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्यासही झालेला विलंब अशा विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. पहिल्याच अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, आता विरोधक म्हणून त्यांच्यात एकजूट राहणार का, या प्रश्नाचे उत्तरही या अधिवेशनात मिळणे अपेक्षित आहे.
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
श्रावण महिन्यात रानावनात उगविणाऱ्या जंगली भाज्यांना भोजनात विशेष स्थान असते. रानभाज्यांना श्रावण महिन्यात असलेली वाढती मागणी आणि त्याचा पुरेसा पुरवठा बाजारात होत नसल्याने रानभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. रानभाजी खरेदी करणाऱ्यांना भाजीचा दर ऐकून चटका बसत आहे. सविस्तर वाचा…
डोंबिवलीतून सकाळी आठ वाजता खासगी वाहनाने बाहेर पडलेला प्रवासी सकाळी १० वाजेपर्यंत काटई नाका परिसरात अडकून पडला होता. या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तीनही शहरांच्या परिमंडळ चारमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना ६२ गुन्ह्यांची उकल केली असून यात ३१ लाख ६९ हजार रूपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश आले आहे.
एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग (रोप-वे) प्रस्तावित करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, वनविभाग यांच्या सहकार्याने पर्यटन विभागाकडून हा प्रकल्प करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे.
करोनामुळे लागू झालेले कडक निर्बंध आणि आर्थिक मंदी याचा उद्योधंद्याना बसलेला फटका, अनेकांच्या नोकऱ्यांवर आलेली गदा, तर काही कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली कपात यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र असे असले तरी महागड्या वाहनांच्या खरेदीमध्ये मुंबई उपनगर परिसराने आघाडी घेतली आहे.
शिळफाटा येथील दहीसर भागात एका वाहनाच्या धडकेत बिलाल शेख (३५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी शिळफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिलाल हा शिळफाटा भागात राहत होता.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे ‘जीमेल’ खाते ‘हॅक’ करून त्यांच्या संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
‘आरएसएस संघराज्य’ या नावाने खोटे खाते उघडून त्याद्वारे समाज माध्यमात, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरकाम करणाऱ्या एका महिलेने घरातील साफ सफाई करता करता तब्बल १३ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी उल्हासगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी केल्या जाणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू केली होती मात्र, या करवाईचे फारसे अधिकार नसल्यामुळे वाहनचालक त्यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे चित्र असून रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण कोंडी होत आहे.
मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा बुधवारी मुक्काम कायम होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
जे गद्दार सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रीमंडळ विस्तारात खऱा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. अपक्षांना, महिलांना काही स्थान देण्यात आलेलं नाही. मुंबईकरांनाही काही स्थान देण्यात आलेलं नाही. सर्वात प्रथम जाणारे १४-१५ जण जे निष्ठावंत होते, त्यांनाही स्थान दिलं नाही. निष्ठेला मनात स्थान नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे अशी टीका शिवेसना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, विधीमंडळाबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्य शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे विविध योजनांसाठी केलेली तरतूद, केलेला खर्च आदींबाबतचा तपशीलच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार अर्जाला माहितीचे संकलन सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात आले असून, महामंडळाकडे माहिती संकलित का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
परदेशी चलनाचे आमिष दाखवून महिलेची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करुन पळून गेलेल्या दोन आरोपींना निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. नूर आलम नसरुद्दीन शेख आणि मेहबूब आलम अमरुद्दीन शेख अशी या दोघांची नावे आहेत.
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान पक्षावर गेल्या काही काळापासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास ४० दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तलाक-ए-हसन प्रथा अयोग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. मुस्लिम पुरुषांनी पत्नीला महिन्यातून एकदा असे सलग तीन महिने ‘तलाक’ म्हणत घटस्फोटासाठी अनुसरलेली ही प्रथा इतकी अयोग्य नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.