MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमधून ‘पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलेन’ असं सांगितलं आहे. त्यात यंदाच्या पाडवा मेळाव्याआधीच मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे दावे केले जात असताना त्यासंदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिवाय काल पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आज महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतील. यावरूनही आज राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Maharashtra News Updates 09 April 2024 : निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस; ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची राजकीय बैठक
नाशिक : लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्षात अटीतटीचा संघर्ष सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सात दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे, दोन आठवड्यांपासून उमेदवारीसाठी सातत्याने ठाणे, मुंबईला खेटा मारणारे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी आता थेट दिल्ली गाठली आहे.
बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामात तब्बल २१ उमेदवार मैदानात असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे राजकीय पक्ष, मतदारच नव्हे तर निवडणूक विभागाची देखील डोकेदुखी वाढली आहे.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे, डोंबिवली अशा ठिकाणी निघणाऱ्या शोभायात्रा या भागात प्रामुख्याने आकर्षणाचा विषय ठरतात. या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं सादरीकरण केलं जातं. चित्ररथ सहभागी होतात. तरुणाईचा मोठा जल्लोष या शोभायात्रांमधून पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षीही शोभायात्रांमध्ये तोच उत्साह दिसत असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतानाच विरोधी पक्षांवर खोचक टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २०१९मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंदा महाराष्ट्रात त्याच भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर महायुतीत जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात महायुतीमधील देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेतेमंडळींनी सकारात्मक विधानं केली आहेत. आता खुद्द राज ठाकरे यासंदर्भात काय भूमिका जाहीर करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मागील काही दिवसांपासून कल्याणच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा होती. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन कल्याणचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे या जागेचा पेच संपुष्टात आल्याचं बोललं जात होते. मात्र, फडणवीसांच्या घोषणेनंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली असली, तरी माझी उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही, असे ते म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या विधानानंतर आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असनाताही मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षां’वर होत असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी सोमवारी दिली.