Marathi News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडनहून परतले असून आता आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय प्रक्रियात कधी सुरू होईल? याचे वेध राज्यातील राजकीय वर्तुळाला लागले आहेत. दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यातही विरोधी पक्षांच्या बैठका आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर!
पंधरा दिवसापूर्वी कुरुलकर ला पाकिस्तान ला आपल्या देशाची संरक्षण संशोधनांची गुपित देत होता ह्या साठी पकडला आता शेंडे सापडला हेच करतांना – जितेंद्र आव्हा़
पंधरा दिवसापूर्वी कुरुलकर ला पाकिस्तान ला आपल्या देशाची संरक्षण संशोधनांची गुपित देत होता ह्या साठी पकडला आता शेंडे सापडला हेच करतांना..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 16, 2023
आपले इमान इतके स्वस्त आहे
दुर्दैवाने दोधे ही महाराष्ट्रातले
महाराज असते तर हत्ती च्या पायी दिले असते
हाच कुणी कुरेशी किंवा सय्यद असता तर ..…
नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे वाघांची संख्या वाढली. पण, अधिवास क्षेत्र कमी पडत असल्यामुळे येथील वाघ बाहेर पडत आहेत. अभयारण्याला जोडणाऱ्या ‘कॉरिडॉर’मध्ये वन्यजीव व्यवस्थापन झाले नाही, तर येथेही मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमरावती: धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमाद्वारे आक्षेपार्ह व्हीडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या अशा बदलापूर रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या ५०० मीटर परिसराचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. ‘स्थानक परिसर सुधार प्रकल्प’ अर्थात ‘सॅटिस’अंतर्गत या स्थानकाच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
वर्धा: पावसाळ्याची बेगमी म्हणून घरोघरच्या गृहिणी आता लोणचे, तिखट, मसाले तयार करून ठेवण्याच्या कामाला लागल्या आहेत. मात्र, मिरची खरेदी नाकाला चांगलीच झोंबू लागली असल्याचे बाजारातील चित्र आहे.
यवतमाळ : समाजमाध्यमे चांगली की वाईट? अशी चर्चा कायम सुरू असते. या माध्यमांची चांगली आणि वाईट, अशा दोन्ही बाजू आहेत. मात्र, आपण ही माध्यमे धार्मिक तेढ निर्माण करणे, जातीय सलोखा बिघडविणे, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे यासाठी वापरत असाल तर खबरदार!
नागपूर: यशोधरानगरातील गोमांस विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाई केल्यामुळे युनिट तीनचे पथक चर्चेत आले होते. मात्र, त्यांच्याच हद्दीत सुगंधित तंबाखू, अवैध सडकी सुपारी, धान्याचा काळाबाजार आणि गुटखा विक्री जोरात सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते.
यवतमाळ : झरी जामणी तालुक्यात मुकुटबन येथे यझदानी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीद्वारे मुकुटबन, रुईकोट, सावळी, पार्डी क्षेत्रात प्रस्तावित खुल्या कोळसा खाणीला पर्यावरण जनसुनावणीत स्थानिक नागरिकांसह, पर्यावरणप्रेमी, राजकीय नेते व शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला.
गडचिरोली : विकासाचे स्वप्न दाखवून जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सूरजागड टेकडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरू करण्यात आले. मात्र, यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून बेदरकार अवजड वाहतुकीमुळे लोकांचा नाहक बळी जातोय. रविवारी याचमुळे एका १२ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलीस विभागाने कोणतीही हयगय न करता थेट कंत्राटदार कंपनी ‘लॉयड मेटल्स’वर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.
मुंबई : वाहन उभे करण्यावरून झालेल्या भांडणात एअर गन दाखवून एका व्यक्तीला धमकावणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अँटॉप हिल पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. नितीन अरोरा असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडे असलेली एअर गन पोलिसांनी जप्त केली.
जळगाव: राज्यात तापमानाचा पारा उंचावला असताना जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जात आहे. भुसावळमध्ये आजीचा तेराव्याचा कार्यक्रम व १५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या कन्येला पाहण्यासाठी पुणे येथून आलेले रेल्वेच्या कर्मचार्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्तविली असतनाच या दोन्ही निवडणुका एकत्र होणे अशक्य असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने या निवडणुका एकत्र की स्वतंत्रपणे होणार याबाबत संभ्रम कायम आहे.
जो माणूस अडीच वर्षांच २ तास मंत्रालयात गेला, त्याची बरोबरी मोदींशी होऊ शकत नाही. लोकशाहीत हार-जीत ठरलेली असते. मी उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही. संजय राऊतला सध्या काही काम नाही. पोपट शिवसेनेत होता, तेव्हा भरारी घेत होता आणि आता पोपट मेला का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी स्टेटस आहे. त्यांच्याबद्दल कुणी आक्षेपार्ह बोलू नये. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नैराश्यात गेलेत.. त्यामुळे ते काहीही बोलतायत – नारायण राणे
पिंपरी: भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या २६ किलोमीटर जलवाहिनीचे अंतर जास्त नाही. त्याचे काम वर्षभरात पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन कोणत्याही परिस्थितीमध्ये महिन्याभरात करून महापालिकेच्या ताब्यात जागा द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सोमवारी केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर काँग्रेसचे स्थान काहीसे भक्कम झाल्यामुळे इकडे सोलापुरातही काँग्रेसजनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मागील सलग दोन्ही पराभव पचवून आता पुन्हा सोलापूर लोकसभेची जागा लढण्यासाठी सज्ज होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी फिरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक: मे महिन्याच्या मध्यावर तापमानाने ४० अंशाचा टप्पा गाठला असताना दुसरीकडे पाणी टंचाईचे संकट विस्तारत आहे. मेच्या मध्यावर जिल्ह्यातील धरणसाठा ३६ टक्क्यांवर आला आहे. सध्या ४१ गावे व १९ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. १५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसात टंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे.
कुरुलकर आरएसएसशी संबंधित आहेत. आरएसएस वैचारिक संघटना आहे. आरएसएसचा व्यक्ती असा प्रकारे देशाची माहिती आपल्या शत्रूराष्ट्राला, पाकिस्तानला देत असेल, तर यावर RSS नंच उत्तर द्यायला पाहिजे – नाना पटोलेंची मागणी
गडचिरोली : गडचिरोली वनविभागात शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या साहित्य खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
समितीत तीन तीन लोक प्रत्येक पक्ष देईल. नऊ जणांची समिती बनेल. येत्या १५-२० दिवसांत त्यावर सगळा अहवाल येईल. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. महाडची जागा आमचीच आहे. ती आम्हीच लढू – नाना पटोले
मी स्वत: अकोल्यात जाणार आहे. आमचा सवाल आहे, एक तास पोलीस तिथे पोहोचले का नाहीत. त्याचं उत्तर फडणवीसांनी दिलं पाहिजे. वर म्हणतात दंगली करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही – नाना पटोले
पुणे: खडकवासला धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या बुलढाण्यातील नऊ मुली बुडाल्याची घटना सोमवारी (१५ मे) सकाळी घडली. त्यातील दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून धरणाच्या जलाशयात उतरण्यास निर्बंध घालण्यात येणार आहेत. तसेच ५०० रुपये दंडासह कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
ईडीनं दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्यात नवाब मलिकांनी दाखल केलेल्या जामीनाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Supreme Court to hear Nawab Malik's bail application in ED's laundering case against him. #SupremeCourtOfIndia pic.twitter.com/ryCfXwb8oz
— Live Law (@LiveLawIndia) May 16, 2023
हे अनेक पक्षांमधून आलेले नार्वेकर बोलतायत की विधानसभा अध्यक्ष बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करावं. त्यानुसार त्यांना उत्तर देऊ. तेही कायद्याचे जाणकार आहेत. ते अनेक वर्षं शिवसेनेचेच वकील होते. त्यांना माहिती आहे की शिवसेना काय आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभं राहायचं असेल, तर त्यांनी कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवावी.
अमेरिकेतील AI स्टार्टअप कंपनी असणाऱ्या OpenAI या कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देते. आता google ने देखील आपला AI Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे. बातमी वाचा सविस्तर
पुणे: विकासात विनाश होऊ नये हे खरे. मात्र, अर्धवट माहिती घेऊन प्रकल्पांना विरोध केला जातो. जगभरात यशस्वी झालेले प्रकल्प आपल्याकडे का यशस्वी होणार नाहीत. असे प्रकल्प राबवताना तुमची, माझी आणि खरी अशा तीन बाजू असतात. त्यामुळे तुमचे आणि माझे म्हणणे ऐकून घेऊन तज्ज्ञांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील वेताळ टेकडी, नदीसुधार, नदीकाठ संवर्धन प्रकल्पांचे सोमवारी समर्थन करत पर्यावरणप्रेमींचे कान टोचले.
WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तसेच याची मूळ कंपनी ही मेटा असून, त्याचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. Whatsapp गेल्या काही दिवसांपासून आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत आहे. कंपनी आतासुद्धा वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर घेऊन आले आहे . बातमी वाचा सविस्तर
नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी गरुडा ॲम्युझमेंट पार्क या कंपनीच्या संचालकांविरुद्ध अखेर सोमवारी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: पुणे शहरासाठी वर्षाला ११ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका २० टीएमसी पाणी वापरते. तब्बल चार टीएमसी पाण्याची जलवाहिन्यांतून गळती होते. म्हणजेच शहराला चार महिने पुरेल, एवढे पाणी सदोष वितरण प्रणालीमुळे वाया जाते, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले.
नागपूर : महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून नवनवीन प्रशिक्षण कार्यक्रम राबवून कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनवण्यावर भर देणार असल्याची माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.
नागपूर : देशातील जवळपास १२ ते १५ राज्यांत नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळ्या नागपुरात सक्रिय होत्या. गुन्हे शाखेने राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल करून ५८ आरोपींना अटक केली. त्यापैकी सर्वाधिक बाळांची विक्री करणाऱ्या आयेशा खान ऊर्फ श्वेता सावळे टोळीवर नागपूर पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली. राज्यातील ही पहिलीच कारवाई नागपुरातून करण्यात आली.
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर!