Marathi News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडनहून परतले असून आता आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय प्रक्रियात कधी सुरू होईल? याचे वेध राज्यातील राजकीय वर्तुळाला लागले आहेत. दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यातही विरोधी पक्षांच्या बैठका आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर!

10:18 (IST) 16 May 2023
Maharashtra News Updates: फडणवीसांची काहीतरी मजबुरी दिसतेय – संजय राऊत

देवेंद्र फडणवीसांना वकिलीचं ज्ञान आहे, त्यांना कायदा कळतो. त्यांना प्रशासन कळतं. त्यांना राजकारण माहिती आहे. त्यांना पडद्यामागे काय चाललंय हे माहिती आहे. ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. तरी ते अशी वक्तव्य करतायत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी दिसतेय – संजय राऊत

10:18 (IST) 16 May 2023
Maharashtra News Updates: ..तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील – संजय राऊत

“सर्वोच्च न्यायालयानं मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलंय. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचंय. मला वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतीशहाणे किंवा मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीसच असं म्हणत असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील” – संजय राऊत

09:53 (IST) 16 May 2023
Maharashtra News Updates: जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक

आज जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात लढत होत असल्याचं चित्र आहे.

09:27 (IST) 16 May 2023
नाशिक : ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधकाला अटक

नाशिक – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकाविरोधात दाखल तक्रारीवर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तब्बल ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्यासह वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा..

09:27 (IST) 16 May 2023
नागपूर : ‘सुपर’मधील उद्वाहन बंद.. रुग्णांनी जिन्याने जायचे काय?

नागपूर : मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद असतानाच आता येथील उद्वाहन यंत्रही बंद पडले. त्यामुळे दाखल रुग्णांनी वेगवेगळ्या भागात जिन्याने जायचे काय? असा सवाल नातेवाईक विचारात आहे.

सविस्तर वाचा..

09:26 (IST) 16 May 2023
वर्धा : “निष्ठावंतांना डावलल्याने कर्नाटकात भाजपाचा पराभव, पक्षाने बोध घ्यावा”, आमदार दादाराव केचे यांचा घरचा आहेर

वर्धा : सध्या कठोर शिस्तीचे नेतृत्व असल्याने उघड विरोधात बोलण्याची भाजपामध्ये कोणाची बिशाद नाही. मात्र आर्वी येथील भाजपाचे आमदार दादाराव केचे यांनी पक्षाच्या कर्नाटकातील पराभवाची कोणतीच तमा न बाळगता स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केलीत, अनेक वर्षांपासून पक्ष उभा केला, अशा लोकांना डावलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ज्यांनी पक्ष उभा केला त्यांच्याऐवजी उपऱ्यांना प्राधान्य दिले. यातून पक्षाने बोध घेतला पाहिजे.

सविस्तर वाचा..

09:19 (IST) 16 May 2023
Maharashtra News Updates: निलेश राणेंचं ट्वीट

न्यायालयाने रीजनेबल टाईम चा उल्लेख करूनही हा पोरकटपणा चाललाय – निलेश राणेंचं ट्वीट

09:14 (IST) 16 May 2023
Maharashtra News Updates: गरीबाला न्याय द्या, पुण्यातील ‘त्या’ प्रकरणी आव्हाडांचं ट्वीट

पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयातील एका घटनेबाबत जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.

09:12 (IST) 16 May 2023
Maharashtra News Updates: पुणे विभाजनाच्या मागणीवर भाजपा आमदाराचं स्पष्टीकरण…

पुण्याच्या विभाजनाची मागणी का केली? भाजपा आमदार महेश लांडगेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “असं झालं तर…!”

वाचा सविस्तर

09:09 (IST) 16 May 2023
शिवसेना कोणाची याचा निर्णय आधी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण, प्रतोदपदाचाही लवकरच निवाडा

शिवसेना कोणाची आहे आणि प्रतोदपदी कोण राहील, याबाबत आधी निर्णय होईल आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

वाचा सविस्तर

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra Breaking News: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर!