MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमधून ‘पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलेन’ असं सांगितलं आहे. त्यात यंदाच्या पाडवा मेळाव्याआधीच मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे दावे केले जात असताना त्यासंदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिवाय काल पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आज महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतील. यावरूनही आज राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Maharashtra News Updates 09 April 2024 : निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस; ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची राजकीय बैठक
मनसे केवळ नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.
मी स्वार्थासाठी नरेंद्र मोदी यांना विरोध केला नव्हता. मला भूमिका पटली नाही म्हणून त्यांना विरोध केला होता. मात्र, अनेकवेळा मी त्यांच्या काही भूमिकेचे स्वागतही केलं.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मला एकत्र येण्याबाबत विचारणा करत होते. त्यामुळेच मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून भेटण्याची वेळ मागितली होती, असेही राज ठाकरे म्हणाले.
रेल्वे इंजिन हे चिन्ह कष्टाने कमावलेलं आहे. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार - राज ठाकरे
शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. मला पक्ष फोडून माझा पक्ष वाढवायचा नाही. मी बाळासाहेबांशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. असे राज ठाकरे म्हणाले.
डॉक्टर आणि रुग्नसेविकांनी निवडणुकीची कामे करू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
आज देशात पाच वर्षांनी निवडणुका होत आहे. गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या निवडणुकीच्या होतील अशी आशा होती. मात्र, निवडणुका झाल्या नाही. - राज ठाकरे</p>
हातकणंगलेचे आमदार आवळे म्हणाले, शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे सोपवला आहे तर सांगलीची जागा काँग्रेसने शिवसेनेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांना आरोग्याचा प्रश्न आला तर त्यांना नजीकच्या खासगी अथवा इतर कोणत्याही इस्पितळात कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस सरकारला सुचले नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवले.
भाजप लोकसभेच्या प्रचारामध्ये गुंडाचा वापर करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता यावर बोलताना आठवलेंनी कविता सांगितली.
विवाहबाह्य प्रेमसंबधांला अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्यांची आईनेच गळा दाबून हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शहरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या, तर जामनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला.
ही विचाराची लढाई आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आमच्या सोबत येतील, असेही बावनकुळे म्हणाले.
क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावावर सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या अनेकांना लाखोंमध्ये गंडा घालत आहेत.
चंद्रपूर : चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका…. त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव… गावातील एकूण मतदार २८१… आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत नोंदविते.
कल्याण – कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांंना तुल्यबळ लढत देण्यासाठी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाने तुल्यबळ उमेदवार दिला तर, त्या उमेदवाराच्या मागे सक्तवसुली संचलनालय (ईडी) किंवा तत्सम तपास यंत्रणांंचा चौकशीचा ससेमिरा लावला जाण्याची भीती असल्याने ठाकरे गटातील काही मातब्बर इच्छुक उमेदवारांंनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
यवतमाळ : राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करणे हे कोणत्याही व्यक्तीचे प्रथम कर्तव्य असते. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत सर्व पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात इतके व्यस्त आहेत. दरम्यान, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी मध्यरात्री अपघातानंतर रस्त्यावर पडून असलेल्या जखमी व्यक्तीला तत्काळ मदत करत माणुसकीचा परिचय दिला.
तेल कंपन्यांचे हजारो डॉलर वाचवणारे संशोधन एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या चमूने केले आहे.
जानेवारी महिन्यात मीरा रोड भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेसंदर्भात भाजपाच्या तीन नेत्यांच्या कथित द्वेषपूर्ण भाषणांची तपासणी करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. पोलीस आयुक्तांनी स्वत: या व्हिडिओची तपासणी करावी, असे न्यायालयाने म्हटले. भाजपाच्या या तीन नेत्यांमध्ये नितेश राणे, गीता जैन आणि टी.राजा सिंह यांचा समावेश आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. तर त्यांचे पती आमदार रवी राणा अजूनही युवा स्वाभिमान पक्षात आहेत. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. एका घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, हा तर पीएचडीचा विषय आहे, असे ते म्हणाले. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांकडून सशुल्क जाहिराती सोशल मीडियावरुन केल्या जात आहेत.
कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करताना मतदारसंघात भाजप आणि महायुतीचे मित्र पक्ष श्रीकांत यांना विजयी करतील अशी घोषणा केली होती. आमदार गणपत गायकवाड समर्थकांच्या भूमिकेमुळे कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला होता. मात्र..
मुंबई : एका ३० वर्षांच्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली होती. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी बिहार येथून या मुलीची सुटका करून आरोपीला अटक केली.
लोकसभा निवडणूक आणि सण, उत्सव पाहता शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
पाच वर्षे खासदार पद असताना डॉ. सुजय यांनी कामोठेमध्ये राहणा-या पारनेरवासियांची का भेट घेतली नाही असा प्रश्न लंके यांनी उपस्थित केला.
नागपूर: महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज निर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक ३ मधून यापूर्वी सलग २६६ दिवस वीज निर्मिती झाली होती. हा विक्रम पारस वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक ४ ने मोडला. पारसमधील या संचातून ९ एप्रिल २०२४ रोजी २६७ दिवसांपासून अखंडित वीज निर्मिती सुरू आहे. त्यामुळे या पद्धतीची कामगिरी इतर संचांनी केल्यास उन्हाळ्यात वीज संकट जाणवणार नाही असा, तज्ज्ञांचा अंदाज आहे.
रामटेक हा भाजप-शिंदे शिवसेना युतीत शिंदे गटाला सुटलेला मतदारसंघ असून येथे सेनेतर्फे राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असनाताही मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षां’वर होत असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी सोमवारी दिली.