Marathi News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडनहून परतले असून आता आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय प्रक्रियात कधी सुरू होईल? याचे वेध राज्यातील राजकीय वर्तुळाला लागले आहेत. दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यातही विरोधी पक्षांच्या बैठका आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर!
चंद्रपूर: भाजप महानगर, भाजयुमो, भाजप युवा व युवती मोर्चातर्फे चंद्रपूरात ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट निःशुल्क दाखविण्यात आला. या चित्रपटाचा शहरातील अनेक युवक युवतींनी लाभ घेतला.
नागपूर: शहरातील ‘बदनाम वस्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा घातला. पोलिसांनी अचानक घातलेल्या या छाप्यामुळे वारांगणा आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपीनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली.
नागपूर: राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढले असून नाशिक परिक्षेत्र लाचखोरीमध्ये पहिल्या तर पुणे विभाग द्वितीय स्थानावर आहे.
नागपूर: संपूर्ण देशात मातृदिन साजरा होत असताना नागपुरात एका मातेने पतीकडे राहणाऱ्या दोन्ही मुलांच्या विरहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
चंद्रपूर: राज्यात मागील तीन महिन्यांत १६ ते २५ वर्ष वयोगटातील ३ हजार ५९४ तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जो स्वत:च कंस आहे, त्याला दुर्योधन आणि दु:शासन काय करणार आणि धर्मराज तरी काय कळणार? ज्याची स्वत:ची भूमिका कंसाची आहे, तो स्वत:च्या घरालाही आग लावतो आणि दुसऱ्याच्या घरालाही आग लावतो - आशिष शेलार
त्र्यंबकेश्वर मंदिरातील त्या प्रकरणावर चित्रा वाघ यांचं सूचक ट्वीट!
असं वाटतं हिंदू कूंभकर्णाचे बाप आहेत. जागेच होत नाहीत.
शिवनेरी हे नव्या जिल्ह्यासाठी असलेलं नाव दिलं, तर त्यातून लोकांचं काय कल्याण होणार आहे? सर्वसामान्यांच्या जीवनात यातून काय आणि कसा फरक पडणार आहे? याचं नियोजन समोर असायला हवं - अमोल कोल्हे
ITI मधील शिल्पनिदेशकांच्या मानधनात वाढ
अकोल्यात नवीन पशुवैद्यक महाविद्यालय येणार
मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णय
नागपूर : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ न मिळण्यामागे प्रशासकीय कारण आहे की? राजकीय? अशी चर्चा सध्या वरील दोन्ही वर्तुळात आहे.
यवतमाळ: जिल्ह्यातील अवकाळी वातावरणाचा गारवा संपुष्टात आला असून सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून कमाल तापमान ४४ अंशापर्यंत गेले आहे.
वर्धा : कर्नाटकातील पराभवानंतर भाजपमध्ये अप्रत्यक्ष का होईना, पण बंंडाचे सूर उमटायला लागले आहेत. कर्नाटकातील पराभव हा निष्ठावंतांना डावलल्याचा परिणाम असल्याचे सांगत भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
चंद्रपूर : वाहतुकीच्या नियमांचे होत असलेल्या सर्रास उल्लंघनामुळे चंद्रपुरात अपघाताची संख्या वाढली आहे. महामारीपेक्षाही भयंकर स्थिती अपघातातील मृत्यूच्या आकड्यातून दिसून येत आहे. केवळ चार महिन्यांत जिल्ह्यात तब्बल २८१ अपघात झाले.
नागपूर : कोराडी आणि खापरखेडा येथे सध्याच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे प्रदूषणात वाढ होत असतानाच आता कोराडीत नव्याने वीज प्रकल्प उभारू नयेत, त्याऐवजी प्रस्तावित प्रकल्प पारशिवनीत हलवा, अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बीएड परीक्षांचे नियोजन केले. पण, त्याच कालावधीत नेट परीक्षा होत आहेत. त्यामुळे बीएड द्वितीय सेमिस्टरची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी कुलसचिव तुषार देशमुख यांना निवेदन सादर केले. येत्या तीन दिवसांत निर्णय घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान व्यक्त करावे अशी स्थिती नाही. मुंबई महानगरपालिकेने किती गाळ काढला हे सांगण्यापेक्षा नाल्यात किती खोल सफाई झाली, त्या खोलीची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी केली.
नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेतली जावी - सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
वर्धा: आर्वी येथील भाजपाचे आमदार दादाराव केचे यांनी तळेगाव श्यामजी पंत येथे जाहीर सभेत केलेले भाषण चांगलेच गाजत आहे. यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव (पीए) सुमित वानखेडे यांच्यावर चढ्या आवाजात नाव न घेता तोफ डागली आहे.
अलिबाग – बैलगाडी स्पर्धांवरील बंदी उठल्यानंतर या शर्यतींना मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे पारंपारीक खेळ असलेल्या या बैलगाडी शर्यतींना आता व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. राजकीय लाभासाठी राजकीय पदाधिकारी आणि पक्ष यात गुंतवणूक करू लागले आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसांची खैरात वाटली जात आहे, त्यामुळे काही भागांपुरते मार्यादीत असलेले बैलगाडी स्पर्धांचे लोण जिल्हाभर पसरू लागले आहे. स्पर्धांना मिळणारा राजकीय आश्रय यास कारणीभूत ठरला आहे.
संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत भाष्य करताना जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे. पण काही लोकांकडून अशी अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं हे लोकशाहीसाठी उपयोगी आहे - राहुल नार्वेकर
या राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी शासनाची, प्रसासनाची आहे. नागरिकांनी त्यात सहकार्य करणं गरजेचं आहे. जातीय तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी सहकार्य देण्याची गरज आहे - एकनाथ शिंदे
वारीतील रिंगण सोहळ्यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
बेदरकारपणे वाहनं चालवणारे, परवाना नसणारे, मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचं आढळून येत आहे - एकनाथ शिंदे
कुणाला राजकीय आरोप करायचे असतील, तर मी त्यावर काही सांगू शकणार नाही - राहुल नार्वेकर
अपात्रतेसंदर्भातल्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. पण असं करताना कोणतीही घाई केली जाणार नाही - राहुल नार्वेकर
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर!